सातारा : महिला पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. स्वाती निंबाळकर असे या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
स्वाती निंबाळकर या मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या.
सातारा जिल्ह्यातील कोंडेवे येथे स्वाती निंबाळकरांनी विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली.
सासरच्या लोकांनी जाच केल्याने स्वाती निंबाळकरांनी टोकंच पाऊल उचललं असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.