Breaking News LIVE Updates : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

Breaking News LIVE Updates, 27 October 2021: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 27 Oct 2021 09:22 PM
मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एकाच वेळी 7 ते 8 वाहनांनी धडक दिली आहे. बिजासण घाटात हा अपघाताचा थरार घडला असून यात अंदाजे तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली काही गंभीर जखमी झाले आहेत.तर इतर जण गंभीर जखमी झाले आहेत.

नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला मान्यता

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला खर्च वित्त समितीची (ईपीसी) मान्यता मिळाली आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता 2,117 कोटी रुपयांचे हे काम प्रत्यक्षात सुरू होईल. आठ वर्षांचा कालावधी काम पूर्ण करण्यासाठी डेडलाइन असून या प्रकल्पांतर्गत 92 एमएलडी क्षमतेचे तीन एसटीपी प्रकल्प, 500 किमी सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे जाळे, पंपिंग स्टेशन आणि सामुदायिक शौचालये बांधण्यात येणार आहेत. 

शिक्षण संचालकांकडून दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अचानक बदल, शाळा प्रशासन गोंधळात

शिक्षण संचालक पुणे यांनी 20 एप्रिल 2021 रोजी काढलेल्या पत्रानुसार राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत जाहीर केल्या होत्या. परंतु आज या सुट्ट्यांमध्ये बदल करून 28 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरपर्यंतच्या सुट्टीचे आदेश काढल्याचे समोर आले आहे . त्यामुळे शिक्षण क्षेत्रात गोंधळ उडाला आहे . काही जिल्ह्यात आठवी ते दहावी पर्यंतच्या शाळेत उस्मानाबाद जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून सध्या प्रथम सत्र परीक्षा सुरू आहे . या परीक्षा 30ऑक्टोबरपर्यंत सुरू रहाणार आहेत . आता या परीक्षा पूर्ण घ्यायच्या की सुट्टी द्यायची यामुळे शाळा प्रशासन गोंधळात पडले आहे .

सात वर्षांखालील मुलांची लसीकरण ‘ट्रायल’ही यशस्वी

सात वर्षांखालील मुलांची लसीकरण ‘ट्रायल’ही यशस्वी


 डोस दिलेली सर्व 15 मुले ठणठणीत


पालिकेच्या नायर रुग्णालयात 18 वर्षे वयापर्यंतच्या मुलांच्या लसीकरणाची ट्रायल 8 ऑक्टोबरपासून सुरू झाली..


 सात वर्षांखालील मुलांची ट्रायल यशस्वी ठरली आहे. 


या ट्रायलमध्ये आतापर्यंत 15 जणांना डोस देण्यात आले असून सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे.


 यामध्ये तीन मुले 2 ते 7 वर्षे वयोगटातील होती. पालिकेचे  वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय संचालक आणि नायरचे डीन डॉ. रमेश भारमल यांनी ही माहिती दिली. 


त्यामुळे मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.

टीम ओमी कलानी आज राष्ट्रवादीमध्ये विलीन, ठाण्यामध्ये मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत उल्हासनगरच्या 22 नगरसेवकांचा पक्ष प्रवेश 

टीम ओमी कलानी आज राष्ट्रवादीमध्ये विलीन, ठाण्यामध्ये मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत उल्हासनगरच्या 22 नगरसेवकांचा पक्ष प्रवेश 

शाळांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान दिवाळी सणाची सुट्टी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२१ दरम्यान दिवाळी सणाची सुट्टी असेल.या कालावधीत शाळांकडून सुरू असलेले ऑनलाइन अध्यापनही बंद राहील.


 





नरेंद्र मोदींच्या 2 दशकांच्या राजकीय कारकीर्दीवर दिल्लीत राष्ट्रीय परिषद

नरेंद्र मोदींच्या 2 दशकांच्या राजकीय कारकीर्दीवर दिल्लीत राष्ट्रीय परिषद,


27-29 ऑक्टोबर इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये परिषद,


डिलिव्हरिंग डेमॉक्रसी ही थीम परिषदेची,


अमित शाह करणार उद्घाटन, म्हाळगी प्रबोधिनी अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार परिषद

नाशिकच्या एस टी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात कामगार एकवटले, सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी

नाशिकच्या एस टी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात कामगार एकवटले, सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी, कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता, वाढीव दराने घरभाडे , वार्षिक सुधारित वेतनवाढ मिळाली पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी उपोषणला सुरुवा

