Breaking News LIVE : तिसऱ्या लाटेवर चर्चा करण्यापेक्षा लसीकरणावर भर देणे गरजेचे, तरच राज्यातील शाळा दिवाळीला सुरू होतील : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Breaking News LIVE Updates, 23 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर सर्व अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.    

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Sep 2021 10:14 PM
तिसऱ्या लाटेवर चर्चा करण्यापेक्षा लसीकरणावर भर देणे गरजेचे, तरच राज्यातील शाळा दिवाळीला सुरू होतील : आरोग्यमंत्री राजेश टोपे

तिसऱ्या लाटेवर चर्चा करण्यापेक्षा लसीकरणावर भर देणे गरजेचे, तरच राज्यातील शाळा दिवाळीला सुरू होतील : आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना परतूर तालुक्यातील श्रीष्टी गावात पुलावरून बस नदीत कोसळली, 23 प्रवासी सुखरूप

जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातल्या श्रीष्टी गावात पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात चालकाने बस घातल्याने  बस नदीत कोसळल्याची घटना घडली. या बसमध्ये 23 प्रवासी होते. या दुर्घटनेत बसमधील एक 12 वर्षाची मुलगी वाहून गेली होती. मात्र, काही अंतरावरच ती नदीच्या काठावर अडकल्याने गावकऱ्यांनी तिला वाचवले. दरम्यान नदीची खोली कमी असल्याने हे प्रवासी बालंबाल बचावले. ही बस नदीत पलटी झाल्याची माहिती आजूबाजूच्या गावकऱ्यांना कळाल्याने गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य करून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. जालनावरुन आष्टीकडे जाताना चालकाला पुलावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे कठड्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे बसवरील नियंत्रण सुटून ही बस नदीत कोसळली अशी माहिती ग्रामस्थांनी दिलीय.

राज्येच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात येणार्‍या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना चक्क उत्तर प्रदेशातील परिक्षा केंद्राचा पत्ता

राज्येच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात येणार्‍या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना चक्क उत्तर प्रदेशातील परिक्षा केंद्राचा पत्ता देण्यात आल्याने गोंधळ उडालाय. राज्याच्या आरोग्य विभागाकडून तब्बल साडे सहा ते सात हजार पदे भरण्यासाठी 26 आणि 27 सप्टेंबरला परिक्षा घेण्यात येणार आहे.  त्यासाठी एका खाजगी कंपनीला परिक्षा घेण्याचे काम देण्यात आलेय. मात्र, या कंपनीकडून विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेल्या हॉल तिकिटावर चक्क उत्तर प्रदेशचे वेगवेगळे पत्ते देण्यात आलेत तर काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर फक्त मोकळी जागा सोडण्यात आलीय तर काहींच्या हॉल तिकिटावर महाराष्ट्रातील परिक्षा केंद्रांचे पत्ते आहेत. अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या परिक्षेसाठी असा गोंधळ सुरु झाल्याने विद्यार्थि संभ्रमात सापडलेत. महाराष्ट्रातील लाखों विद्यार्थ्यांनी या प॔दासाठी अर्ज केलेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख समोरील अडचणी वाढल्या

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख समोरील अडचणी वाढल्या. बलात्काराच्या आरोपा प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी केलेल्या बी समरी रोपोर्ट न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणात पुन्हा तपस करण्याचे आदेश. या तपासादरम्यान पोलिस आयुक्तांनी स्वतः देखरेख करून तपासामध्ये मार्गदर्शन करण्याचे सत्र न्यायालयाचे आदेश.

आयकर विभागाकडून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक जयेश शहा यांच्या सॅलिसबरी पार्क भागातील बंगल्यावर छापा

आयकर विभागाकडून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक जयेश शहा यांच्या सॅलिसबरी पार्क भागातील बंगल्यावर छापा टाकण्यात आला. या छाप्यामधे जयेश शहा यांचे व्यावसायिक संबंध कोणासोबत आहेत याचीही पडताळणी करण्यात आल्याची माहिती आहे. जयेश शहा यांचा संबंध राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री असलेल्या काँग्रेस पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याशी जोडला जातो. आयकर विभागाचे हे असे छापे पुण्याबरोबरच इतर शहरांमध्ये देखील टाकण्यात आलेत. महाविकास आघाडीतील मंत्र्यांशी संबंधित व्यक्तींच्या मालमत्तावर आयकर विभागाचे हे धाडसत्र सुरु आहे.

काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार शरद रणपिसे यांचे पुण्यात निधन. ते 72 वर्षांचे होते

काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार शरद रणपिसे यांचे पुण्यात निधन. ते 72 वर्षांचे होते. शरद रणपिसेंवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून ते हडपसरमधील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, तब्येत खालावल्याने आज त्यांचे निधन झाले.  त्यांच्यावर उद्या सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह  इतर काँग्रेस नेते सहभागी होणार आहेत.

आदिवासी खावटीचा मुद्दा राज्यपालांच्या दरबारात

कोरोनातील लॉकडाउनमुळे आदिवासी समाजाच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य सरकारने खावटी योजना पुर्नजीवीत केली. यात राज्यातील 11 लाख 55 हजार कुटुंबांना रोख दोन हजार रुपये तसेच दोन हजार रुपयांचे धान्य स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सरकारने 486 कोटी मंजूरही केले. मात्र, आता बहुतांश लोकांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले नाही. तर दुसरीकडे निकृष्ट स्वरूपाचे धान्य वितरीत करण्यात आले. राज्यसरकारने निकृष्ट धान्य देवून आदिवासी बांधवांची थट्टा केली असा आरोप करीत या संदर्भात  भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर बर्निंग कारचा थरार! आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, आग विझवण्यात यश.

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर बर्निंग कारचा थरार! आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, आग विझवण्यात यश

ओबीसी आरक्षण अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली

ओबीसी आरक्षण अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली.

कॅबिनेटच्या निर्णयाविरोधात काँग्रेसच्या कार्यकारिणीत ठराव मंजूर

कॅबिनेटच्या निर्णयाविरोधात काँग्रेसच्या कार्यकारिणीत ठराव मंजूर. काल कॅबिनेट बैठकीत 3 सदस्यीय प्रभागाचा ठराव मंजूर झाला होता. मात्र, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीत जास्तीत जास्त दोनच सदस्यांचा प्रभाग असावा असा ठराव एकमतानं मंजूर.

पुण्याच्या नारायणगावमध्ये एका मनुष्याचा पाय कचऱ्यात आढळल्याने खळबळ

पुण्याच्या नारायणगावमध्ये एका मनुष्याचा पाय कचऱ्यात आढळल्याने खळबळ उडाली. मते हॉस्पिटलच्या डॉक्टर अजय मते यांचा हा प्रताप होता. हे पोलीस तपासात समोर आलं. डॉक्टर मतेंनी एका वृद्ध व्यक्तीची शस्त्रक्रिया केली आणि निकामी झालेला पाय बाजूला केला. पण या पायाची योग्य ती विल्हेवाट लावणं गरजेचं असताना डॉक्टर मतेंनी तो निकामी पाय कचऱ्यात टाकला. डॉक्टर मतेंचा हा प्रताप रोगराई पसरविण्यास जबाबदार ठरणारा होता. म्हणून नारायणगाव पोलिसांनी त्यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केलाय.

धक्कादायक... डोंबिवलीच्या भोपरमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 30 जणांचा सामुहिक बलात्कार

डोंबिवली : डोंबिवलीच्या भोपरमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीये. 14 वर्षीय मुलीवर 30 जणांनी सामुहिक बलात्कार केला आहे, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी 30 जण मानपाडा पोलिसांच्या ताब्यात आहेत. 





दिवाळीनंतर राज्यातील शाळा नियमितपणे सुरु होण्याची शक्यता

मुंबई : दिवाळीनंतर राज्यातील शाळा नियमितपणे सुरु होण्याची शक्यता, कोरोनास्थिती नियंत्रणात राहिल्यास राज्यातील शाळा सुरु करण्यास टास्क फोर्स सकारात्मक





क्रांतिसिह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांचे निधन

क्रांतिसिह नाना पाटील यांच्या कन्या  क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांचे निधन


वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन


कराड मधील कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

डोंबिवलीत 14 वर्षीय मुलीवर गँगरेप..

डोंबिवलीतील भोपर परिसरातील घटना, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 
गँगरेप मध्ये 30 आरोपी, 22 जणांना मानपाडा पोलिसांनी घेतलं ताब्यात 
अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करत काढला होता व्हिडिओ, या व्हिडियो च्या आधारे ब्लॅकमेल करत आरोपीनी केला होता बलात्कार

क्रांतिसिह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांचं निधन

सांगली : क्रांतिसिह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांचं निधन झालं आहे. वयाच्या 96व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं आहे. कराड मधील कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 




महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली परिसरात

महाराष्ट्राच्या चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत 342 इंच इतका पाऊस. राज्यातील सर्वाधिक पाऊस पडणार ठिकाण म्हणजे आंबोली. आंबोलीत यावर्षी ८५५० मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्र सर्वाधिक पाऊस हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली परिसरात पडतो. कोकणातील थंड हवेचे ठिकाण म्हणून आंबोलीची ओळख आहे. आंबोलीत सर्वाधिक पाऊस पडतो म्हणूनच आंबोली ही जैवविविधतेने संपन्न आहे. याठिकाणी ऊन पावसाचा खेळ पहायला मिळतो तर धुक्याने व्यापलेला आंबोली घाटाचा नजारा काही औरच असतो. आंबोलीत सध्या घाटातील खोल दरीत ढगांची चादर पहायला मिळत आहे.

परभणी जिल्ह्यात मागच्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस, जिल्ह्यातील 2 लघु तर 22 मध्यम प्रकल्प तुडुंब

परभणी जिल्ह्यात मागच्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय यामुळे जिल्हाभरातील 2 लघु तर 22 मध्यम प्रकल्प तुडूंब भरले आहेत.मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण असलेल्या येलदरी धरण 100% भरून पाण्याचा विसर्ग येत असल्याने धरणाचे 10 पैकी 10 दरवाजे पुन्हा उघडण्यात आले असुन या 10 दरवाजातून 23798 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग पुर्णा नदीपात्रात सोडण्यात आलाय तर लोअर दुधना प्रकल्पाचे ही 12 दरवाजे उघडण्यात आले असुन 21660 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग दुधना नदीत सोडण्यात आलाय त्यामुळे दुधना,पुर्णा या नद्यांना पुर आलाय तर गोडावरी ही दुथडी भरून वाहतेय.दुसरीकडे मानवत येथील दिगंबर दहे हे शेतकरी हे मिराशी ओढयाला आलेल्या पाण्यात वाहून गेले आहेत..त्यांचा मृतदेह शोधण्याचे काम सुरुय..

गोवा पत्रादेवी तपासणी नाक्यावर 12 लाख 14 हजारांची दारू जप्त, गोवा पोलिसांची कारवाई

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर पत्रादेवी तपासणी नाक्यावर गोव्यातून महाराष्ट्रात आयशर टेम्पोतून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करताना करत असताना गोवा अबकारी खात्याने पत्रादेवी तपासणी नाक्यावर कारवाई केली. 12 लाख 14 हजार 880 रुपये किमतीच्या दारुसह एकूण 29 लाख 14 हजार 880 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई उत्पादन शुल्क निरीक्षक अमोल हरवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी करण्यात आली. गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूच्या 330 खोके आढळले.



कोरोना संकटात दिलासा, Corona वरील औषधांची विक्री 90 टक्क्यांनी घटली, Remdesivir आणि मास्क विक्रीतही घट

भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसत आहेत. पुन्हा एकदा दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे. आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 31,923 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 282 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच 24 तासांत 31,990 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


 

9 ऑक्टोबरपासून मुंबई-सिंधुदुर्ग दरम्यान नियमित विमानसेवा, तिकीट आणि वेळापत्रक ठरलं!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळ येत्या 9 ऑक्टोबर पासून नियमित मुंबई ते सिंधुदुर्ग असा विमान प्रवास सुरू होणार आहे. कोकणात मोठ्या संख्येने देश विदेशातील पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी कोकणात येत असतात. त्यांना आता मुंबई ते सिंधुदुर्ग हा प्रवास काही तासात करता येणार आहे. तर सण समारंभाचा आनंद लुटण्यासाठी कोकणवासीयांना सुध्दा कोणत्याही खड्ड्याविना अवघ्या काही तासात घरी जाता येणार आहे. त्यासाठी अलायन्स एअर या विमान कंपनीने मुंबई ते सिंधूदूर्ग विमान प्रवासाचे वेळापत्रक व तिकीटदर घोषित केले आहेत. ही कंपनी 9 ऑक्टोबर पासून मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते मुंबई अशी नियमित विमानसेवा चालवणार आहे.


 


गावकऱ्यांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास, परभणीच्या सेलु तालुक्यातील नरसापूर ग्रामस्थांचे पुलाभावी हाल

परभणी : ग्रामीण भागातील नागरिकांचे पावसाळ्यात मोठे हाल होताहेत.परभणीच्या सेलू तालुक्यातील नरसापुर गावातील करपरा नदीवर पुल नसल्याने प्रत्येक वर्षी पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना अनेक जीव घेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागते.सेलु तालुका आणि परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने करपरा नदीला पूर आला.या पुरामधून गावकऱ्यांना दोरीच्या सहाय्यानं गावात ये-जा करावी लागत आहे.जीव मुठीत धरून महिलांना ही नदी पार करावी लागत आहे. याआधीही 18 सप्टेंबरला गावातील नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि त्यांचा मृतदेह नदीचा पुरातून बैलगाडीच्या साहाय्याने गावात आणण्यात आला.ऑगस्ट महिन्यातही एक ग्रामस्थ पुरात वाहून गेल्याची घटना घडली होती.या नदीवर पूल उभारण्याची मागणी मागच्या अनेक ग्रामस्थांतून वर्षांपासून केली जात आहे.मात्र अद्यापही पुल करण्यात आला नसल्याने गावकऱ्यांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

भंडारा जिल्ह्याच्या मनरो शाळेत सुरु असलेल्या अवैध गाडे बांधकामाला नागपूर खडंपिठाकडून स्थगिती

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या मनरो शाळेत सुरु असलेल्या अवैध गाडे बांधकामाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खडंपिठाने पुढिल आदेशापर्यंत बांधकामाला दिली स्थगती आहे. या संदर्भात मनरो शाळेत शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या बाजुने निकाल दिल्याने विद्यार्थ्यांनी फटको फोडत आंनद साजरा केला आहे हि शाळा ब्रिटिश कालीन असुन या शाळेतुन शिक्षण घेत अनेक विद्यार्थी आधिकारी, उद्योगपती तसेच राजकीय नेते झाले असुन या शाळेला इतिहासीत महत्त्व आहे.

भंडारा जिल्ह्याच्या मनरो शाळेत सुरु असलेल्या अवैध गाडे बांधकामाला नागपूर खडंपिठाकडून स्थगिती

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या मनरो शाळेत सुरु असलेल्या अवैध गाडे बांधकामाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खडंपिठाने पुढिल आदेशापर्यंत बांधकामाला दिली स्थगती आहे. या संदर्भात मनरो शाळेत शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या बाजुने निकाल दिल्याने विद्यार्थ्यांनी फटको फोडत आंनद साजरा केला आहे हि शाळा ब्रिटिश कालीन असुन या शाळेतुन शिक्षण घेत अनेक विद्यार्थी आधिकारी, उद्योगपती तसेच राजकीय नेते झाले असुन या शाळेला इतिहासीत महत्त्व आहे.

ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्परेकिल डेटावरून केंद्र आणि राज्यातली लढाई आणखी तीव्र


ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्परेकिल डेटावरून केंद्र आणि राज्यातली लढाई आणखी तीव्र,  सुप्रीम कोर्टातील  प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारची डेटा देण्यासंदर्भातली तयारी दिसत नाही, प्रशासकीय कारणं आणि त्रुटींचा हवाला देत डेटा देण्यास नकार, केंद्राच्या या प्रतिज्ञापत्रावर रिजाँईंडर दाखल करण्यासाठी राज्य सरकारने चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे, चार आठवड्यानंतर या प्रकरणावर पुढची सुनावणी


 

माहूर बसस्थानक परिसरात प्रतिबंधीत गुटखा सह शस्त्रे जप्त

17 लाख 59 हजार रुपयांच्या गुटख्यासह मुद्देमाल हस्तगत. नांदेड जिल्ह्यास आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या सीमा लागून असल्याने गुटखा तस्कर पोलिसांना गुंगारा देऊन या राज्यातून दुसऱ्या राज्यात काढतात पळ , त्यामुळे सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात होतेय गुटख्याची तस्करी.

मनसेने नाशिक शहरात पुन्हा झळकावले होर्डिंग्ज

मनसेने नाशिक शहरात पुन्हा झळकावले होर्डिंग्ज


- पोलीस आणि मनपा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून लावले होर्डिंग


- बुधवारी पोलीस आणि मनपा प्रशासनाने संयुक्त कारवाई करत होर्डिंग्ज हटवले होते, 

मनसे प्रमुख राज ठाकरे नाशिकमध्ये जिल्हा अध्यक्ष दिलीप दातीर यांच्या सम्पर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार

मनसे प्रमुख राज ठाकरे नाशिकमध्ये जिल्हा अध्यक्ष दिलीप दातीर यांच्या सम्पर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार, 


- उद्घाटन कार्यक्रमानंतर नवनियुक्त शाखा अध्यक्षांचा मेळावा होणार


- प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच मेळाव्यासाठी प्रेवश दिला जाणार


- मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं 122 शाखा अध्यक्षांची केलीय नियुक्ती


- प्रत्येक वार्डात मनसेचा एक शाखा अध्यक्ष राहणार


- स्थानिक पातळीवर मनसेची पाळंमुळं रुजविण्यासाठी शाखा अध्यक्षांना दिले जाणार बळ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष शाम गोहाडसह 5 ते 6 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष शाम गोहाडसह 5 ते 6 कार्यकर्त्या विरोधात गुन्हा दाखल, मुंबईनाका पोलिसात गुन्हा दाखल

 

अनधिकृत होर्डिंग्ज काढताना विरोध करून गोंधळ घातल्या प्रकरणी झाला गुन्हा दाखल,

 

- सरकारी कामात अडथळा आणणे, रस्त्यावर बसून वाहतुकीस अडथळा करणे,

 

-गर्दी जमवून घोषणाबाजी करणे, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणे आदी कलमा अंर्तगत गुन्हे दाखल
गंगापूरच्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

नाशिकमध्ये काल दुपारनंतर पावसाने विश्रांती जरी घेतली असली तरी मात्र गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरु असल्याने गोदावरी नदीचा पूर अद्याप कायम आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असला तरी मात्र हा पूर बघण्यासाठी रात्री उशिरापर्यंत नाशिककर होळकर पुलावर कुटुंबासह हजेरी लावत होते. 

ब्रॅण्डेड कंपनीची नक्कल करून ग्राहकांची फसवणूक, कपड्यांचा लाखोंचा माल जप्त

उल्हासनगरात एका ब्रॅण्डेट कंपनीच्या शर्ट पॅन्टची हूबेहून नक्कल करून ग्राहकांना विक्री करून त्यांची फसवणूक करणाऱ्या दुकानावर अँटी पायरसी सेलने बुधवारी धाड टाकली .या धाडीत दुकानातून लाखोंचा हुबेहूब नक्कल केलेला शर्ट-पॅन्टचा साठा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Corona Update : राज्यात काल  3,608 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 48 जणांचा मृत्यू
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात आज  3,608 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 285  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 49 हजार 029  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.21 टक्के आहे. 


राज्यात आज 48 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 11, 344 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (10), नंदूरबार (1),  धुळे (1), जालना (50), लातूर (90), परभणी (75), हिंगोली (18), नांदेड (16),   अमरावती (92), अकोला (28), वाशिम (07), बुलढाणा (33), यवतमाळ (05), नागपूर (142),  वर्धा (5), भंडारा (3), गोंदिया (7), चंद्रपूर (72),   गडचिरोली (18 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. राज्यात सध्या 39 हजार 984 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,64,416 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,678  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


DC vs SRH, Match Highlights : दिल्लीचा 8 गडी राखत हैदराबादवर विजय, गुणतालिकेत अव्वल स्थानी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या आयपीएल 2021 च्या 33 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने हैदराबादवर 8 गडी राखत  विजय मिळवला आहे. हैदराबादनं दिलेलं 135 धावांचं आव्हान दिल्लीने 17.5 षटकात पूर्ण केलं. दिल्ली कॅपिटल्सच्या टीम 18 ओव्हर्समध्ये दोन विकेट गमावत टार्गेट कमावले. श्रेयस अय्यरने 47 धावा केला. शिखर धवनने 42 धावा केल्या. कॅप्टन रिषभ पंतने 21 बॉलमध्ये 35 धावा केल्या. आता दिल्लीची टीम 14 गुणांसह पॉइट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहचल्या आहेत. 
तत्पूर्वी,  दिल्ली कॅपिटल्सने शानदार गोलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादला 134 धावांवर रोखले. हैदराबादकडून अब्दुल समदने सर्वाधिक 28 धावा केल्या. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सकडून कागिसो रबाडाने तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय एनरिक नॉर्टजे आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध झाले. पहिल्याच षटकात डेव्हिड वॉर्नर खाते न उघडता बाद झाला. हैदराबादने डेव्हिड वॉर्नर (0), रिद्धीमान साहा (18), कर्णधार केन विल्यमसन (18) आणि मनीष पांडे (17) यांच्या रूपाने आपले चार विकेट गमावले.


गेहना वशिष्ठला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, पॉर्नोग्राफी प्रकरणात गेहनाचा अटकपूर्व जामीन मंजूर
पॉर्नोग्राफी प्रकरणात गेहना वशिष्ठला सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं गेहनाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी आपला निकाल राखून ठेवला असून निकाल मंगळवारी जाहीर केला होता. दरम्यान मुंबई पोलिसांनी गेहनाविरोधात आयपीसी कलम 370(मानवी तस्करी) लवण्याची मागणी करत सत्र न्यायालयात अर्ज सादर केला आहे. मात्र गेहनानं या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात तातडीनं केलेलं अपील कोर्टानं स्वीकारत गेहनाला अटक न करण्याचे निर्देश जारी केले आहेत. न्यायमूर्ती एस. के कौल आणि न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी पार पडली.


अश्लील चित्रपटात अभिनय केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या गेहना वाशिष्टनं पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक होऊ नये, म्हणून गेहनाने अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो फेटाळ्यात आल्यानंतर तिनं हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. या याचिका याचिकेवर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. गेहनाची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडे आवश्यक ती सर्व माहिती आहे. याआधी तिला अटकही करण्यात आली होती. ज्यात चार महिन्यांहून अधिकाकाळ ती कारागृहात होती. ती तुरुंगात असतानाच तिच्याविरोधात दुसरी एफआयआर नोंदविण्यात आली आणि सुटल्यानंतर तिसरी एफआयआर नोंदविण्यात आली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.