Breaking News LIVE: ज्येष्ठ गायक व संगीतकार मिलिंद इंगळे यांचे वडील पंडित माधव इंगळे यांचे निधन
Breaking News LIVE Updates, 21 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पुण्यातून जाणाऱ्या पुणे- बंगलोर महामार्गावर नवले पुलाजवळ एका केमिकल टॅकरचा भीषण अपघात होऊन चौघांचा मृत्यु झालाय. कालच या ठिकाणी एका ट्रकने धडक दिल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला होता. महामार्गाच्या सदोष रचनेमुळे हा भाग मृत्युचा सापळा बनलाय.
ज्येष्ठ गायक व संगीतकार मिलिंद इंगळे यांचे वडील पंडित माधव इंगळे यांचे आज दु 12 वाजून 27 मिनिटांनी वयाच्या 88 वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्याच्या मागे त्याचे चिरंजीव गायक संगीतकार मिलिंद इंगळे, नातू संगीतकार सुरेल इंगळे व सून मानसी इंगळे ज्या इव्हेंट्स ऑर्गनायजर आहे हे आहेत.
गोव्यातल्या राजकीय स्थिती संदर्भात दिल्लीत खलबतं सुरु आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्वाची बैठक सुरु असून त्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही उपस्थिती आहे. गोव्यात भाजपच्या रणनीती संदर्भात, संभाव्य युतींबद्दल चर्चेची शक्यता आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1 हजार 632 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 40 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर 1 हजार 744 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रिकव्हरी रेट 97.46 टक्क्यांवर पोहचला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 65 लाख 99 हजार 850 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावातील बॅक दरोड्याच्या प्रकरणात तपास सुरु. बॅकानीही या प्रकरणात सुरक्षेत लक्ष घालण्याची गरज. नगर आणि नाशिक जिल्ह्यातील पोलिसांना देखील या संदर्भात माहिती देण्यात आली आहे आणि तिथे देखील या आरोपींचा शोध सुरू आहे असं पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितलं. पुणे ग्रामीण पोलिसाकडून 10 पथक तयार करण्यात आली आहेत. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी काही सीसीटीव्ही मध्ये दिसली आहे. त्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून देखील तपास केला जातोय..
ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संघटनेचा संपाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून एसटीच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या द्या अन्यथा संप करू असा इशारा ऐन दिवाळीत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एस टी कर्मचारी संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिलाय.त्यामुळे जरा ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला तर राज्यातील ग्रामीण भागात प्रवाश्यांचे मोठे हाल होण्याची शक्यता निर्माण झालीय त्यामुळे सरकार आता नेमकी काय भूमिका घेत याकडे लक्ष लागलंय..
मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग, लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. परंतु, अपुरी साधन सामुग्री आणि इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी असलेल्या चिंचोळ्या गल्ल्या यांमुळे अग्निशमन दलाला अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. निवडणूक, शिक्षण, शिक्षणासाठीचे प्रवेश, जात पडताळणी यासाठी किंवा जिथे कुठे शपथपत्र आहे, त्यासाठी मुद्रांक लागणार नाही. त्यासाठी कुणी सक्ती केली तर तो न्यायालयाचा अवमान असेल. २००४ सालीच राज्य सरकारने शपथपत्रासाठी शंभर रुपयाच्या मुद्रांकाची कुठल्याही शासकीय कामासाठी गरज नाही, कुणालाही शपथपत्र सादर करण्यासाठी त्याची सक्ती करू नये असे परिपत्रक काढले होते. परंतू त्याची अंमलबजावणी होत नव्हती. काही वेळेस १०० रूपयासाठी ५०० रुपयांचे मुद्रांक वापरले जात होते. परंतू १६ तारखेला दिर्घकाळ चाललेली जनहित याचिका निकाली काढताना तशी सक्ती कुणीही केली कुठलाही शासकीय अधिकारी कर्मचारी असं करताना आढळला तर ते उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन ठरेल असा आदेश दिला आहे.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सचिन सावंतांची अनुपस्थिती. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पदाधिका-यांची काल महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती...
मात्र, या बैठकीत सचिन सावंतांच्या अनुपस्थितीमुळे काँग्रेसच्या अंतर्गत गोटात सावंतांच्या नाराजीबाबतच चर्चा आहेत...
प्रदेश काँग्रेस मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढेंची नियुक्ती झाल्यानं सचिन सावंत नाराज असल्याचं कळतंय...
तर, कुणाला संधी मिळते म्हणून नाराज होण्याचं कारण नाही...काही गैरसमज असले तर ते बसून सोडवू असं नाना पटोले म्हणलेत...
तर, आजच्या बैठकीला वैयक्तिक कारणांमुळे येऊ शकलो नाही अशी प्रतिक्रीया सचिन सावंतानी दिलीय...
