वसई-विरार  : वसई-विरार शहरात बोगस डॉक्टरांची प्रकरणे एका मागून, बाहेर येत आहेत.  पालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेला बोगस डॉक्टर सुनील वाडकर याच्या पत्नी डॉ आरती वाडकर ही दंतचिकित्सक असताना खासगी रुग्णालयात गर्भपात केंद्र चालवत असल्याची प्राथमिक माहिती तपास उघड झाली आहे. या प्रकरणात आता पोलीस प्रमाणपञाची सत्यता तपसात आहेत.  डॉ. आरती वाडकर विरोधात विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आता पती पत्नी दोघेही फरार झाले आहेत.  


  बोगस डॉक्टर सुनिल वाडकरच्या प्रकरणानंतर आता त्याची पत्नी डॉ. आरती वाडकरचे देखील एक प्रकरण बाहेर आलं आहे. ती दंतचिकित्सक असताना,  चक्क सुनील वाडकरच्या रुग्णालयात गर्भपात केंद्र चालवायची. पोलिसांना तपासात ठाणे जिल्हा रुग्णालयातून गर्भपात केंद्राच्या मान्यतेच पञ मिळालं आहे. त्यामुळे ही दंतचिकित्सक असताना तिला हे प्रमाणपञ कसं मिळालं. तिने ही आपल्या पतीसारख बोगस डॉक्युमेंटच्या आधारे हे प्रमाणपञ तर मिळवलं नाही. याबाबत सध्या विरार पोलीस तपास करत आहेत.  विरार पोलिसांनी आरती वाडकरविरोधात महापालिकेची फसवणूक करणे, तसेच चोरी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. आता पोलीसांनी पती पत्नीच्या दोघांच्या शोध मोहिमेसाठी तीन विशेष पथक काढले आहेत.  


 वसई-विरार परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं  वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच पोलीस यंञणाही अशा डॉक्टरांना वाचवण्याच प्रयत्न करत असल्याचा आरोप होतोय.  तेथे सुनिल वाडकरला अटक केल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयातील रजिस्टर, संगणक, सीसीटीव तसेच इतर साहित्य जप्त करणे आवश्यक होते. मात्र पोलिसांनी हेतूपुरस्सर दुर्लक्ष केल्याने सर्व साहित्य आता गायब झाले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपध्दतीवर संशय व्यक्त होत आहे.   


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha