Breaking News LIVE : पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांचा राजीनामा

Breaking News LIVE Updates, 28 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Sep 2021 03:14 PM
8 तास चौकशीनंतर अनिल परब ईडी कार्यालयातून बाहेर

8 तास चौकशीनंतर अनिल परब ईडी कार्यालयातून बाहेर पडले.



 



अनिल परब म्हणाले, ‘मला विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी दिली. भविष्यात जेव्हाही मला चौकशीसाठी बोलवलं जाईल मी हजर राहीन’

काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू यांचा पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू यांचा पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा 

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंह भाजपच्या वाटेवर? आज अमित शाह यांची भेट घेणार!

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅ. अमरिंदर सिंह भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजधानी दिल्लीत आहे. आज दुपारी 4 वाजता ते केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शाह तसंच कार्यध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असतानाच त्यांनी आपल्याला पक्षात अपमानित व्हावं लागल्याची भावना व्यक्त केली होती.   


पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू आणि कॅ. अमरिंदर सिंह यांच्यातील बेबनावाचं पर्यावसान अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यात झालं तर चरणजीत सिंह चन्नी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली.  

नांदेड : देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर! 30 ऑक्टोबरला होणार मतदान

देशभरातील एकूण 33 मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा देखील समावेश आहे. पुढील महिन्यात 30 ऑक्टोबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर मतमोजणी 2 नोव्हेंबर रोजी होईल. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. 


निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीप्रमाणे, या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 8 ऑक्टोबरपर्यंत आहे. 11 ऑक्टोबरपर्यंत अर्जांची छाननी आणि 13 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. यानंतर 17 दिवसांनी म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी मतदान होईल, तर 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. 

मुरगूडमध्ये किरीट सोमय्यांना विरोध करणार नाही - मुरगूड नगराध्यक्ष

मुरगूडमध्ये किरीट सोमय्या यांना कोणताही विरोध करणार नाही


मुरगूड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांचे आश्वासन


मुश्रीफ यांनी केलेल्या आवाहनाला नागरिक प्रतिसाद देणार


गर्दी टाळण्यासाठी मुरगूडचा आजचा बाजार मात्र बंद ठेवला

Mumbai Vaccination : मुंबईत काल महिला विशेष लसीकरण सत्रात 1 लाख 26 हजार 419 महिलांना लस

Mumbai Vaccination : काल मुंबई महापालिकेनं महिलांसाठी विशेष लसीकरण सत्र आयोजित केलं होतं. काल मुंबईतील सर्व सरकारी आणि सार्वजनिक केंद्रांवर महिलांचं लसीकरण करण्यात आलं. कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने काल (दिनांक 27 सप्टेंबर 2021) मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवले गेले.


काल दिवसभरात महानगरपालिका, शासकीय आणि त्यासोबत खासगी लसीकरण केंद्र असे सर्व लसीकरण केंद्रांवर मिळून एकूण 1 लाख 26 हजार 419 महिलांना लस देण्यात आली. महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्र येथील महिलांसाठीच्या विशेष सत्राचा विचार करता, एकूण 1 लाख 13 हजार 935 महिलांना लस दिली गेली. यामध्ये महिलांना थेट येवून (वॉक इन) कोविड लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा घेण्याची मुभा देण्यात आली होती.

परीक्षेच्या गोंधळाला राज्य सरकार नाही, तर कंपनीच जबाबदार: न्यासा कंपनी संचालक पुनीत कुमार
आरोग्य विभागाची परीक्षेत नेमका काय गोंधळ उडाला? आरोग्य विभागाची परीक्षा काही तास आधी का पुढे का ढकलण्यात आली? विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापनंतर न्यासा कंपनीची माफी, आरोग्य विभागच्या परिक्षेला जबाबदार मानल्या जाणाऱ्या न्यासा कंपनीचा म्हणणं काय? ब्लॅक लिस्ट कंपनी म्हणून आरोप केले जात असताना परीक्षेचा काम कसे मिळाले? वायरल ऑडिओ क्लीप मध्ये न्यासाच नाव घेण्यात आल्यानंतर न्यासाच काय संबंध आहे? पुढे होणाऱ्या आरोग्य विभागच्या परिक्षेसाठी न्यासाची तयारी काय ? या सर्व प्रश्नांवर न्यासा कंपनी संचालक पुनीत कुमार यांच्याशी बातचीत

