रत्नागिरी : स्मशानभूमी अलीकडच्या काळात वैकुंठ धाम या नावाने ओळखली जाते. पूर्वी गावाच्या बाहेर,ओढा किंवा नदीजवळ उघड्यावर अंत्यविधी केले जात असत. धगधगती चिता पाहून अक्षरशः भीती वाटत वाटायची पूर्वी स्मशानभूमी हा शब्द देखील भयावह वाटत होता. आज वैकुंठ धाम,मोक्षधाम असे शब्द वापरताना भीतीचा लवलेश देखील वाटत नाही. आजची वैकुंठधाम बंदिस्त आहेत. शहरातील पालिका किंवा महापालिका,नगरपंचायत तर ग्रामीण भागात ग्रामपंचायत त्याची देखभाल करते.


मृत्यू हा महान आहे. सर्वांसाठी समान आहे.राजा असो व रंक, त्याला निसर्गाचे दान आहे. मृत्यूने परिवर्तने घडतात. शत्रू सारे मित्र बनतात. कालचे शिव्याशाप देणारे आज डोळे भरून रडतात. तोंड फिरवणारे सारे रांगेत येऊन दर्शन घेतात. नरकाची इच्छा धरणारे स्वर्गासाठी साकडे घालतात. छातीला छाती भिडवणारे खांद्यांसाठी पुढे धावतात. जीव घेण्यास आसुसलेले पुढे होऊन फुले वाहतात. मृत्यू समोर माना वाकतात, मान देण्यास संगिनी वाकतात. मृत्यू हा अटळ असतो म्हणून तो सत्य असतो. जीवनात काही मिळो वा ना मिळो मृत्यू सर्वांना मिळतो.जीवनात मानवाला आनंद, दुःख व यातना सहन करावा लागतात.स्मशान म्हणजे मानवी जीवनाचा शेवटचं प्रवास जेथे मृतदेह दहन करतात ती जागा.पण स्मशान भूमीचे शेड नसल्यामुळे मृतदेहाला स्मशानात अडीअडचणींचा सामना करावा लागला आहे.


ग्रामपंचायत, सरपंच आणि ग्रामसेवक यांचं दुर्लक्ष


रत्नागिरीमधील मंडणगड तालुक्यातील पेवे गावाची स्मशानभूमीची 3 जून 2020 ला निसर्ग चक्रिवादळामध्ये स्मशानभूमीचे शेड नासधूस होऊन खाली पडले होते. चक्रीवादळामुळे स्मशान भूमीचे नुकसान झाले. जून 2021 ला एक वर्ष पूर्ण झाली. छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पण पडीक झालेल्या स्मशान भूमीची ग्रामपंचायतीच्या झालेल्या दुर्दशेची पूर्णपणे माहिती असून ग्रामपंचायत, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी दुर्लक्ष केले आहे.


शेड रिपेरिंग करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व ग्रामपंचायत सदस्यांना यांना सूचना देऊन पावसांच्या आत जर शेड नाही झालं तर पुढे परीस्थिती बिकट होईल. त्यामुळे लवकर शेडचे काम करून घ्यावे. ग्रामपंचायतच्या कार्यालय मधुन ग्रामस्थांना असे प्रतिउत्तर मिळाले की स्मशान भूमीचे शेड बांधण्यासाठी निधी उपलब्ध नाही.



शेड नसल्यामुळे मृत्यूदेह अर्धवट जळला.. 


महाराष्ट्र शासनाने गावातील विकास कामासाठी आराखडा तयार केलेला आहे. त्यानुसार विविध 128 मार्गाने गावात निधी जमा केला जाऊ शकतो आणि या माध्यमातून गावातील विकास कामे केली जातात. पण असे न करता ग्रामस्थांना टाळाटाळ करून उत्तरे दिले गेली. स्मशानभूमीचा शेड नसल्यामुळे एक विचित्र प्रकार घडला. पेवें गावात मृत्यू  झाल्यानंतर त्यांना स्मशान भूमीत घेऊन गेले त्या नंतर शेड नसलेल्या सरणावर मृत्यू देह ठेऊन विधी करून अग्नी दिली. मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर मुसळधार पावसाची सुरूवात झाली. त्यात छप्पर नसल्यामुळे शरणावर ठेवलेला मृतदेह आणि सुकलेली लाकडे पूर्णपणे ओली झाली.  


अग्नी कमी होऊ नये म्हणून त्यानंतर ग्रामस्थांनी सात ते आठ मोठे गाडीचे टायर आणले. ते शरणावर व खाली टाकून पेटवले.  त्यात 15 लिटर रॉकेलचा वापर करण्यात आला. ते ही पावसाच्या समोर कमी पडू लागले. चार चौघांनी मंडळी मिळून शरणावर अधून मधून मीठ मारत होते. पण पाऊस काही थांबायची नाव घेत होता.   काही ग्रामस्थांनी चारही बाजूंनी शरणावर छत्र्या पकडल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही नंतर जवळपास एक ते दोन तास ग्रामस्थ मंडळीने शरणाची अग्नी विझू नये म्हणून झुंजत होते.


पुन्हा पावसाने जोर धरला आणि शरणाची संपूर्णपणे अग्नी विझवला. अर्ध जळालेला मृतदेह पाहून पुन्हा त्याला खाली उतरवून आणि बाजूला एक खड्डा खोदून मृतदेहांवर उघड्यावर अंत्यसंस्कार करून आटोपावे लागले. ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहाची अवहेलना होत आहे. मेल्यानंतर ही माणसाला अशी यातना भोगावी लागत आहे.