Buldhana News: बुलढाणा जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले असून काही गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. खामगाव तालुक्यातील गारडगावाला नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात बाप-लेक अडकल्याचे समजताच आपत्ती व्यवस्थापन विभागाला याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानंतर पोकलँडच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्यात आले.
राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. बुलढाण्यात झालेल्या जोरदार पावसाने पुरस्थिती निर्माण झाली असून (flood in Buldhana) प्रशासनाने ग्रामस्थांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. दरम्यान, गरडगाव व गावठाण या दोन गावांमधून नदी वाहते. त्या नदीला पूर आल्याने दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे..
सांडवा धरणाच्या पाणीपातळीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना
जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पिंप्री गवली या गावाजवळील आवरचे धरण सांडवा पूर्ण क्षमतेने वाहत आहे. तसेच गावात पाणी घुसले असल्याची माहिती चेतन फुंडकर यांनी आमदार आकाशदादा फुंडकर यांना दिली. त्याबाबत तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून वेळ पडल्यास गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाला तयारीत राहण्यास सांगितले. तसेच आवर धरणाच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
अंत्रज , नागपूर, हिवरखेड, व ज्ञानगंगा नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन आमदार आकाश फुंडकर यांनी केले आहे. महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने अलर्ट मोडवर रहावे, कोणतीही जीवित हानी होता कमा नये, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा:
Kolhapur Rain Update : कोल्हापुुरात पावसाची उसंत; प्रयाग चिखलीत संगमावर पंचगंगा नदी सर्वदूर पसरली
राज्यातील कोणत्या भागात मुसळधार पाऊस? कुठं कुठं झालं जनजीवन विस्कळीत? सविस्तर माहिती एका क्लिकवर