नाशिक : नाशिकमध्ये सायकलिंग करताना एका उद्योगपतीचा मृत्यू झाला आहे. जसपालसिंग विर्दी असं या उद्योगपतीचं नाव आहे. सायकलिंग करताना हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला.


नाशिकमध्ये राहणारे जसपाससिंग विर्दी हे नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.  आज शनिवारी सकाळी 7 वाजता सायकलिंग करताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला, आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

उद्योगपती विर्दी यांचं सायकलिंग चळवळीत मोठं योगदान आहे. नुकतेच जसपालसिंग विर्दी नाशिक ते पंढरपूर सायकल दिंडी घेवुन आले होते. गेली 6 वर्षे ते सायकल दिंडी घेऊन पंढरपूरला जात होते.