Buldhana News Update : राजकारण्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. नेते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मौज मजा करण्यात व्यस्त आहेत. तर इकडे शेतकरी संकटात सापडलाय. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी  शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केली आहे.  


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. 


"राज्यातील शेतकरी पावसामुळे दुबार पेरणीच्या संकटात आहे. अनेक ठिकाणी बोगस बियाणे, बोगस खते शेतकऱ्यांना विकली जात आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी संकटात सापडलेला असताना राज्यातील राजकारणी आपल्या राजकारणात व्यस्त आहेत. अनेक आमदार, खासदार हे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मौज मजा करत आहेत. आपल्या विजयाचा जल्लोष करत आहेत. परंतु, इकडे संकटात सापडलेल्या  शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही, अशी टीका रविकांत तुपकर यांनी केली आहे.  


तुपकर म्हणाले, "आमदार आणि खासदार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मौज मजा करत आहेत. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरी राज्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी." 


जूनचा पूर्ण महिना कोरडा गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी झाली नाही. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे त्यांना जून मध्ये पाऊस न झाल्यामुळे  आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. यातच अनेक बियाणांच्या कंपन्या शेतकऱ्यांना बोगस बियाने देत आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांना मदत करवी असे तुपकर यांनी म्हटले आहे. 


महत्वाच्या बातम्या


Maharashtra Krushi Day: महाराष्ट्र सुजलाम, सुफलाम होण्यासाठी प्रयत्न करु, मुख्यमंत्री शिंदेंनी कृषी दिनाच्या शेतकऱ्यांना दिल्या शुभेच्छा


Himanta Biswa Sarma : मसाल्यांच्या उत्पादनात आसामचा मोठा वाटा, दरवर्षी राज्यात 3.1 लाख मेट्रिक टन उत्पादन : मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा