Buldhana : आद्यकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यातील पहिलं महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलन बुलढाण्यात पार पडलं. या साहित्य संमेलनाचं उद्घाटन चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं.      या एकदिवसीय संमेलनात मुंबईतील ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळेदेखील उपस्थित होते. यावेळी चर्चा करताना नागनाथ मंजुळे म्हणाले की, आज जागतिक पुस्तक दिन आहे. या निमित्ताने, आज राज्यात जिमपेक्षा जास्त ग्रंथालय असणे आवश्यक आहे. या संमेलनात रसिकांनी मोठी गर्दी केली आहे. दिवसभर चार सत्रांत हे राज्यस्तरीय साहित्य संमेलन पार पडणार आहे. या साहित्य संमेलनात राज्यभरातून असंख्य मान्यवर साहित्यप्रेमी उपस्थित झाले आहेत. 


वाचनाला महत्व दिलं पाहिजे, वाचनाने विचार समृद्ध होतात - नागराज मंजुळे


"वाचनाला महत्व दिले पाहिजे, वाचनातून विचार समृद्ध होतात त्यासाठी महापुरुषांचे विचार वाचायला शिकले पाहिजे" असे प्रतिपादन मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले आहे. वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनाला साहित्यिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी साहित्यिक अर्जुन डांगळे, साहित्यिक सदानंद देशमुख, मंत्रालय सचिव सिद्धार्थ खरात, रविकांत तुपकर, दिलीप जाधव हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अनेक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या साहित्य संमेलनाला बुलढाणा येथे मोठा प्रतिसाद मिळाला. साहित्य संमेलनात विद्रोही शाहीर चरण जाधव यांच्या गीत गायनाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले.


बुलढाण्यात साहित्य संमेलनामुळे साहित्यिकांत चैतन्य


आजच्या साहित्य संमेलनामुळे बुलढाण्यासह जिल्ह्यांत साहित्यिकांत नवचैतन्य निर्माण झालं आहे. आद्यकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष रविकांत तुपकर यांनी या संमेलनाच्या आयोजनासाठी मोठं सहकार्य केलं. आज सकाळ पासून चार सत्रांत हे संमेलन पार पडत असून यासाठी राज्यासह जिल्हाभरातून साहित्यिक बुलढाण्यात दाखल झाले आहेत.


महत्वाच्या बातम्या :