Breaking News LIVE : महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या 12 निलंबित आमदारांनाही मतदानाची परवानगी
Breaking News LIVE Updates, 20 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये.
महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या 12 निलंबित आमदारांनाही मतदानाची परवानगी. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला आदेश. निलंबित आमदारांना विधानभवनात यायची परवानगी नसते, तर त्यांच्यासाठी विधान भवनाच्या बाहेर मतदान व्यवस्था करण्याचे निर्देश.
पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा आणि रायन थॉर्प या दोघांना जामीन मंजूर
मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टातुन जामीन मंजूर करण्यात आला
काँग्रेसकडून राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचे नाव निश्चित झाले असून थोड्याच वेळात अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. पाटील या माजी खासदार आणि सध्या जम्मू-काश्मीरच्या प्रभारी आहे. विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत नाव होतं. पण त्याऐवजी आता काँग्रेस राज्यसभेवर पाठवणार आहेत.सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू वर्तुळातील. याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेवर त्यांना उमेदवारी मिळाली होती.
मनोहर भोसले याला करमाळा न्यायालयाने 27 सप्टेंबरपर्यंत दिली पोलीस कोठडी , मनोहर भोसले यांच्या वकिलांनी दीड तास बाजू मांडली मात्र न्यायालयाने मनोहर भोसले यास 8 दिवसांची पोलीस कोठडी दिली
मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थे संदर्भात याचिका,
वडखळ ते इंदापूर या मार्गा दरम्यान एक अभयारण्य आणि तीन रेल्वेलाईन वरील पुल येत असल्यानं या कामाला उशिर,
26 पैकी 22 किमीच्याच मार्गावर काम करण्याची परवानगी मिळाली आहे,
वसिष्ठी पुलाच्या दुस-या टप्याचं काम 15 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल,
राज्य सरकारची हायकोर्टात माहिती,
डिसेंबरपर्यंत राज्य सरकारनं संपूर्ण चौपदरीकरणाच्या कामाचा अहवाल सादर करावा - हायकोर्ट,
या महामार्गावरील खड्ड्यांबाबत मात्र तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश,
मुंबई गोवा महामार्गाबाबत हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या मनसे नेत्याला हायकोर्टाचा दणका,
परशुराम उपकर यांना 10 लाख रूपये जमा करण्याचे निर्देश,
जर याचिकेवर सुनावणी हवी असेल तर कोर्टात 10 लाख जमा करा, याचिका योग्य वाटल्यास पैसे परत मिळतील - हायकोर्ट
कंत्राटदारांच्या कामांमवर आक्षेप घेत उपरकरांची हायकोर्टात याचिका
Breaking News LIVE : कंगना रनौतकडून न्यायाधीश बदलण्याची मागणी, अंधेरी कोर्टातील न्यायाधीशांवर कंगनाचे गंभीर आरोप
https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-september-20-2021-maharashtra-political-news-terrorist-target-mumbai-1004125
हिंगोली : महावितरणच्या विरोधात शेतीतील जळालेल्या डीपी त्वरित बदलून मिळावी आणि सक्तीची वसुली त्वरित बंद करावी यासह अन्य मागण्यांसाठी भाजपच्या वतीने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. भाजपचे नेते गोविंदराव केंद्रे आणि भाजपचे स्थानिक आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला
नंदुरबार : ब्रहानपूर अंकलेश्वर महामार्गावरील नंदुरबार शहराजवळ असलेल्या वळण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जय हिंद फाउंडेशनच्यावतीने खड्ड्यात उभे राहून ढोल बजाव आंदोलन केलं आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. झोपलेल्या महामार्ग प्रशासनाला जागे करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं.
भिवंडीत मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन, मनसैनिकांनी ठाणे-भिवंडी रस्त्यावरील कशेळी टोलनाका फोडला, कशेळी ते अंजुरफाटा रसत्यावर प्रचंड खड्डे , 20 दिवसांपूर्वी खड्डे बुजविण्याचे अल्टिमेटम देऊनही रस्त्यावरील खड्डे जैसे थे , मुंडन आंदोलन करून रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी केली होती ,पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी चरणजीत सिंह चन्नी यांना जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दलित शीख चेहऱ्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात येत आहे. चन्नी सोमवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. चन्नी यांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
पार्श्वभूमी
Punjab New CM : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार चरणजीत सिंह चन्नी, आज शपथविधी
Punjab New CM : कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी चरणजीत सिंह चन्नी यांना जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दलित शीख चेहऱ्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात येत आहे. चन्नी सोमवारी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. चन्नी यांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
चन्नी यांनी घेतली राज्यपालांची भेट, आज सकाळी 11 वाजता शपथविधी
चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर चंदिगढमधील राजभवनात जाऊन त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. चन्नी यांच्यासोबत पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवजोत सिंह सिद्धू आणि पंजाब कांग्रेस प्रभारी हरीश रावतही उपस्थित होते. राज्यपालांशी जवळपास अर्धा तासाच्या भेटीनंतर चरणजीत सिंह चन्नी यांनी राजभवना बाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आज होणाऱ्या शपथविधीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, आज सकाळी 11 वाजता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
चरणजीत सिंह चन्नी अमरिंदर सिंग सरकारमध्ये तंत्रशिक्षण आणि पर्यटन मंत्री होते. ते चमकौर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते राहिले आहेत. चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर काँग्रेस नेते सुखजिंदर सिंह रंधावा म्हणाले की, "हा हायकमांडचा निर्णय आहे. मी त्याचे स्वागत करतो. चन्नी माझ्या लहान भावासारखे आहेत."
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नईची विजयी सुरुवात
आयपीएल 2021 च्या उत्तरार्धातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला. चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकांत सहा गडी बाद 156 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ निर्धारित षटकांत केवळ 136 धावा करू शकला. आयपीएल 2021 मध्ये चेन्नईचा हा सहावा विजय आहे. आता त्यांचे आठ सामन्यात 12 गुण आहेत.
या विजयासह चेन्नईने आयपीएल 2021 च्या पूर्वार्धातील पराभवाचा बदलाही घेतला. खरे तर भारतात खेळल्या गेलेल्या पूर्वार्धात चेन्नईला मुंबईविरुद्ध 218 धावा करूनही सामना जिंकता आला नाही. त्या सामन्यात मुंबईने हारला विजयात बदललं होतं. मात्र, आज चेन्नईने त्या पराभवाचा बदला घेतला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -