Breaking News LIVE : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा राजीनामा

Breaking News LIVE Updates, 18 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Sep 2021 05:01 PM
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा राजीनामा

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला आहे. 

करुणा शर्मांचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला

करुणा शर्मा यांच्यावर परळीत आल्यानंतर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल झाला होता.. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मांच्या जामिनाचा निर्णय सोमवारपर्यंत पुढे गेला आहे. अंबाजोगाईच्या जिल्हा सत्र न्यायालयात  दोन्हीबाजूंनी युक्तिवाद झाला असून न्यायालय यावर सोमवारी निर्णय देणार आहे.शर्मा यांना 5 सप्टेंबरला अटक झाली होती...


करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला म्हणून अरुणा शर्मांसह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी त्यांना 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर 6 सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावरची सुनावणी पुढे ढकलली जात होती. 


 

लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

लातूरच्या औसा तालुक्यातील नागरसोगा येथील 40 वर्षीय शेतकरी लालगीर माधवगीर गिरी यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले होते. विष पिल्यानंतर शेजारी आणि घरच्या मंडळीनी त्यांना तात्काळ उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारा दरम्यान त्याचा मुत्यू झाला आहे

 रविवार, 19 सप्टेंबर रोजी मेगा ब्लॉक  

 रविवार, 19 सप्टेंबर रोजी मेगा ब्लॉक  


मध्य रेल्वे रविवार दि. १९.९.२०२१ रोजी देखरेखीचे काम करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक कार्यान्वित करेल.
 
 माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत
 
 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.४४ या वेळेत सुटणारी डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान  डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील व त्यांच्या  वेळापत्रकानुसार निर्धारित स्थानकांवर थांबवण्यात येतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि त्यांच्या  वेळापत्रकापेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.  


ठाणे येथून सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२६ पर्यंत सुटणारी अप जलद सेवा मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील व त्यांच्या वेळापत्रकानुसार निर्धारित स्थानकांवर थांबवण्यात येतील.  पुढे या अप जलद सेवा माटुंगा येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि वेळापत्रकापेक्षा १५ मिनिटे उशीराने गंतव्यस्थानी पोहोचतील.


 कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर लाईन सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत  


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि 
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा  रद्द राहतील.  


तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला आणि वाशी - पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.  


हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० या वेळेत मेन लाइन आणि ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे
 
हे देखरेख मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.  प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे. 

नक्षलवाद्यांच्या नावाने एमबीबीएस डॉक्टरला धमकी देऊन 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक

नक्षलवाद्यांच्या नावाने एमबीबीएस डॉक्टरला धमकी देऊन 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक..


लाल सलाम नक्षली संघटनेच्या नावाने मागितले होते पन्नास लाख रुपये..


खंडणी न दिल्यास ऑपरेशन स्टार्ट अंतर्गत डॉक्टरच्या मुलाची हत्या आणि ऑपरेशन संपन्नच्या अंतर्गत शेवटी डॉक्टरची हत्या करण्याची दिली होती धमकी...


मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई असून या प्रकरणात महिला मुख्य आरोपी जिने हा कट रचला होता आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे..


युट्युबवर व्हिडीओ पाहून हा सगळा प्लॅन केला असल्याचं समोर आलं आहे...

नक्षलवाद्यांच्या नावाने एमबीबीएस डॉक्टरला धमकी देऊन 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक

नक्षलवाद्यांच्या नावाने एमबीबीएस डॉक्टरला धमकी देऊन 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक..


लाल सलाम नक्षली संघटनेच्या नावाने मागितले होते पन्नास लाख रुपये..


खंडणी न दिल्यास ऑपरेशन स्टार्ट अंतर्गत डॉक्टरच्या मुलाची हत्या आणि ऑपरेशन संपन्नच्या अंतर्गत शेवटी डॉक्टरची हत्या करण्याची दिली होती धमकी...


मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई असून या प्रकरणात महिला मुख्य आरोपी जिने हा कट रचला होता आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे..


युट्युबवर व्हिडीओ पाहून हा सगळा प्लॅन केला असल्याचं समोर आलं आहे...

नक्षलवाद्यांच्या नावाने एमबीबीएस डॉक्टरला धमकी देऊन 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक

नक्षलवाद्यांच्या नावाने एमबीबीएस डॉक्टरला धमकी देऊन 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक..


लाल सलाम नक्षली संघटनेच्या नावाने मागितले होते पन्नास लाख रुपये..


खंडणी न दिल्यास ऑपरेशन स्टार्ट अंतर्गत डॉक्टरच्या मुलाची हत्या आणि ऑपरेशन संपन्नच्या अंतर्गत शेवटी डॉक्टरची हत्या करण्याची दिली होती धमकी...


मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई असून या प्रकरणात महिला मुख्य आरोपी जिने हा कट रचला होता आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे..


युट्युबवर व्हिडीओ पाहून हा सगळा प्लॅन केला असल्याचं समोर आलं आहे...

मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, रेल्वेची सुरक्षा वाढवली

दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक करुन मुंबई आणि दिल्लीतील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला आहे. या अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर मुंबईतील लोकल ट्रेन होत्या अशी माहिती समोर आली आहे. गुप्तचर विभागानेही तशी माहिती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई रेल्वेस्थानकावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 


 

पार्श्वभूमी

लसीकरणाचा विश्वविक्रम! देशात एकाच दिवसात 2.5 कोटी डोस वितरित
शुक्रवारी (17 सप्टेंबर) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. शुक्रवारी देशात एकाच दिवशी कोरोना लसीचे 2.5 कोटीहून अधिक डोस देण्यात आले. देशात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत चार वेळा एकाच दिवशी एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. या आधी एकाच दिवशी कोरोनाच्या सर्वाधिक लसी देण्याचा विक्रम चीनच्या नावावर होता. चीनने एकाच दिवशी 2.47 कोटी लसी वितरित केल्या होत्या. तो विक्रम भारताने मोडला आहे. भारताने हा विश्वविक्रम केल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे. 


मुंबईत महिला लसीकरण विशेष सत्रात 1.27 लाख महिलांना कोविड लस
 कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी (17 सप्टेंबर 2021) मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड 19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवण्यात आलं. त्यानुसार शुक्रवारी एकूण 1 लाख 27 हजार 351 महिलांना लस दिली गेली. यात महिलांना लसीकरण केंद्रावर थेट येऊन (वॉक इन) कोरोना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेण्याची मुभा देण्यात आली होती. महिला लसीकरण विशेष सत्रात काल एकूण 1 लाख 27 हजार 351 लसी देण्यात आल्या. त्यामध्ये महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रावर एकूण 1 लाख 07 हजार 934 लसी देण्यात आल्या. 


राज्यात काल 3,586 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 67 रुग्णांचा मृत्यू
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात काल 3,586 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 410  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 24 हजार 720  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.08 टक्के आहे. राज्यात काल 67 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,432 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  जळगाव (13), नंदूरबार (2),  धुळे (3), जालना (22),  अमरावती (97), अकोला (28), वाशिम (02),  यवतमाळ (07), नागपूर (98),  वर्धा (3), भंडारा (3), गोंदिया (7), चंद्रपूर (58),   गडचिरोली (32 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


नाशिक प्रकरणी नारायण राणेंना हायकोर्टाचा दिलासा कायम, राणेंच्या याचिकेवरील सुनावणी 30 सप्टेंबरपर्यंत तहकूब
नाशिकमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर करवाई करणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारनं शुक्रवारी हायकोर्टात दिली. त्यामुळे नारायण राणे यांना 30 सप्टेंबरपर्यंत याप्रकरणी दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, सहा विविध ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआर रद्द करण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल करा, असे निर्देश शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयानं भाजप खासदार नारायण राणे यांना दिले आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.