 

आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; 24 आणि 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा

Maharashtra Health Dept Exam Date Update : आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षेचा मुहूर्त अखेर ठरला. वर्ग क पदासाठी 24 ऑक्टोबरला तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. सर्व परीक्षार्थींना 9 दिवस अगोदरच प्रवेशपत्र मिळणार आहे. दरम्यान, यापूर्वी परीक्षा आदल्या दिवशी रात्री अचानक स्थगित करण्यात आली होती. यामुळं अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला होता. 


ऐन वेळी आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द झाल्यामुळं परीक्षा केंद्रावरती पोहोचलेल्या लाखो उमेदवारांना मनस्ताप आणि आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यावेळेला रद्द झालेली परीक्षा होणारं की नाही? याबद्दलही साशंकता असून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलं नव्हतं. राजेश टोपे यांनी काल (सोमवारी) मुंबईत आरोग्य विभागाची बैठक घेतली जाईल, या बैठकीत परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या जातील, असं सांगितलं होतं. त्यानुसार वर्ग क पदासाठी 24 ऑक्टोबर तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे.

पार्श्वभूमी

Health Dept Exam Date: आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; 24 आणि 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा


Maharashtra Health Dept Exam Date Update : आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षेचा मुहूर्त अखेर ठरला. वर्ग क पदासाठी 24 ऑक्टोबरला तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. सर्व परीक्षार्थींना 9 दिवस अगोदरच प्रवेशपत्र मिळणार आहे. दरम्यान, यापूर्वी परीक्षा आदल्या दिवशी रात्री अचानक स्थगित करण्यात आली होती. यामुळं अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला होता. 


ऐन वेळी आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द झाल्यामुळं परीक्षा केंद्रावरती पोहोचलेल्या लाखो उमेदवारांना मनस्ताप आणि आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यावेळेला रद्द झालेली परीक्षा होणारं की नाही? याबद्दलही साशंकता असून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलं नव्हतं. राजेश टोपे यांनी काल (सोमवारी) मुंबईत आरोग्य विभागाची बैठक घेतली जाईल, या बैठकीत परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या जातील, असं सांगितलं होतं. त्यानुसार वर्ग क पदासाठी 24 ऑक्टोबर तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे.


यंदाही कोरोना सावटात आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव, लसीचे दोन डोस झालेल्यांनाच मंदिरात प्रवेश


महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदाही कोरोनाच्या सावटात पार पडणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या दिवशी नवरात्रोत्सव साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे. मंदिर समितीनं दिलेल्या माहितीनुसार, यंदा नवरात्रोत्सवात दररोज 60 हजार भाविकांनाच तुळजाभवानी मातेचं दर्शन घेता येणार आहे. तसेच कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी नवरात्रोत्सवात तीन दिव, उस्मानाबाद जिल्हा बंदी असणार आहे. या काळात तुळजापुरात प्रशासनाच्या वतीनं संचारबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत.


पौर्णिमाला कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यासह देशभरातून अनेक भाविक तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या तीन दिवसांत एकही वाहन किंवा भाविकांना जिल्ह्यात येण्यास बंदी असेल. 


पौर्णिमेच्या आगोदर एक दिवस, पौर्णिमेच्या दिवशी आणि पौर्णिमेनंतर एक दिवस, असे तीन दिवस तुळजापुरात संचारबंदी असणार आहे. तर उस्मानाबाद जिल्हा सीमा बंदी लागू असणार आहे. या काळात सर्व प्रवेशाच्या सीमा बंद करून तिथे पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकारी यांचा कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्त बैठकीत हे सर्व निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.