Breaking News LIVE : डहाणू येथे मालगाडीचे डबे घसरल्याने मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या गाड्यांना उशीर

Breaking News LIVE Updates, 11 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Oct 2021 04:53 PM
डहाणू येथे मालगाडीचे डबे घसरल्याने मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या गाड्यांना उशीर

पश्चिम रेल्वेच्या डाऊन लाईनवर डहाणू येथे मालगाडीचे डबे सकाळी साडेदहा वाजता घसरले होते. सध्या हे डबे काढण्याचं काम क्रेनच्या साह्याने सुरू असून काही काळ मुंबईहून गुजरात कडे जाणाऱ्या लोकल व ट्रेन उशिराने धावत आहेत

अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर निवासस्थानी सीबीआयचे धाडसत्र सुरू

काही दिवसांपूर्वी सीबीआयचा अहवाल म्हणून काही कागदपत्र लीक झाली होती, त्याच प्रकरणात अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर निवासस्थानी सीबीआयचे धाडसत्र सुरू आहे...

या प्रकरणात एका सीबीआयचा अधिकाऱ्याला आणि अनिल देशमुख यांच्या लीगल टीम मधील एका वकिलाला अटक करण्यात आली होती...

तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा

शारदीय नवरात्र महोत्सवात आज पाचव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली आहे. नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. या दिवसाचे महत्व असे की, भगवान विष्णू सागरामध्ये शेष शैयावरती विश्राम घेत असताना मातेने विष्णु यांच्या नेत्र कमलात जावून विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मला (मळ) पासून दोन दैत्य उत्पन्न झाले त्यांची नावे शुंभ व निशुंभ आहेत. ते उत्पन्न होताच शेष शैयावरील विष्णूवरती आक्रमण करण्यास जाऊ लागले. त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव यांनी विष्णूच्या नेत्र कमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तूती करुन श्रीस जागविले आणि विष्णूवरती आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी मातेने केला म्हणून विष्णूने आपले शेष शैया श्रीस विश्राम करण्यासाठी दिले. त्यामुळे ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते. अशी आख्यायिका सांगितली जाते. शारदीय नवरात्र महोत्सवात दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले. 

क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावीबद्दल आणखी एक धक्कादायक प्रकरण उघड

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावीबद्दल आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. किरण गोसावी याच्या विरुद्ध पुण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार असल्याच उघडकीस आलं होतं. आता पालघर जिल्ह्यातील दोघांची परदेशात नोकरी लावण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. पालघरच्या दोन तरुणांनी किरण गोसावीविरोधात तक्रार दिली आहे. आर्यन खान प्रकरणामधील NCB ने ज्याला पंच केलाय,तोच पंच किरण गोसावी फसवणुकीचं रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक आरोप पालघरमधील पीडित तरुणांनी केला आहे.

भारत-चीन यांच्यातील बैठक तब्बल आठ तासांनी संपली, पूर्व लडाखमधील सैन्यमाघारीच्या मुद्द्यावर चर्चा

पूर्व लडाखमधील वादावर काल (रविवारी) भारत-चीन (India-China) मध्ये तेरावी महत्त्वाची बैठक पार पडली. भारत (India) आणि चीन (China) यांच्यात काल, रविवारी पूर्व लडाखमधील सैन्यमाघारीच्या मुद्द्यावर लष्करी पातळीवर चर्चेची तेरावी फेरी झाली. ही बैठक तब्बल आठ तास चालली. दरम्यान, या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर आणि काय चर्चा झाली, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि चीन या दोन्ही देशांत लष्करी पातळीवर काल तेराव्या फेरीची बैठक पार पडली. संध्याकाळी 7 वाजता ही बैठक पार पडली. सकाळी 10.30 वाजता चीनमधील पीएलए सेनेच्या मेल्दो गॅरिसनमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूर्व लडाखला लागून असलेल्या एलएसीवरील तणाव संपवण्यासाठी भारत आणि चीनमध्ये लष्करी पातळीवर तेराव्या फेरीची बैठकआयोजित करण्यात आली होती. ही बैठक पीएलए सैन्याच्या मोल्दो येथे पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये पूर्व लडाखच्या गरम पाण्याच्या झऱ्यापासून मागे हटण्यावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. 12 फेऱ्यांच्या बैठकीदरम्यान, पूर्व लडाखला लागून असलेल्या वास्तविक नियंत्रण रेषेच्या (एलएसी) फिंगर एरिया, कैलाश हिल रेंज आणि गोगरा भागात विघटन करण्यात आलं होतं. पण हॉट स्प्रिंग, डेमचोक आणि डेपसांग मैदानावर अजूनही तणाव कायम आहे. याबाबत कालच्या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. 

ऑक्टोबरमध्ये 3.30 रुपयांनी महागलं डिझेल; पेट्रोलच्या दरांनीही गाठला उच्चांक

पेट्रोल आणि डिझेल (Petrol-Diesel Price) मध्ये सातत्यानं होणाऱ्या वाढिमुळं सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. आज सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलची किंमत 30 पैशांनी वाढली आहे. तर डिझेलच्या किमतीमध्ये 35 रुपये प्रति लिटरनं वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. या महिन्यात पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबण्याचं नावच घेत नाहीये. या महिन्यात सोमवारी, 4 ऑक्टोबर वगळता दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.  अशातच केवळ ऑक्टबर महिन्याच्या 10 दिवसांतच पेट्रोलची किंमत 2.80 रुपयांनी वाढली आहे. तर डिझेलची किंमत 3.30 रुपयांनी वाढली आहे. आजही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. पेट्रोलचे दरवाढिनंतर दिल्लीत पेट्रोल 104.44 रुपये प्रति लिटर विकलं जात आहे. तर डिझेलची किंमत प्रति लिटर 93.18 रुपयांवर पोहोचली आहे. 

कोळशाची कमतरता, विजेविना महाराष्ट्र अंधारात जाणार

देशात कोळशाची कमतरता असून याचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, राज्यातील सहा औष्णिक विज निर्मिती केंद्रातले प्लांट कोशळ्याअभावी बंद करण्यात आले आहेत. वीजतूट भरुन काढण्यासाठी कोयना आणि इतर 12 होयड्रो प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर हीच परिस्थिती राहीली तर शहरी/ग्रामिण भागात आठ तासाचे लोडशेडींग करावे लागेल. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर कमी करा, अशी विनंती महावितरणने केली आहे. दरम्यान, देशात कोळशाची कमतरता आणि वीज संकटाच्या चर्चांवर सरकारने वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता निराधार असल्याचे म्हटले आहे.

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक

उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.  आज, 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलंय. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मेडिकल स्टोअर्स, दूध पुरवठा, रुग्णालये इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद राहणार आहेत.

काय म्हणाले महाविकास आघाडीचे नेते

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लखीमपूर हिंसाचारावर चर्चा करण्यात आली. त्या घटनेत निधन झालेल्या व्यक्तींना मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. यादिवशी अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व दिवसभर बंद राहिल अशी माहिती मंत्री जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर यांनी दिली होती.  हा बंद पक्षाच्या वतीने आहे सरकारच्या वतीने नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं होतं. तर शेतकऱ्यांचा पाठीशी शिवसेना नेहमी राहिली आहे, त्यामुळे बंदमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. शेतकरी आंदोलन चिरडताना भाजपची मानसिकता दिसून आली, जनरल डायरच्या भूमिकेत भाजप दिसून आली, असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते.  

पार्श्वभूमी

Maharashtra Bandh: लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक, कुणाकुणाचा पाठिंबा?

Petrol Diesel Price : ऑक्टोबरमध्ये 3.30 रुपयांनी महागलं डिझेल; पेट्रोलच्या दरांनीही गाठला उच्चांक; एक लिटरचे दर काय?

पेट्रोल आणि डिझेल (Petrol-Diesel Price) मध्ये सातत्यानं होणाऱ्या वाढिमुळं सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. आज सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलची किंमत 30 पैशांनी वाढली आहे. तर डिझेलच्या किमतीमध्ये 35 रुपये प्रति लिटरनं वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. या महिन्यात पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबण्याचं नावच घेत नाहीये. या महिन्यात सोमवारी, 4 ऑक्टोबर वगळता दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.  अशातच केवळ ऑक्टबर महिन्याच्या 10 दिवसांतच पेट्रोलची किंमत 2.80 रुपयांनी वाढली आहे. तर डिझेलची किंमत 3.30 रुपयांनी वाढली आहे. आजही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. पेट्रोलचे दरवाढिनंतर दिल्लीत पेट्रोल 104.44 रुपये प्रति लिटर विकलं जात आहे. तर डिझेलची किंमत प्रति लिटर 93.18 रुपयांवर पोहोचली आहे. 

या महिन्यात 2.80 रुपये महागलं पेट्रोल, तर डिझेलच्या दरांत 3.30 रुपयांची वाढ  

या महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोल 25 पैशांनी महाग झालं होतं, तर डिझेलही 30 पैसे प्रति लिटरनं महागलं होतं. दरम्यान, गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पेट्रोलच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली होती. अशातच डिझेलच्या किमतीतही सातत्यानं वाढ होत आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली. 10 दिवसांत डिझेल 3.30 रुपयांनी महाग झालं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.