Buldhana News : विज्ञान, माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या जमान्यातही हैद्राबाद येथील जिम व्यावसायिकांना (Gym Owner) खामगाव येथे बोलावून 'सुलेमानी पत्थर' (Sulemani Patthar) देतो असे सांगून तब्बल 6 लाखांची फसवणूक केली आहे. जिम व्यावसायिकाने फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर खामगाव पोलीसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक करून चौकशी सुरू केली आहे. नेमका काय असतो हा 'सुलेमानी पत्थर' आणि काय आहे नेमके प्रकरण?


आमिषाला बळी पडून कशी आर्थिक फसवणूक
 आजच युग हे विज्ञान, माहिती व तंत्रज्ञानाच जरी असलं तरी या युगातही काही लोक आमिषाला बळी पडून कशी आर्थिक फसवणूक करतात? याचा प्रत्यय आलाय बुलढाण्यातील खामगाव मध्ये.. झालं असं की, हैदराबाद जवळील बाला नगर येथील 'साईबाबा मुथ्याल बंडा' या जिमचालकाला खामगावात राहणाऱ्या एका व्यक्तीने व्हाट्सएपच्या माध्यमातून एक व्हिडिओ पाठवून माझ्याजवळ " सुलेमानी पत्थर " असून तुम्हाला पाहिजे असल्यास आम्ही देऊ शकतो अस सांगितलं. जिम चालकानेही या पत्थर बाबत बरच काही वाचलं होतं आणि पुढील बोलणी होऊन हा पत्थर चा सौदा 10 लाख रुपयांत ठरला. ठरल्या प्रमाणे जिमचालक रक्कम घेऊन खामगाव येथे पोहचल्यावर 7 ते 8 लोकांनी मिळून जिमचालकाला प्लास्टिकचा तुकडा दाखवून " डेमो "दिला. यात या व्यक्तीच्या हातात तो पत्थर दिला की ब्लेड ने कापले तरी जखम होत नाही, नेल कटर ने नख कापले जात नाही, कैचीने केसही कापले जात नाही असं हातचलाखीने भासवले आणि ठरल्याप्रमाणे ६ लाख रुपये घेऊन पोबारा केला. त्यानंतर या जिमचालकाला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्याने खामगाव पोलीसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी काही तासातच 3 भामट्यांना अटक केली असून इतर चौघे फरार आहेत.



नेमका काय आहे 'सुलेमानी पत्थर'? आणि त्याबाबत अफवा, जाणून घेऊयात.
सुलेमानी पत्थर हा एक विशिष्ट प्रकारचा दगडाचा तुकडा असतो.
हा पत्थर ज्यांच्याकडे असतो त्याला कुठलीही शारीरिक इजा होत नाही.
हा पत्थर ज्यांच्याकडे असतो त्याला बंदुकीची गोळी, शस्त्रांचे वार लागत नाही.
या पत्थर मुळे पैसा येतो......वेगैरे...वेगैरे..अशा अफवा पसरविल्या जात असल्याने अनेक जण या पत्थरच्या आमिषाला बळी पडतात व आपली आर्थिक फसवणूक करून घेतात.....


" ABP माझा "च्या वतीनेही आपल्याला आवाहन करण्यात येत आहे की, अशाप्रकारच्या अंधश्रद्धांना बळी पडू नये. तसेच खामगाव पोलिसांनी ही आवाहन केलंय की, सुलेमान पत्थर असा कुठलाही दगड नसतो. त्यामुळे असा काही प्रकार आढळल्यास पोलीसांना त्वरित कळवा. 


हेही वाचा :