Bullock Cart Race : Bailgada Sharyat : सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे.

  बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर काल (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. त्याआधीच्या सुनावणीवेळी याबाबत इतर राज्यांना नोटीस बजावण्यात आली होती. तसेच त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. 2017 साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सात वर्षांनंतर या निर्णयामुळं बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात सुरु होणार आहे. 


आयोजक, पुढील शर्तींना अधीन राहून, बलगाडी शर्यतीचे आयोजन करु शकतील


1000 मीटरपेक्षा अधिक लांबीचे धावण्याचे अंतर नसेल अशा योग्य धावपट्टीवर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येईल, बैलगाडी शर्यतीची धावपट्टी ही अतिशय उतार असलेली, दगड किंवा खड़क असलेली, चिखल, दलदल असलेली, पाणथळीची किंवा पातळ चिखल असलेले ठिकाण असलेली नसावी. बेलगाडी शर्यंत रस्त्यावर किंवा महामागांवर आयोजित करण्यात येऊ नये.


बैलांना किंवा वळूंना एखाद्या विशिष्ट शर्यतीसाठी किमान 30 मिनिटे आराम द्यावा आणि कोणत्याही वळूचा किंवा बैलाचा वापर एका दिवसामध्ये तीनपेक्षा अधिक शयंतीसाठी करण्यात येऊ नये, धावपट्टीवर आणण्यापूर्वी किमान 20 मिनिटे आराम द्यावा


केवळ एका गाडीवानास बैलगाडी चालविण्यास परवानगी असेल, आणि अन्य कोणतेही वाहन धावपट्टीवर किंवा धावपट्टीवर किंवा धावपट्टी बाहेर बेलगाडी भोवती चालविता येणार नाही; (घ) कोणताही गाडीवान किंवा बैलाच्या शर्यतीचा प्रस्ताव देणारी व्यक्ती, तिच्याकडे किंवा गाडीवर कोणतीही काठी, चाबूक, पिंजरी किंवा बैलास दुखापत करू शकेल किंवा बैलास बीजेचा धक्का देऊ शकेल असे कोणतही साधन किंवा उपकरण बाळगणार नाही.


पाय बांधणे किंवा बैलास काठीने मारणे अथवा पायाने मारणे अथवा चाबुक अथवा पिंजरी यासारखे कोणतेही साधन अथवा विद्युत धक्का किंवा अन्य साधनांचा वापरणे अथवा जननअंग पिळणे अथवा जनन अंगावर लाथ मारणे अथवा आरुने जनन अंगास इजा पोचवणे अथवा शेपूट पिरघळणे अथवा शेपटीस चावा घेणे यास गाडीवानास प्रतिबंध असेल


शर्यतीमध्ये धावणाऱ्या बैलांच्या अथवा वळूच्या जोड्या या, एकमेकांशी योग्यरीत्या सुसंगत असाव्यात. बैलगाडी शर्यतीकरिता वळू अथवा बेलांना कोणत्याही प्रकारच्या प्राण्या सोबत जुंपण्यात येणार नाही (ज) वळ अथवा बेलासाठी असलेल्या आरामाच्या जागेत पुरेसी सावली/निवारा, पुरेसे खाद्य, चारा आणि पिण्याचे पाणी उपलब्ध असावे. आरामाची जागा नीटनेटकी, स्वच्छ व आरोग्यदायी असावी;


आयोजकांनी उत्सवामध्ये नोंदणीकृत पशुवैद्यकीय व्यवसायाची सेवा किंवा पशुरुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध असल्याची खात्री


 आयोजकांनी बैलगाडी शर्यत आयोजित करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या प्राण्याला कोणत्याही व्यक्तीकडून किंवा त्याचा प्रभार असणाऱ्या व्यक्तीकडून बैलगाडी शर्यती पूर्वी किंवा दरम्यान कोणत्याही साधनांद्वारे कोणतीही वेदना किंवा यातना दिली जाणार नाही,


आयोजक, बैलांना किंवा वळूना शर्यती आगोदर किंवा त्यादरम्यान कोणतीही उत्तेजक औषधिद्रव्ये, अल्कोहल, क्षोभक इत्यादी दिली जात नसल्याची खात्री करील :


शर्यतीच्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कोणत्याही गाडीवानाला अल्कोहल किंवा मादकद्रव्ये वापरण्यास किंवा बाळगण्यास मनाई असेल.


शर्यतीच्या वेळी कधीही ज्या वळू अथवा बैलांमध्ये थकवा, निर्जलीकरण, अस्वस्थपणा, घोणा फुटणे, दुखापत इत्यादी लक्षणे उक्त अधिकाऱ्यांना स्वतःहून किंवा प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे आढळून आल्यास, अशा वळू अथवा बैलांना बैलगाडी शर्यतीमध्ये भाग घेण्यास परवानगी देण्यात येणार नाही.


प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत जिल्हा समितीदेखील बैलगाडी शर्यतीच्या आयोजनावर लक्ष ठेवील आणि बैलगाडी शर्यत या नियमांच्या शर्तीनुसार आयोजित केली जात असल्याची सुनिश्चिती करील.


प्रेक्षकांच्या सुरक्षेची व्यवस्था 


आयोजक, बैलगाडी शर्यतीच्या वेळी वैद्यकीय सेवा किंवा रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून दिली आहे याची सुनिश्चिती करील.


आयोजक, बैलगाडी शर्यतीच्या वेळी प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व सावधगिरीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची सुनिश्चित करील. आयोजक, धावपट्टीच्या दोन्ही बाजूस प्रतिबंधात्मक कठडे उभारील अथवा इतर सुरक्षेचे उपाय योजील.


बैलगाडीच्या शर्यती दरम्यान गाडीवानास, बैलगाडीच्या चाकात वा इतरत्र अडकून अपघात होऊ शकेल, अशा स्वरूपाचे कोणतेही सेल अथवा तत्सम स्वरूपाचे कपडे परिधान करण्यास परवानगी देण्यात येणार नाही.


 आयोजकांनी अहवाल, आयोजनाचे चित्रीकरण, इत्यादी सादर करणे. (१) आयोजक, स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तींची माहिती, बैलगाडी शर्यतीचा अनुपालन अहवाल आणि संपूर्ण आयोजनाचे डिजीटल स्वरूपातील चित्रीकरण बैलगाडीची शर्यत समाप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करील.


जर बैलगाडी शर्यतीचे आयोजन हे अधिनियम आणि नियमांतील शर्तींनुसार झाले असल्याची जिल्हाधिकाऱ्याची खात्री पटली असेल तर तो, आयोजकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत, आयोजकाला प्रतिभूती ठेव परत करील.


जिल्हाधिकाऱ्यांस पुढील प्रकरणी प्रतिभूती ठेव जप्त करता येईल आणि बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यास आणि यापुढे अशी शर्यत आयोजित करण्यासाठी परवानगी मागण्यास मनाई करता येईल...


(एक) उक्त अधिकाऱ्यांच्या अहवालावरून जर आयोजकांनी अधिनियम किंवा नियमांच्या किंवा परवानगीच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन केले असेल तर (दोन) जर आयोजकांनी स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तींची माहिती, बैलगाडी शर्यतीचा पूर्तता अहवाल आणि संपूर्ण शर्यतीचे डिजीटल स्वरूपातील चित्रीकरण सादर करण्यात कसूर केली असेल तर


(तीन) कोणत्याही व्यक्तीकडून किंवा प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणाऱ्या जिल्हा सोसायटीकडून स्पर्धा सुरू झाल्यापासून अठ्ठेचाळीस तासांच्या आत जिल्हाधिकान्यास कोणत्याही शतांचा भंग झाल्याविषयीची तक्रार प्राप्त झाली असेल तर आणि आयोजकाने शर्तीचा भंग केला असल्याची जिल्हाधिकाऱ्याची खात्री पटली असेल तर.


(४) उप-नियम (३) च्या खंड (तीन) अन्वये कोणतीही तक्रार प्राप्त झाली असेल तर, जिल्हाधिकारी, अशी तक्रार प्राप्त झाल्यापासून तीस दिवसांच्या आत त्यानुसार निर्णय घेईल.



अधिनियम, नियम आणि परवानगीचे उल्लंघन केल्याचा परिणाम - जर कोणत्याही गाडीवानाने अधिनियमाच्या या नियमांच्या व देण्यात आलेल्या परवानगींच्या कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळून आले तर त्यास अधिनियम व नियमान्वये लादता येईल. अशा कोणत्याही शास्तीखेरीज, अन्य शास्ती लागण्यात येईल, तसेच भविष्यात कोणत्याही बेलगाडी शर्यतीमध्ये सहभाग घेण्यासाठी मनाई करण्यात येईल.



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह'