Breaking News LIVE : राज्यात आज 29,177 रुग्णांना डिस्चार्ज, 26,672 नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर 594 जणांचा मृत्यू
Breaking News LIVE Updates, 23 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राज्यात आज 29,177 रुग्णांना डिस्चार्ज, 26,672 नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर 594 जणांचा मृत्यू
Mumbai Corona Cases : मुंबईत गेल्या 24 तासात 1431 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 1470 रुग्णांची कोरोनावर मात, सध्या मुंबईत 28410 अॅक्टिव्ह रुग्ण
CBSE बारावी परीक्षा संदर्भात अंतिम निर्णयासाठी अजून वेळ लागणार, राज्यांना 25 मे पर्यंत सविस्तर सूचना पाठवण्याचं आवाहन, त्यानंतर केंद्र सरकार याबाबत निर्णय जाहीर करणार
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झटणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. मागील महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पोस्ट कोव्हिड उपचारासाठी ते एका खासगी रुग्णालयात दाखल होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. धक्कादायक म्हणजे मागील आठवड्यातच त्यांच्या पत्नी आणि मागील महिन्यात जावयाचे देखील कोरोनाने निधन झाले होते. महामुद पटेल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बळीराजाच्या प्रश्नांसाठी झटत होते. 27 एप्रिलला त्यांचे जावई इरफान पटेल तर 17 मे रोजी पत्नी लैलाबी महामुद पटेल यांचे देखील कोरोनामुळे निधन झाले होते.
मुंबई : विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता असेल आणि तिच प्राथमिकता लक्षात घेऊन परीक्षांसंदर्भातील निर्णय लवकरच घेऊ, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. कोरोनाची गंभीर परिस्थिती न्यायालयासमोर मांडू, असंही त्या बोलताना म्हणाल्या. आज सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय घेऊ असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी दोन दिवसांत बैठक घेणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
कल्याण तालुक्यातील म्हारळ गावातील म्हारळेश्वर विद्यालयातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि संस्थेचा विद्यमान सचिव दिलीप हिंदुराव याच्यासह जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालय अधीक्षक चित्रा भारमल या दोघांना याच विद्यालयातील एका शिक्षिकेकडून तीन लाख रुपयाची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. संस्थेत शिक्षक पदावर भरती करण्यासाठी या दोघांनी तक्रारदार शिक्षिकेकडे साडे सात लाखांची लाच मागितली होती .
लहान मुलांना घरीच कोणतंही औषध देऊ नका. चिमुकल्यांसदर्भात मुख्यमंत्र्यांचं आवाहन कोरोना संसर्गाच्या बाबतीत लहान मुलांच्या पालकांनी घाबरू नये. लहान मुलांमधील कोरोना धोक्याबाबत मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद
सकाळी 9.17वाजता भूकंपाचा सौम्य धक्का. 2.9 रिश्टर स्केलचा भूकंप असल्याची माहिती . कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याची वरिष्ठ अधिकार्यांची माहिती
साताऱ्याला ३.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का, ९:१६ मिनिटांनी जाणवले भूकंपाचे धक्के
कोविन ऍपवरून नोंदणी केल्यानंतर नागरिकांना रुबी, जहांगीर, सह्याद्री, कोलंबिया आणि नोबल या पाच रुग्णालयात ही लस दिली जाणार आहे. प्रत्येकी 900 इतकी एका डोसची किंमत आहे.
जागतिक स्तरावर भारताच्या वतीनं कुस्ती क्षेत्रात प्रतिनिधीत्त्वं करणाऱ्या पैलवान सुशील कुमार याला अखेर ताब्यात घेण्यात आलं आहे. ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर धनखडच्या मृत्यू प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सुशील कुमारविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती.
