बुलडाणा : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या दाताळा शाखेचा मॅनेजर राजेश हिवसे आणि शिपाई मनोज चव्हाण या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. अकोल विभागीय कार्यालयानेही ही कारावई केली. बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांनी कारवाईसंदर्भात माहिती दिली.
दोन्ही कर्मचाऱ्यांविरोधातील हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांनी दिली.
या बॅंक मॅनेजरने या पूर्वी ही असा प्रकार केलाय का, याची आम्ही माहिती घेत आहोत. जनतेला आवाहन आहे की त्यांच्याकडे काही तक्रार असल्यास आम्हाला कळवावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकुमार मीना यांनी केले आहे.
आरोपी बँक मॅनेजर
काय आहे प्रकरण?
पीककर्जासाठी बँक मॅनेजरने शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात घडला. महिलेच्या तक्रारीवरुन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर आणि शिपायाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या माहितीप्रमाणे, शेतकरी आणि त्याची पत्नी पीककर्जासाठी दाताळातल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या. तिथं बँक मॅनेजरने कागदपत्रांची चाळणी करुन तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना केली. त्यावर संबंधित शेतकऱ्यानं त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. नंतर मॅनेजरने शेतकरी पत्नीसोबत अश्लील संभाषण करत त्यांना शरीरसुखाची मागणी केली.
मोबदल्यात पीककर्जासोबत वेगळं पॅकेजही देण्यात येईल, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठवला. याप्रकरणी मॅनेजर आणि शिपाई या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणारा बँक मॅनेजर निलंबित
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jun 2018 11:59 AM (IST)
दोन्ही कर्मचाऱ्यांविरोधातील हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांनी दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -