गोंदिया: गोंदियात सुरक्षा रक्षकांच्या ठेकेदारानं प्राचार्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. थेट प्राचार्यांच्या केबिनमध्ये घुसून ठेकदारानं त्यांना मारहाण केली. दरम्यान वेळीच तेथील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत ठेकेदाराला केबिनच्या बाहेर नेलं.


गोंदियाच्या मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी माहाविद्यालयीतील प्राचार्य देवेंद्र पांडे यांना बेदम मारहाण करण्यात आली. महाविद्यालयातील सुरक्षा रक्षकांचे थकीत बील न काढल्यानं ही मारहाण करण्यात आल्याचं समजतं आहे. काल (गुरुवार) संध्याकाळी ही मारहाण झाली.

सुरक्षा रक्षकांचं बील आणि 25 महिन्यांचा पीएफ न दिल्यानं कंत्राटदाराकडून प्राचार्यांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.