परभणीत कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला असून याच अनुषंगाने पोलिसांकडून विनाकारण बाहेर फिरणार्यांवर कारवाई करून कोरोना तपासणी केली जात आहे. मात्र याच कारवाई दरम्यान एका दाम्पत्याने गोंधळ घालत पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत चांगलीच अरेरावी करत त्याचा व्हिडीओ काढून सोशल माध्यमांत वायरल केला. नंतर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला, मग याचे डोके ठिकाणावर आले आणि मग यातील पतीने माफी मागीतलीय
परभणीत कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला असून याच अनुषंगाने पोलिसांकडून विनाकारण बाहेर फिरणार्यांवर कारवाई करून कोरोना तपासणी केली जात आहे. मात्र याच कारवाई दरम्यान एका दाम्पत्याने गोंधळ घालत पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत चांगलीच अरेरावी करत त्याचा व्हिडीओ काढून सोशल माध्यमांत वायरल केला. नंतर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला, मग याचे डोके ठिकाणावर आले आणि मग यातील पतीने माफी मागीतलीय
परभणीत कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला असून याच अनुषंगाने पोलिसांकडून विनाकारण बाहेर फिरणार्यांवर कारवाई करून कोरोना तपासणी केली जात आहे. मात्र याच कारवाई दरम्यान एका दाम्पत्याने गोंधळ घालत पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत चांगलीच अरेरावी करत त्याचा व्हिडीओ काढून सोशल माध्यमांत वायरल केला. नंतर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला, मग याचे डोके ठिकाणावर आले आणि मग यातील पतीने माफी मागीतलीय
शब्बीर हुसेन हसन अली असे पकडण्यात आलेले व्यक्तीचे नाव असून तो मध्यप्रदेशातील इटारसी वरून नागपूरपर्यंत रेल्वेने प्रवास करत त्याच्या जवळील बॅगमध्ये 60 लाख रुपयांची रोकड घेऊन येत होता
केईएम रुग्णालयातील अकाऊन्टंटला अटक. अकाऊन्टंटवर 5 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप. मुंबई पोलिसांकडून कारवाई
दोन गटातील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करून मारहाण केल्याची गंभीर घटना परभणी च्या पालम तालुक्यातील कापसी येथे घडली. या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्यात 21 तारखेपासून सगळ्या लसीकरण केंद्राला टाळे लागल्याचं दिसून येतंय. अमरावती महानगरपालिकेच्या केंद्रावर तूर्तास लस उपलब्ध नाहीत, लस उपलब्ध झाल्यावर कळविण्यात येईल असं महानगरपालीकेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आज दुपारपर्यंत 13 हजार लसीचे डोज उपलब्ध होणार आणि सोमवारी लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.
पार्श्वभूमी
रायगडच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यांवर दोन दिवसांत आढळलेले पाच मृतदेह बार्जमधील बेपत्ता व्यक्तींचे असल्याचा अंदाज
मागील दोन दिवसात रायगड जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवर पाच अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अलिबाग आणि मुरूडच्या समुद्रकिनाऱ्यावर हे मृतदेह आढळून आले आहेत. रायगड जिल्ह्याच्या मुरूड समुद्रकिनारी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. अर्धनग्न अवस्थेत आढळून आलेल्या या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
राज्यात शनिवारी 40,294 रुग्ण बरे होऊन घरी, 26,133 नव्या रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून घातलेल्या निर्बंधांचा चांगलाच परिणाम झाल्याचं समोर येत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहे. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. आज 40,294 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 26,133 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 51,11,095 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.04% एवढे झाले आहे.
मोह मायाची बंधने तोडणारी एकादशी म्हणजे, अश्विन शुद्ध अर्थात मोहिनी एकादशी
मानवाच्या सर्व अर्थाचे कारण असते तो त्याच्या मनातील विषयाचा मोह आणि तो मोह नष्ट करणारी एकादशी म्हणजे अश्विन शुद्ध अर्थात मोहिनी एकादशी या नावाने प्रचलित आहे. यंदा हजारो वर्षातून येणारा योग्य आला असून याला त्रुस्पर्श वंजूला महाद्वादशी असे म्हणतात. म्हणजे आज एकादशी आहे. द्वादशीही आहे. आणि त्रयोदशीही आहे. अश्विन शुद्ध अर्थात मोहिनी एकादशी ही काल सकाळी सव्वानऊ वाजता सुरु झाली. याला वारकरी संप्रदायात स्मार्त एकादशी म्हणतात. ही एकादशी आज सकाळी पावणे सात वाजता संपून द्वादशी लागत असली तरी सूर्याने पाहिलेली एकादशी ही आजची असल्याने वारकरी संप्रदायात अशा एकादशीनं भागवत एकादशी म्हणतात. त्यामुळे आज वारकरी संप्रदाय या मोहिनी एकादशीचे व्रत करीत असतो.
कोरोनानंतर काळ्या बुरशीचा कहर, 14 राज्यांत साथरोग म्हणून जाहीर; कोणत्या राज्यात किती केसेस?
एकीकडे कोरोनाचं थैमान सुरु असताना आता देशासमोर नवीन संकट उभं राहिलं आहे. कोरोनानंतर आता म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशी या आजाराने डोकं वर काढलं आहे. म्युकरमायकोसिस या आजाराने गेल्या काही दिवसात हजारो लोकांना बाधा झाली आहे. आतापर्यंत हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह 14 राज्यांत हा आजार साथीचा रोग जाहीर झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -