परभणी : परभणीत पोलीस भरतीच्या तयारीसाठी सकाळी रनिंग करणाऱ्या चार तरुणांना कारने उडवलं. या घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी आहेत. सोनू साबळे (वय 18 वर्ष) आणि गोविंदा साबळे (वय 21 वर्षे) अशी मृत तरुणांची नावं आहेत.
पूर्णा तालुक्यातील माटेगाव इथल्या पूर्णा रोडवर आज पहाटे पाच ते सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली. कारने आधी सोनू आणि गोविंदा यांना चिरडलं. त्यानंतर व्यायाम करणाऱ्या विकास साबळे आणि कुणाल साबळे यांनाही कारने उडवलं. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पूर्णा पोलिसानी पंचनामा करुन गुन्हा दाखल केला आहे. तर या घटनेनंतर कारचालक पसार झाला आहे.