बुलढाणा : बुलढाण्यात आयुर्वेदिक जडीबुटीच्या नावाखाली रुग्णांना गंडवणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. हे बोगस डॉक्टर शहराच्या मध्यवर्ती भागात स्टॉल लावून आयुर्वेदिक जडीबुटीच्या सहाय्याने सांधेदुखी बरी करतो, असा विश्वास रुग्णांना देऊन औषधी विकत होते. बुलढाणा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन बुलढाणा शहर पोलिसांनी त्यांना अटक केली. हे दोन्ही डॉक्टर हरियाणातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बुलढाण्यातील मध्यवर्ती भागात दोन बोगस डॉक्टरांनी रुग्णांना आयुर्वेदिक जडीबुटीने सांधेदुखी बरी करुन देतो, असा दावा केला होता. त्यांचा दावा खरा मानत सांधेदुखी बरी होण्याच्या आशेने भोळ्याभाबड्या लोकांनी इथे रांग लावली होती. यासाठी हे भामटे प्रत्येक रुग्णांकडून 200 रुपये घेऊन औषध देत होते. या ठिकाणाहून जाणाऱ्या काही पत्रकारांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. तात्काळ पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि या दोन बोगस डॉक्टरांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील जडीबुटी सदृश औषधी ताब्यात घेतली.
तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन या दोन्ही बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. विनोद शर्मा आणि कपिलकुमार सुशीलकुमार अशी या बोगस डॉक्टरांची नाव असून ते हरियाणातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याआधी दोघांनी गेल्या महिन्यात कॅम्प घेतला होता तर कालच त्यांनी इथे स्टॉल लावला होता. परंतु वेळीच त्यांचा बोगसपणा लक्षात आल्याने पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- मसाले विक्री करणारा बनला होता अस्थिरोगतज्ञ, वसईत बोगस डॉक्टरांची मालिका सुरुच
- Bogus Doctor : हिंगोलीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश, तीन क्लिनिकवर आरोग्य प्रशासनाची कारवाई
- बोगस डॉक्टरची शस्त्रक्रिया महिलेचे दोन्ही गुडघे निकामी, आठ रुग्णांना कायमचे अपंगत्त्व
- बोगस डॉक्टर सुनिल वाडकरची पत्नीही उचापतखोर; रुग्णालयात चालवायची गर्भपात केंद्र
- बोगस मेडिक्लेम पास करणाऱ्या डॉक्टर आणि लॅब चालकांचा भांडाफोड, विमा कंपन्यांकडून लाटायचे दोनशे ते तीनशे पट रक्कम