Breaking News LIVE : बंगालचा उपसागरातील अतीतीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे पुढील 6 तासात गुलाब चक्रीवादळात रुपांतर

Breaking News LIVE Updates, 25 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Sep 2021 06:08 PM
बंगालचा उपसागरातील अतीतीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे पुढील 6 तासात गुलाब चक्रीवादळात रुपांतर

बंगालचा उपसागरातील अतीतीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे पुढील 6 तासात गुलाब चक्रीवादळात रुपांतर. दक्षिण उडीशा, उत्तर आंध्र प्रदेशदरम्यानच्या कलिंगपट्टणमजवळ किनारपट्टीला 26 सप्टेंबरला संध्याकाळी हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता. बंगालच्या उपसागरात 2021 मध्ये निर्माण होणारं तिसरे चक्रीवादळ असणार, ह्याआधी तौक्ते, यास चक्रीवादळे 2011-21 सालात सप्टेंबर महिन्यात निर्माण होणारं हे तिसरं चक्रीवादळ, 1990-2021 सालात सप्टेंबर महिन्यात 14 चक्रीवादळं निर्माण झालीत, गुलाब पकडून 15 वं चक्रीवादळ.


चक्रीवादळाचे तीव्रता कमी झालेले क्षेत्र महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज. 



महाराष्ट्रात 26 ते 29 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, वाऱ्यांचा वेग अधिक राहण्याचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता.


ह्याच पार्श्वभूमीमुळे रविवारपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार.


विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा काही ठिकाणी पावसाची शक्यता


उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात प्रभाव अधिक राहण्याचा अंदाज

ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाचा भाऊ एगिसिलाओस डेमेट्रीएड्सला गोव्यात अटक केली

ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाचा भाऊ एगिसिलाओस डेमेट्रीएड्सला गोव्यात अटक केली आहे.

कार्यक्रमस्थळी ज्या लोकांनी मास्क घातले नाही, त्यांना पोलिसांनी पकडा आणि घेऊन जा : अजित पवार

कार्यक्रमस्थळी ज्या लोकांनी मास्क घातले नाही, त्यांना पोलिसांनी पकडा आणि घेऊन जा : अजित पवार

युवकांच्या भविष्याशी कोणतेही सरकार असो त्यांनी खेळू नये : आमदार रोहित पवार

परीक्षा अचानक रद्द झाल्या हे अत्यंत चुकीचे आहे. एका कंपनीमुळे जर युवकांना अडचणी येणार असतील तर त्या आमच्यासारख्या युवा आमदारांना चालणार नाही. लवकरात लवकर परीक्षा घेण्यात याव्या, वेळ पडली तर वरिष्ठ अधिकारी नेमावा. युवकांच्या भविष्याशी कोणतेही सरकार असो त्यांनी खेळू नये. 

कोल्हापूर-सांगली या रस्त्याचे पुढच्या सहा महिन्यात भूमिपूजन करून काम सुरू करु : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

एकाच मंडपात 100 लग्न अशी आज अवस्था झालीय. सगळेच आमदार, खासदार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील कामाबाबत एकच कार्यक्रम होतोय. कोल्हापूर-सांगली या रस्त्याचे पुढच्या सहा महिन्यात भूमिपूजन करून काम सुरू करु. लोकांची इच्छा आणि अपेक्षा असल्याने काम होत राहते : नितीन गडकरी

राज्यातील कॉलेज लवकरच सुरू होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयार राहावं : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

राज्यातील कॉलेज लवकरच सुरू होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयार राहावं. सर्व कुलगुरूंना याबाबत सुचना देण्यात आल्या असून येत्या आठ दिवसात त्याबाबत अहवाल तयार होईल अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे दिली आहे. दरम्यान, अहवाल आल्यानंतर तो मुख्यमंत्र्यांना दाखवला जाईल आणि कॉलेजबाबतचा निर्णय होईल. त्यामुळे कॉलेज आता सुरू होणार या मानसिकतेमध्ये विद्यार्थी आणि पालकांनी राहावं असं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू करणार, आरोग्याचे नियम पाळण्याच्या अटींवर परवानगी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. 