साखरे संदर्भातली अमित शाहांसोबतची बैठक आज संध्याकाळी चार वाजता

साखरे संदर्भातली अमित शाहांसोबत ची बैठक आज संध्याकाळी चार वाजता, अमित शाह यांच्या निवासस्थानी होणार बैठक, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे-पाटील आणि हर्षवर्धन पाटील घेणार भेट

नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे मार्गावरील अनेक ट्रेन फेऱ्या रद्द

27 ते 30 ऑक्टोबर दरम्यान  नागपूर-- मुंबई, नागपूर-पुणे  दरम्यान धावणाऱ्या 12 ट्रेन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत..बडनेरा-भुसावळ दरम्यान इन्फ्रास्ट्रक्चर कामामुळे नागपूर- मुंबई,  नागपूर - पुणे मार्गावर 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान अनेक गाड्या रद्द तर नागपूर- अहमदाबाद 01137 या गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे..

सोलापूर जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातील हमाल कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन

सोलापूर जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातील हमाल कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन, ऐन दिवाळीत हमाल कामगारांवर उपासमारीची वेळ,आजपासून सर्व शासकीय धान्य गोदामातील हमाल कामगारांचे आपल्या हक्काच्या कष्टाच्या लाखो रुपये थकीत पगाराबाबत बेमुदत काम बंद आंदोलन, जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांची माहिती

पालखी मार्ग भूमिपूजन सोहळा लांबला, पंतप्रधान येण्याची शक्यता असल्याने 30 ऑक्टोबर रोजी होणार कार्यक्रम पुढे ढकलला

पालखी मार्ग भूमिपूजन सोहळा लांबला, पंतप्रधान येण्याची शक्यता असल्याने 30 ऑक्टोबर रोजी होणार कार्यक्रम पुढे ढकलला, 30 तारखेला नितीन गडकरी , उद्धव ठाकरे , अजित पवार , देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार होता कार्यक्रम.  हा कार्यक्रम रद्द झाल्याचा मेल गडकरी यांच्या मंत्रालयाकडून मिळाला आहे

पार्श्वभूमी

सोलापुरातील आग आटोक्यात, दोषींवर कारवाई करणार: पालिका आयुक्त



साडेतीन तासानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे.इमारतीमध्ये फायर सिस्टीम होती मात्र मागच्या दहा वर्षात त्याला रिन्यू करण्यात आलं नाही. तसेच या इमारतीचे फायर ऑडिट देखील झालेले नाही. इमारतीच्या बेसमेंटचा वापर पार्किंगसाठी करण्याऐवजी त्या ठिकाणी साहित्यदेखील स्टोअर ठेवण्यात आले होते. हे सर्व कारण पाहता दोषींवर ती कारवाई करण्यात येईल असं पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी म्हटलंय.  आग विजवण्यासाठी जवळपास 40 पाण्याचे बंब, तीन फोमचे बॅरल वापरण्यात आले.  


माजी अॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी उच्च न्यायलात आर्यन खानच्या वतीनं बाजू मांडणार



Aryan Khan Bail Plea Hearing : क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. यावेळी आर्यन खानच्या वतीने माजी अॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी उच्च न्यायलात बाजू मांडणार आहेत. गेल्या आठवड्यात बुधवारी विशेष एनडीपीएस कोर्टानं आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात विशेष एनडीपीएस कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त कोर्टाचं कामकाज बंद होण्याआधी जामीन मिळवण्याचा आर्यनच्या वकीलांचा प्रयत्न असेल. आर्यनच्या वकिलांसमोर 30 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आहे. कारण त्यानंतर 12 दिवस कोर्टाला दिवाळीची सुट्टी असणार आहे. जर या पाच दिवसांत कोर्टात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होऊन कोर्टाने आपला निर्णय दिला नाही तर आर्यन खानला दिवाळीपर्यंत जेलमध्येच राहावं लागेल. 


Aryan Khan Bail Plea Hearing : जेल की बेल? मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी



Aryan Khan Bail Plea Hearing : मुंबई क्रूझ ड्रग्स (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. गेल्या 18 दिवसांपासून आर्यन खान अटकेत आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी विशेष एनडीपीएस कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात विशेष एनडीपीएस कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात मंगळवारी (आज) सुनावणी पार पडणार आहे. 




- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.