देशात कोरोना रुग्णाच्या संख्येत घट होत असतानाच पश्चिम बंगालमधून (West Bengal) चिंता वाढवणारी नव्या कोरोना रुग्णांची संख्या समोर आली आहे. मागील 24 तासांत पश्चिम बंगालमध्ये नव्या 833 रुग्णांची भर पडली आहे. तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील एकूण कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची संख्या 15 लाख 83 हजार 646 इतकी झाली आहे. तर मृताची संख्या 19 हजार 21 इतकी झाली आहे. दुर्गा पूजा (Durga Puja) उत्सवावेळी ऊसळलेल्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.
काल देशानं कोरोना लसीकरणात एक महत्वाचा टप्पा पार केला. देशानं 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स आणि देशवासियांचे आभार मानले. आज या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) याबाबत माहिती देण्यात आली आहे.
कोरोना लसीकरणासह मोदींच्या संबोधनात काश्मीरमधील घडामोडींवर देखील भाष्य होण्याची शक्यता आहे. काल देशातील लसीकरणाने 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला. यानंतर बोलताना मोदींनी म्हटलं होतं की, ही भारतासाठी गौरवास्पद कामगिरी असून हे यश देशातील 130 कोटी जनतेचं आहे. हे यश साध्य करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या, शास्त्रज्ञ तसेच आंत्रप्रुनर्स यांचं पंतप्रधानांनी आभार मानले होते. 21 ऑक्टोबर 2021 या दिवसाची इतिहासात नोंद केली जाईल असंही पंतप्रधानांनी म्हटलं होतं.
Pune Ajit Pawar Live : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्यात आजपासून नाट्यगृहे (Theatre) आणि चित्रपटगृह (Cinema Hall) सुरु होत आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात बोलताना महत्वाचं भाष्य केलं आहे. बालगंधर्व रंगमंदिरात नटराज पूजन झाल्यानंतर रंगमंचावर आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी म्हटलं की, दिवाळीनंतर देखील कोरोना रुग्णांची संख्या अशीच कमी होत राहिली तर नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना शंभर टक्के प्रेक्षक क्षमतेची परवानगी देण्यात येईल. कलाकारांना कोरोना काळात खूप काही सहन करावं लागलं असल्याचं सांगत कलाकारांच्या मंडळाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असं आश्वासन देखील पवारांनी दिलं.
पार्श्वभूमी
PM Modi To Address Nation: पंतप्रधान मोदींचा आज देशवासियांशी संवाद, मोठ्या घोषणेची शक्यता
PM Modi To Address Nation Today: काल देशानं कोरोना लसीकरणात एक महत्वाचा टप्पा पार केला. देशानं 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स आणि देशवासियांचे आभार मानले. आज या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) याबाबत माहिती देण्यात आली आहे.
कोरोना लसीकरणासह मोदींच्या संबोधनात काश्मीरमधील घडामोडींवर देखील भाष्य होण्याची शक्यता आहे. काल देशातील लसीकरणाने 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला. यानंतर बोलताना मोदींनी म्हटलं होतं की, ही भारतासाठी गौरवास्पद कामगिरी असून हे यश देशातील 130 कोटी जनतेचं आहे. हे यश साध्य करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या, शास्त्रज्ञ तसेच आंत्रप्रुनर्स यांचं पंतप्रधानांनी आभार मानले होते. 21 ऑक्टोबर 2021 या दिवसाची इतिहासात नोंद केली जाईल असंही पंतप्रधानांनी म्हटलं होतं.
China Corona Update : चीनमध्ये कोरोना रिटर्न्स! जगातील सर्वाधिक लसीकरण होऊनही पुन्हा लॉकडाऊनची वेळ
देशाने आता कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचे सुरक्षा कवच प्राप्त केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, "सबका प्रयास ही जी गोष्ट आहे ही सामूहिक इच्छाशक्तीच्या आधारे साध्य करता येते. आजचे यश हे देशातील आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स, शास्त्रज्ञ, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या, लस वाहतूक करणारे कर्मचारी तसेच 130 कोटी देशवासियांच्या सामूहिक इच्छाशक्तीचा परिणाम आहे. या नंतरच्या काळातही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तातडीने उपचार मिळावा याकडे आपले लक्ष असेल."
Maharashtra Unlock : आजपासून नाट्यगृहे (Theatre) आणि चित्रपटगृह (Cinema Hall) सुरु होणार आहेत. दरम्यान आजपासूनच अम्युझमेंट पार्कही (Amusement Park) खुली करण्यात येणार आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्य सरकारने काल शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आजपासून म्हणजेच, 22 ऑक्टोबरनंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती.
गेले अनेक दिवस सिने-नाट्यगृहे कधी सुरु होणार अशी चर्चा सिने-नाट्यवर्तुळात होत होती. सिनेमाप्रेमीदेखील कधी सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहता येईल याची वाट बघत होते. तर नाट्यप्रेमी त्यांच्या लाडक्या तिसऱ्या घंटेचा आवाज कानात कधी घुमणार याची प्रतिक्षा करत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर थिएटर मालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळुन खुली करण्यास परवानगी देण्यात येईल. असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोषित केले होते. यासंदर्भात सविस्तर कार्यपध्दती एसओपी तयार करणयाचे काम सुरु असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. टास्कफोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत चर्चा केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -