Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Breaking News LIVE Updates, 07 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Oct 2021 07:06 AM
हे प्रकरण येत्या काही दिवसांत ईडीकडे जाऊ शकते..

आयकर विभागाने अजित पवार यांच्या ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात केलेले धक्कादायक खुलासे हे स्पष्ट करतात की हे प्रकरण येत्या काही दिवसांत ईडीकडे जाऊ शकते, अशी शक्यता जाणकार व्यक्त करतायेत.

मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीत वाढ

मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीत वाढ. आता 10 रुपयांचे तिकीट 50 रुपयांना. मुंबईतील महत्वाच्या स्थानकांसाठी नियम लागू, यात सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांचा समावेश. उद्यापासूनच हे नवे नियम लागू होणार, प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी कोरोनावर उपाय म्हणून हा बदल करण्यात आल्याची मध्य रेल्वेची माहिती. आतापर्यंत कोविड काळात प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ठेवण्यात आली होती.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी!

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी! राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ. महागाई भत्ता 17 टक्के वरून 28 टक्के वाढ करण्यात आली. 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत महागाई भत्ता 17 टक्केच दिला जाईल. 1 ऑक्टोंबर 2021 पासून हा वाढीव महागाई भत्ता रोखीने देण्यात येणार.

आर्यनच्या जामिनाचा मार्ग मोकळा, आर्यनसह 8 जणांना न्यायालयीन कोठडी

आर्यनच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला असून आर्यन खानला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आर्यनसह 8 जणांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आर्यन खानसह आठही जणांच्या जामीन अर्जावर उद्या सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे. 

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा कॉल फेक : पोलीस अधीक्षक

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा कॉल फेक. मंदिर सुरक्षेची वेळेवेळी तपासणी करण्यात आली आहे. कॉल आल्यानंतरही तपास करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची माहिती. अंबाबाई देवीचं भाविकांसाठी दर्शन पूर्ववत. सर्व तांत्रिक बाबीचा तपास केला जाणार : पोलीस अधीक्षक.

अब्दुल रझाक गुर्नाह यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

अब्दुल रझाक गुर्नाह यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर.

दादरा हवेली लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार मोहन भाई देलकर यांच्या पत्नी कला बेन देलकर या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल

दादरा हवेली लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार मोहन भाई देलकर यांच्या पत्नी कला बेन देलकर या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल. कला बेन देलकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत. दादरा हवेली लोकसभा मतदारसंघाची पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची उमेदवारी कला बेन देलकर यांना देण्याची शक्यता. शिवसेनेच्या रणनितीमुळे भाजपला धक्का.

बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याकडून पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यावर गोळीबार, राहुरी तालुक्यातील धक्कादायक घटना 

बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याकडून पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यावर गोळीबार, राहुरी तालुक्यातील धक्कादायक घटना 
झटापटीत झाला गोळीबार... सुदैवाने पोलीस उप विभागीय अधिकारी संदीप मिटके बचावले. 
गोळीबार करणारा पुण्यातील बडतर्फ  पोलीस अधिकारी सुनील लोखंडे....
मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस तेथे गेले असताना घडला थरार...
आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे...

चांदूर रेल्वेत प्रहार कार्यकर्त्यांचा माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर हल्लाबोल

चांदूर रेल्वे शहरात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या 10 ते 12  समर्थकांनी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर हल्ला केला. घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा सुध्दा घराबाहेर जाळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणी त्या सर्व कार्यकत्यांना पोलिसांनी अटक केली आहे.  


 

बापानेच केली पोटच्या गोळ्याची हत्या, कोल्हापूरच्या शाहुवाडीतील आरव केसरे हत्या प्रकरण

कोल्हापूरच्या शाहुवाडीतील आरव केसरे हत्या प्रकरण, बापानेच केली पोटच्या गोळ्याची हत्या,  राकेश केसरे असं हत्या करणाऱ्या नराधम बापाचं नाव, पत्नीच्या अनैतिक संबंधातून मुलगा झाल्याचा राजेशला होता संशय, पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दोघांत वाद होते, हत्या करून नरबळी भासवण्याचा केला होता प्रयत्न, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासात लावला हत्येचा छडा, राकेशनेच दिली होती मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद

जामीन की, कोठडी? आयर्न खानच्या जामीन अर्जावर आज फैसला

आज एनसीबी पुन्हा आर्यन खानच्या कस्टडीची मागणी करु शकते. एनसीबी (NCB) ने काल रात्री एका परदेशी नागरिकाला याप्रकरणी अटक केली आहे. क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात त्या व्यक्तीला पकडण्यात आलं आहे. क्रुझ पार्टीत अटक करण्यात आलेल्या आर्यन खानला जामीन मिळणार मुक्काम वाढणार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांची आज एनसीबी कोठडी संपत असून यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. 

वाशीम जिल्ह्यात काल संध्याकाळी परतीच्या पावसाचं थैमान

वाशिम : वाशीम जिल्ह्यात काल संध्याकाळी परतीच्या पावसाने शेतकऱ्याची चांगली तारांबळ उडवली. शेतात सोयाबीन काढणी सुरु असताना वीज कोसळून बिटोडा भोयर, कोळदरा मांडवा अशा तीन ठिकाणी घटना घडल्या यामध्ये तीन जण ठार तर तीन जण जखमी झाले. 

