Buldhana Tiger Terror : काही दिवसांपूर्वी राज्यात कोरोना (Coronavirus) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जमावबंद, संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच अनेक कठोर निर्बंधही लावण्यात आले होते. प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सध्या संपूर्ण राज्यभरातील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. परंतु, बुलढाण्यातील खामगावमध्ये पुन्हा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचं कारण कोरोनाचा प्रादुर्भाव किंवा हिंसाचार वैगरे नसून तर एक वाघ (Tiger) आहे. बुलढाण्यात एका वाघामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात वाघ शिरला आहे. खामगाव शहराच्या रायगड कॉलनी भागातील नाल्यात हा वाघ लपून बसल्याची माहिती आहे. वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून या वाघाचा शोध सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या भागात जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. एवढंच नव्हेतर वाघ असलेल्या भागांत कलम 144 (Section 144) लागू करण्यात आलं आहे. तसेच, वाघ असलेल्या भागांत नागरिकांना मुक्त संचार करण्यासही बंदी घालण्याता आलं आहे.
खामगाव शहरातील वाघ असलेल्या भागात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. रात्री उशिरापर्यंत वाघाचं सर्च ऑपरेशन करण्यात आलं आहे. पण, अंधारामुळे वाघ न आढळल्यानं सर्च ऑपरेशन थांबविण्यात आलं. वन विभागाने या परिसरात वाघाचा शोध घेण्यासाठी 10 नाईट व्हिजन ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. आज सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरु करण्यात येणार आहे. परिसरात वाघ असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे, त्यामुळे संपूर्ण परिसर दहशतीखाली आहे. आधी कोरोना आणि आता चक्क वाघामुळं लावलेल्या जमावबंदीमुळं नागरिकही त्रस्त झाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :