दरम्यान, शाळेला भेट देण्याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विष्णु सावरा यांच्या ताफ्याला घेराव घालून त्यांना काळे झेंडे दाखवले. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर कार्यकर्ते पांगले. यावेळी एकनाथ खडसे आणि पांडुरंग फुंडकरही त्यांच्यासोबत होते.
बुलडाणा बलात्कार: आश्रमशाळेतील आणखी एका मुलीवर लैंगिक अत्याचार
दुसरीकडे आश्रमशाळेतील मुलींच्या सुरक्षितता धोक्यात आणल्याने आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार : केसरकर
या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल आणि आरोपींवर पोस्को कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल, असं आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे.
बुलडाणा बलात्कार : आरोपी इतू सिंग आश्रमशाळेसाठी मुली जमवायचा
काय आहे प्रकरण?
खामगाव तालुक्यातील पाळा इथं निनाभाऊ कोकरे प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा आहे. इथे पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग भरतात. दिवाळीच्या सुट्ट्यामुळे बहुतेक विद्यार्थी गावी गेले आहेत. मूळची जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या एक विद्यार्थिनीही या शाळेत शिकते. ती सुट्टीसाठी घरी आली, तेव्हा तिला पोटदुखीचा त्रास होत असल्याचं, तिने पालकांना सांगितलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचं उघड झालं.
पीडित 10 वर्षीय चिमुकली चौथीत शिकते. तिच्यावर अत्याचार झाल्याचं समजल्यानंतर, पालकांनी हलखेडा गावच्या पोलीस पाटील आणि सरपंचांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याबाबतची तक्रार पोलिसात दिली आणि हे मोठं प्रकरण जगासमोर आलं.
बुलडाण्यातील बाळा शिवार परिसरातील कोकरे आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली होती. विशेष म्हणजे ही घटना दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी घडली आहे.
बुलडाण्यातील आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
बुलडाणा बलात्कारप्रकरणी कोणा-कोणाविरोधात गुन्हा?
*इतूसिंग पवार – मुख्य आरोपी
*भरत लाहुडकर – मुख्याध्यापक
*दिगंबर खरात – शिक्षक
*स्वप्नील लाठे – प्रयोगशाळा सहाय्यक
*नारायण आंबोरे – वसतीगृह अधीक्षक
*दीपक कोकरे – आश्रमशाळा मदतनीस
*विजय कोकरे – क्लार्क
*ललिता वजिरे – वसतीगृह अधीक्षक
*मंथन कोकरे – स्वयंपाकी
*राऊत मावशी – स्वयंपाकी
बुलडाणा: आश्रमशाळेतील बलात्कारप्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना
आश्रमशाळेत डझनभर आदिवासी मुलींवर बलात्कार : नवाब मलिक
दरम्यान, बुलडाण्यातील आश्रमशाळेत डझनभर आदिवासी मुलींवर बलात्कार झाल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा आहे. शिवाय महिलांवरील अत्याचारांच्या घटनांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची हकालपट्टी करा, अशी मागणी नवाब मालिक यांनी केली.
याप्रकरणी सुरुवातील 7 जणांना अटक केली होती. तर गुरुवारी रात्री आणखी 4 जणांना अटक बेड्या ठोकल्या. त्यामुळे आतापर्यंत 11 जणांना अटक झाली आहे.
बुलडाणा : आश्रमशाळेतील बलात्कारप्रकरणी आणखी 4 जणांना बेड्या
तपासासाठी एसआयटीची स्थापना
बलात्कारप्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिले आहेत. याशिवाय नागपूर सीआयडी विभागाच्या पोलीस अधीक्षक आरती सिंग या खामगावला भेट देणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास बुलडाण्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्वेता खेडेकर यांच्या निदर्शनाखाली होणार आहे.