मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तिघे अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 08 Jul 2017 07:43 AM (IST)
मुंबई : मुंबईतल्या ट्रॉम्बे भागातील अल्पवयीन मुलीवर भांडुपमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. वडिलांच्या मित्रानेच हा बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे. ट्रॉम्बे भागात राहणारी 15 वर्षीय मुलगी बुधवारी 5 जुलैला आपल्या वडिलांच्या मित्रासोबत फिरायला गेली होती. त्यांनतर या मित्राने भांडुपमधील एका दुसऱ्या आरोपीच्या घरी मुलीला नेलं. तिथे वडिलांच्या मित्राने आणि इतर तिघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यांनतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी तिला दुपारी धमकावून घरी पाठवण्यात आलं. त्यानंतर पीडित मुलीने आपल्या वडिलांसोबत ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी या चारही जणांवर सामूहिक बलात्कार, अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये तिन्ही आरोपींना शुक्रवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आलं. यामध्ये अटकेत असलेल्या तिघांना 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर अन्य एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.