Maharashtra Temple Reopen : घटस्थापनेच्या मुहूर्तावर आजपासून मंदिरांची कुलूपं उघडली

Maharashtra Temple Reopen : राज्यात कोरोनाची घटती प्रकरणे पाहता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. त्यानंतर आजपासून राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. या निमित्तानं मंदिरं सजवण्यात आली असून भाविकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी सर्व धार्मिक स्थळे उघडली गेली. मात्रं धार्मिक स्थळं उघडताना कोरोनाचे सर्व नियम पाळले जाणार आहेत. 

पार्श्वभूमी

Temple Reopen : राज्यात कोरोनाची घटती प्रकरणे पाहता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. त्यानंतर आजपासून राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. या निमित्तानं मंदिरं सजवण्यात आली असून भाविकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी सर्व धार्मिक स्थळे उघडली गेली. मात्रं धार्मिक स्थळं उघडताना कोरोनाचे सर्व नियम पाळले जाणार आहेत. 


मुख्यमंत्री सहकुटुंब घेणार मुंबादेवीचं दर्शन 


आज घटस्थापनेनिमित्त महाराष्ट्रातील सर्व प्रार्थनास्थळे दर्शनासाठी नियमांचे पालन करून भाविकांसाठी उघडली जाणार आहेत. त्यानिमित्त माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आणि उपमहापौर सुहास वाडकर हे मुंबादेवीचे दर्शन सकाळी 8.30 वाजता घेणार आहेत.मुंबादेवी मंदिरात ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या भाविकांनाच प्रवेश असणार आहे.यासाठी मुंबादेवी मंदिराच्या वेबसाईट वर बुकिंग करता येईल.आजपासून नवरात्री उत्सव देखील सुरू होणार आहे.यामुळे या मंदिरात मोठ्या प्रमाणत गर्दी होण्याची शक्यता आहे.यासाठी इथे रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासन यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बरोबर कोरोना नियमांचे पालन भाविकांकडून करून घेण्यास ही नियमावली करण्यात आली आहे. 


तुळजाभवानी मंदिरात उत्सव काळात रोज 15 हजार भाविकांनाच प्रवेश


उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा तुळजापूर (Tuljapur) मंदिर संस्थान अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी शारदीय नवरात्र उत्सव कसा साजरा करावा याबाबत लेखी आदेश काढले आहेत. शारदीय नवरात्रोत्सव 7 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून या उत्सव काळात दररोज केवळ 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. भाविकांना मंदिरात प्रवेश असेल मात्र त्यांना अभिषेक इतर विधींना परवानगी नाही. देवीचे महंत, सेवेकरी आणि मानकरी यांच्या उपस्थितीत देवीचे कुलाचार विधी संपन्न होणार आहेत. याबाबतचा जिल्हाधिकारी यांचा आदेश माहिती आणि जनसंपर्क कार्यालयानं कळविला आहे. परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यांना जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही मात्र लसीकरण न झालेल्या राज्याबाहेरील भाविकांना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तासांच्या आतला आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आली आहे. यात्रा काळात कोरोना नियमांचे पालन बंधनकारक असून हॉटेल, दुकानात असलेल्या कर्मचारी यांचे 2 डोस झालेले असून त्याची यादी प्रशासनाला कळवावी लागणार आहे. घटस्थापनेपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होत आहे. मात्र त्यापूर्वीच हजारोंच्या संख्येने भाविक तुळजापूरमध्ये दाखल झाले आहेत. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारवर ''आईसाहेब" असे लिहिण्यात आले आहे. घटस्थापनेआधी राज्यभरातून विविध भागातून तरुण आई भवानीची ज्योत घेऊन जाण्यासाठी तुळजापुरात येत असतात. आजही मोठ्या संख्येने तरुण आई भवानीची ही ज्योत घेऊन जाण्यासाठी मंदिर परिसरात दाखल झाले आहेत. 


विठ्ठल मंदिर झाले भाविकांसाठी खुले, विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट 


आज शारदीय नवरात्राला सुरुवात होत असताना गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मंदिरे खुली होत असून घटस्थापनेच्या या शुभमुहूर्तावर विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे . पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी ही फुलांची सेवा दिली असून आजच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या जवळपास अडीच टन फुलांचा आणि तुळशीपत्राचा वापर केला आहे . यामध्ये लक्षावधी तुळशीच्या पानांसह झेंडू , गुलाब, अष्टर , शेवंती , जरबेरा , कागडा , कामिनी , ग्लॅडीओ या फुलांचा वापर करण्यात आला आहे . विठुरायाच्या गाभारा त्याच्या लाडक्या तुळशीपत्राने भरून गेला असून रुक्मिणी मातेच्या मागे शेवंतीच्या फुलाचे पडदे करण्यात आले आहेत . मंदिरात विविध रंगी रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्याने आज विठ्ठल भक्तांना आपल्या  लाडक्या  विठुरायाचे सावळे रूप आकर्षक फुल सजावटीमध्ये घेता येणार आहे . या रंगीबेरंगी सुगंधी फुलांमुळे विठ्ठल मंदिर सुवासाने दरवळून निघाले आहे .

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.