22 ऑक्टोबरनंतर सिनेमागृह सुरु होणार, सिनेमागृह सुरु करण्यासाठी सरकार एसओपी तयार करणार, मुख्यमंत्र्यांनी घेतला महत्वाचा निर्णय 

Breaking News LIVE : 22 ऑक्टोबरनंतर सिनेमागृह सुरु होणार, सिनेमागृह सुरु करण्यासाठी सरकार एसओपी तयार करणार, वर्षा बंगल्यावर थिएटर्स मालकांची बोलावली होती बैठक,  बैठकीला मुख्यमंत्री उद्वव ठाकरे, मुख्य सचिव, रोहित शेट्टी आणि संजय राऊत उपस्थित, थिएटर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतला महत्वाचा निर्णय 

खासदार नवनीत राणांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल..

'तीन तिघाडी काम बिगाडी' असं राज्यातील सरकार आहे, लाज वाटली पाहिजे या सरकारला, उद्धव ठाकरेंनाही, साध्या परीक्षेचही नियोजन करता येत नाही, जे विद्यार्थी इतर जिल्ह्यात परीक्षेसाठी गेलेत, त्यांनी राहण्याचा खर्च केला, आता त्यांचा खर्च कोण देणार असाही सवाल खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.

सिंधुदुर्गातील मालवण चिवला समुद्रात रापण मासेमारी करायला गेलेली होडी पलटली, 12 मच्छिमार बचावले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिवला समुद्रात रापण मासेमारीचे जाळे टाकण्यासाठी जात असलेली महेश हडकर रापण संघाची 'दर्या सागर' ही होडी लाटांच्या तडाख्यात समुद्रात पलटलली. होडी पलटल्यानंतर होडीतील १० ते १२ मच्छिमार समुद्रात फेकले गेले. सुदैवाने सर्व मच्छिमार बचावले. 

 

होडी पलटल्याची पाहून किनारपट्टीवरील अन्य रापण सदस्य व स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अथक प्रयत्नांअंती होडी व जाळी किनाऱ्यावर आणण्यात आली. मात्र होडी व जाळी यांचे मिळून सुमारे दीड लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती रापण संघाचे महेश हडकर यांनी दिली आहे. 

 

रापण मासेमारीसाठी जाळी व मच्छिमार यांच्या सोबत दर्या सागर ही होडी चिवला किनाऱ्यावर समुद्रात लोटण्यात आली. मात्र अचानक लाटांचा जोर वाढला. मोठ्या लाटा उसळू लागल्या. यात होडी पलटली. मात्र सुदैवाने सर्व मच्छिमार बचावले.

 

सध्या समुद्रातील वातावरण बदललेले असून समुद्र खवळलेल्या स्थितीत आहे. किनारपट्टीवर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असतात. बदलेल्या वातावरणाचा परिणाम समुद्रात पहायला मिळतो. समुद्र कधी शांत तर कधी खवलेल्या स्थितीत असतो. तरी देखील मच्छीमार उदरनिर्वाहासाठी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जातात.
वर्षा बंगल्यावर थिएटर्स मालकांची बैठक सुरु 

वर्षा बंगल्यावर थिएटर्स मालकांची बैठक सुरु ,


बैठकीला मुख्यमंत्री उद्वव ठाकरे, मुख्य सचिव ,
रोहित शेट्टी आणि संजय राऊत उपस्थित ,


थिएटर्स संदर्भात महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता

9व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रम, दोन कवी संमेलने, दोन परिसंवाद व कथाकथन

9व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रम
दोन कवी संमेलने, दोन परिसंवाद व कथाकथन


आंबाजोगाई-


९व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली असून या संमेलनात दोन कवी संमेलन, दोन परिसंवाद व कथाकथन होणार आहेत. संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ कमलाकर कांबळे आहेत. उदघाटक डॉ. अरुण डावळे असून समारोप सत्रातील प्रमुख पाहुणे भगवानराव शिंदे आहेत. हे संमेलन १६ व १७ ऑक्टोबर २१ रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक  सभागृहात होणार आहे. आंबाजोगाईकरांनी या संमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्वागताध्यक्ष कमलताई बरुळे यांनी केले.
२३ निमंत्रीत कवी
ख्यातनाम कवयित्री निशा चौसाळकर यांच्या अध्यक्षते खाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून त्यात 23 कवींचा सहभाग असणार आहे. राजेंद्र रापतवार, शीलाताई कांबळे, इंदूताई पल्लेवार, संध्या सोळंके -शिंदे, डॉ. देवराव चामनर, बाळासाहेब जोगदंड, प्रा.सारिका गुंडरे, आनंद देशपांडे, रवींद्र पांडे, उषा रामधामी, वर्षा मुंडे-कऱ्हाड, मंजुषा कुलकर्णी, वीणा कुलकर्णी, हाजी अब्दुल खालेख, विनोद निकम, रश्मी मुकद्दम- काळे, डॉ अकिला गौस,, वसंत देशमुख, संजय जड, शिल्पा भंडारी, तिलोत्तमा पतकराव, चंदन कुलकर्णी, राजेश रेवले या कवींचा त्यात समावेश असणार आहे. कवी संमेलनाचे सूत्र संचालन प्रा संजय खडप करणार आहेत. सत्राचे संयोजन प्रभाकरराव महानुभाव यांनी केले आहे.
खुले कविसंमेलन
जेष्ठ कवी श्री नागनाथ बडे यांच्या अध्यक्षते खाली खुले कवी संमेलन होणार असून पहिल्या सत्रात बालकवी आपल्या कविता सादर करतील व दुसर्या सत्रात अनेक मान्यवर कवी भाग घेणार आहेत. रेखा देशमुख यांनी या सत्राचे संयोजन केले असून व्यंगकवी भागवत मसने हे सूत्रसंचालन करणार आहेत.
कथाकथन
लोकप्रिय कथाकार श्री गोरख सुजानराव शेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कथाकथन कार्यक्रमात संध्या शिंदे-सोळंके, सागर कुलकर्णी व अर्चना स्वामी त्यांच्या कथा सांगणार आहेत. या सत्राचे संचालन इंदूताई पल्लेवार करणार असून संयोजन वैजनाथ शेंगुळे यांनी केले आहे.
दोन परिसंवाद
९ व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनाची मुख्य संकल्पना 'जेष्ठ नागरिक' ही आहे. या संमेलनात आंबाजोगाईतील जेष्ठांचे साहित्य आणि विविध भाषांतील साहित्यातील जेष्ठांचे चित्रण असे दोन परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत.
आंबाजोगाईतील जेष्ठांचे साहित्य या परिसंवादाचे अध्यक्षस्थान जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष ऍड अनंत जगतकर भूषविणार असून परिसंवादात प्रा. डॉ. शैलजा बरुरे, प्रा. डॉ. देविदास खोडेवाड, डॉ. राजेश इंगोले आणि दगडू लोमटे बोलणार आहेत. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. सुरेश सोनवळकर व संयोजन अनिकेत डिघोळकर यांचे आहे.
विविध भाषेतील साहित्यात जेष्ठ व्यक्तिंचे चित्रण कसे केले गेले आहे, यावर दुसऱ्या परिसंवादात प्रकाश टाकला जाणार आहे. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान ख्यातनाम साहित्यिक बालाजी सुतार भूषविणार आहेत. 
डॉ. वैशाली गोस्वामी, अमृत महाजन, प्रा. डॉ. राजकुमार कांबळे व कलीम अजीम बोलणार असून या सत्राचे संयोजन अनिता कांबळे करीत आहेत. व सूत्र संचालन प्रा. विष्णू कावळे करणार आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रम
आंबाजोगाईच्या जेष्ठ नागरिक संघाने सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम बसवला आहे. हा कार्यक्रम त्यांनी अनेक ठिकाणी सादर केला आहे. दिल्लीत सादर केलेल्या कार्यक्रमाचे मोठे कौतुक झाले होते. तो कार्यक्रम या संमेलनात सादर केला जाणार असून या वेळेस जेष्ठ कलावंतांचे कलादर्शनही होणार आहे. मंगलाताई भुसा आणि श्रीरंग सुरवसे हे संयोजन करीत असून वैशाली भुसा सूत्रसंचालन करणार आहे.
कलादालन
संमेलन परिसरात एक कलादालन असणार आहे. त्यात आंबाजोगाई येथील नामवंत कलाकारांची शिल्पे, चित्रे, फोटो यांची प्रदर्शने असणार असून या कलादालनाचे संयोजन डॉ राहुल धाकडे करीत आहेत. परिसर सजावटीची जबाबदारी वर्षा जालनेकर आणि मुजीब काजी यांनी स्वीकारली आहे.
नातीला पत्र
या संमेलनाच्या निमित्ताने नातीला पत्र अशी पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे संयोजक दगडू लोमटे यांनी सांगितले की, पन्नासहून अधिक जणांनी नातीला पत्र लिहिले असून स्पर्धेचा निकाल समारोप सत्रात जाहीर केला जाईल.


आंबाजोगाईच्या रसिक स्वागत सभासदांनी हे संमेलन आयोजित केले असून जेष्ठ नागरिक संघ व मराठवाडा साहित्य परिषदेने त्यात पुढाकार घेतला आहे.

बार्शी तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस, सोयाबीन पाण्यात, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता

मागील आठवड्याभरापासून उत्तरा नक्षत्रातातील पावसाचा लपंडाव सुरू असताना काल सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात जोरादार वादळी वाऱ्यासह पावसाचे पुनरागमन झाले. मुसळधार झालेल्या पावसाने बार्शीतील जवळगाव मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. काल रात्री पडलेल्या पावसामुळे मात्र शेतकऱ्याच्या हाताशी आलेलं सोयाबीनच मात्रं नुकसान होण्याची शक्यता आहे.  काढणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे. आधीच सोयाबीनचा भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत होता. त्यात हे अस्मानी संकट ऐन काढणीवेळी आल्याने पुन्हा एकदा हाती केवळ नुकसानच लागण्याची शक्यता आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे ओढे-नाले तुडुंब वाहतायत. त्यामुळे अनेक ठिकाणी संपर्क देखील तुटला आहे. अक्कलकोट तालुक्यात देखील हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

पाली जवळील भीषण अपघातात दोन ठार, अपघातात सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोसले यांचा मृत्यू 



जवळील भीषण अपघातात दोन ठार , एक गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री उशिरा घडली, यामध्ये सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोसले आणि महेंद्र गायकवाड हे दोघे जण जागीच ठार झाले असून कांबळे नावाची व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.कार रस्त्याच्या कडेला असलेल्या डिवायडरवर धडकल्याचे दिसून येत आहे, ते तिघेही अंबाजोगाई येथून बीडकडे येत होते 

















 

 



 










जळगावातील शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील राष्ट्रवादी पक्षाच्या वाटेवर
चोपडा येथील सेनेचे माजी आमदार कैलास बापू पाटील हे आज  मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी  पक्षात प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती आहे. पक्षात सातत्याने डावलले जात असल्याच्या भावना कैलास पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये राहिल्याने त्यांनी अनेक वेळा पक्षाच्या विरोधात काम केल्याने पक्षाने त्यांची सेनेतून हकाल पट्टी केली होती,त्यानंतर आज ते आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते राष्ट्रवादी वाटेवर असल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.
राज्यातील कोचिंग क्लासेस सुरु करावेत, संघटनांची राज्य सरकारकडे मागणी


राज्य सरकारने शाळा महाविद्यालय बरोबरच राज्यभरातील कोचिंग क्लास सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी कोचिंग क्लास संघटनाने केली आहे. मागील दीड वर्षांपासून कोचिंग क्लासेस बंद आहेत, संचालकांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झालाय, त्यामुळे जे नियम शाळा महाविद्यालयाना लावले आहेत तेच नियम लावून खाजगी कोचिंग क्लास सुरु करावेत अशी मागणी कोचिंग क्लास संघटनेन केलीय

औरंगाबाद गोल टेकडी अजिंठाजवळ लक्झरी बस पलटली

औरंगाबाद गोल टेकडी अजिंठा जवळ लक्झरी बस पलटली. बस मध्ये होते 30 प्रवासी.. सात जण जखमी आहेत .सर्व प्रवाशांना ट्रॅव्हल्समधून सुखरुप बाहेर काढण्यात पोलिसांना यश. पुण्यावरून रावेरला चालली होती बस...

आरोग्य विभागाची परीक्षा वेळेवर रद्द, बुलढाण्यात बस स्थानकात विद्यार्थ्यांचा आक्रोश

आरोग्य विभागाच्या परीक्षेला निघालेले विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी निघाले असताना प्रवासात असताना ऐनवेळी मेसेजद्वारे माहिती परीक्षा रद्द झाल्याची माहिती मिळाली.  त्यामुळे अनेक विध्यार्थ्यांना मनस्ताप झाला, बुलढाणा येथून शेकडो विध्यर्थी परीक्षा देण्यासाठी अमरावती येथे निघाले असता रात्री 1 वाजता खामगाव बस स्थानकात त्यांना माहिती मिळाल्यावर जवळपास 300 ते 400 विध्यार्थ्यांनी घराकडे परत जाण्यासाठी आताच शासनाने बसची व्यवस्था करावी या मागणीसाठी आक्रोश केला. या वेळी बस स्थानक प्रमुखांच्या नमत्या भूमिकेने रात्री दीड वाजता विशेष बसने हे विध्यार्थी परत आपल्या गावाकडे निघून गेलेत.


 

आरोग्य विभागाची आज होणारी परीक्षा रद्द; सरकारचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

राज्यात आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा  घेतली जाणार होती. पण नेहमीप्रमाणे ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली. त्यामुळे परीक्षांच्या बाबतीत राज्य सरकारचा भोंगळ कारभार नेहमीप्रमाणे चव्हाट्यावर आला असून या निर्णयावर अनेकांनी टीकेची झोड उडवली आहे.

पार्श्वभूमी

आरोग्य विभागाची आज होणारी परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना होणाऱ्या मनस्तापाबद्दल आरोग्य मंत्र्यांची माफी
राज्यात आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. पण नेहमीप्रमाणे ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली. आज आणि उद्या होणारी परीक्षा ही रद्द झाल्याची माहिती शुक्रवारी रात्री नऊ वाजता राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे परीक्षांच्या आयोजनाच्या बाबत राज्य सरकारचा गोंधळ कायम असून त्यामुळे जवळपास आठ लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 


आरोग्य विभागाची आज आणि उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एबीपी माझाला ही माहिती दिलीय. या बातमीनंतर विद्यार्थ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र ही परजिल्ह्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकजण खबरदारी म्हणून आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. शासनाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी संताप व्यक्त करतायत. तर दुसरीकडे परीक्षा केंद्राबाबत झालेल्या घोळमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा झालेला निर्णय योग्यच असल्याचे मत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केलय. 


UPSC मध्ये महाराष्ट्राचे घवघवीत यश! 100  हून अधिक विद्यार्थ्यी उतीर्ण
 केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल शुक्रवारी जाहीर झाला. बिहारच्या शुभम कुमारने देशात पहिला येण्याचा मान मिळवला. या परीक्षेत महाराष्ट्रानेही आपली यशस्वी कामगिरी कायम ठेवली असून एकूण 761 उमेदवारांपैकी राज्यातील 100 हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून मृणाली जोशी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर विनायक नरवाडे हा दूसऱ्या क्रमांकावर आहे. यूपीएससीतील गुणवत्ता यादीत या दोघांनी अनुक्रमे 36 आणि 37 वा क्रमांक पटकावला आहे.
             
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या 2020 सालच्या परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निकालात  पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे.  यामध्ये मृणाली जोशी (36), विनायक कारभारी नरवाडे (37), रजत रविंद्र उभयकर(49), जयंत नाहाटा (56), विनायक महामुनी (95) यांचा समावेश आहे. 


आरसीबीचा सलग दुसरा पराभव, बेंगळुरूला पराभूत करत चेन्नई सुपर किंग्स गुणतालिकेत अव्वल
शारजा येथे खेळल्या गेलेल्या आयपीएल 2021 च्या 35 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा विकेट्सने पराभव केला. या मोसमात आरसीबीचा हा सलग दुसरा पराभव आहे. बेंगळुरूने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकांत 6 बाद 156 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईने 11 चेंडू राखत 4 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग पूर्ण केला. चेन्नईचा या मोसमात 9 सामन्यांमधील सातवा विजय आहे. यासह तिने पॉइंट टेबलमध्ये 14 गुणांसह पहिला क्रमांक गाठला आहे.


चेन्नईसाठी सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 26 चेंडूत चार चौकार आणि एका षटकारासह 38 धावा केल्या. दुसरीकडे, फाफ डु प्लेसिसने 26 चेंडूत 31 धावा केल्या. त्याने आपल्या डावात दोन चौकार आणि दोन षटकार मारले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मोईन अलीने 23 आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या अंबाती रायुडूने 32 धावा केल्या. सरतेशेवटी, सुरेश रैना 10 चेंडूत 17 धावांवर आणि एमएस धोनी 9 चेंडूत 11 धावांवर नाबाद राहिला. रैनाने दोन चौकार आणि एक षटकार ठोकला. तर धोनीने दोन चौकार लगावले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.