Breaking News LIVE: धुळे जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पोलिस प्रशासनाच्या वतीने रात्री आठ ते सकाळी आठ वाजेदरम्यान संचारबंदी

Breaking News LIVE Updates, 2 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Mar 2021 10:00 PM
भिवंडी शहरातील आसबीबी परिसरात व्हॉल्व तुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर. एकीकडे पाण्याची कमतरता असल्याने शहरात पाणी कपात केली जात आहे तर दुसरीकडे पालिकेच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. सध्या पालिकेच्या वतीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
एका सेकंदाने बिबट्याच्या हल्ल्यातून दोन युवक बचावले. हा व्हिडीओ भानखेडा रोडवरील अमरावती शहराला लागून असलेल्या छत्री तलावा लगतचा असल्याचं बोलल्या जात आहे. या व्हिडीओमध्ये एक चारचाकी चालवणाऱ्या चालकाला रस्त्याच्या कडेला एक बिबट दिसला. त्यामुळे त्याने आपली चारचाकी थांबवली पण पाठीमागून दोन युवक हे मोटार सायकलने समोर गेले असता तेव्हा लगेच बिबट्याने हल्ला चढवला पण थोडक्यात हे युवक बचावले.
अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात 673 कोरोना रुग्णांची नोंद. आज 9 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या पोहचली 37 हजार 796 वर. लॉकडाऊनच्या दहाव्या दिवशीही परिस्थीती जैसे थे.
धुळे जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पोलिस प्रशासनाच्या वतीने रात्री आठ ते सकाळी आठ वाजेदरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकाच दिवसात 207 रुग्णांची भर पडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, वैद्यकीय सुविधा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गुरुवार पासून हा निर्णय घेण्यात आला असून अनिश्चित काळासाठी ही संचार बंदी असणार आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले
संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केला आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेला आरोपी बाळ बोठे फरार घोषित. पारनेर न्यायालयाचा आदेश. 9 एप्रिलपर्यंत बोठे यांना स्वतःहून हजर होण्याचे आदेश.
तोतया पोलिसाचा महिलेवर अत्याचार, राहाता तालुक्यातील महिलेची फसवणूक. पोलीस दलात भर्ती करण्याचे आमीष. महिलेशी ठेवले शारीरीक संबध. लग्नाचे आमीष दाखवून वारंवार शारीरीक शोषण. बीड जिल्ह्यातील हिवराफाडी येथील आरोपी. किरण महादेव शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल. शिर्डी पोलीस ठाण्यात नोकरीला असल्याचं भासवलं. तोतया असल्याचं लक्षात आल्यावर महिलेकडून गुन्हा दाखल. किरण शिंदे गजाआड.
रमेश जारकीहोळी यांच्या समर्थकांनी बेळगाव, गोकाक आणि अथणी येथे निदर्शने करुन अश्लील सीडी प्रकरणाचा तपास करुन सत्य जनतेसमोर अणावे अशी मागणी केली.
बेळगावात रमेश जारकीहोळी समर्थकांनी मोठ्या संख्येने जमून राणी कीत्तुर चन्नमा चौकात मोठ्या संख्येने जमून रास्ता रोको केला. नंतर तिथून जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. न्याय द्या, न्याय द्या आणि रमेश जारकीहोळी यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या. अश्लील सीडीमधील व्हिडीओ फेक आहे. लवकरात लवकर सरकार आणि पोलीस खात्याने याची चौकशी करुन सत्य बाहेर आणावे अशी मागणी केली. नंतर समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. अथणी इथे देखील जारकीहोळी समर्थकांनी रस्त्यात टायर जाळून वाहतुकीला अडथळा निर्माण केला. मोर्चाने जाऊन अथणी तहसीलदारांना निवेदन दिले. गोकाक इथेही समर्थकांनी मोठ्या संख्येने जमून रमेश जारकीहोळी यांची बदनामी करण्यासाठी विरोधकांनी रचलेले हे षडयंत्र आहे असा आरोप केला.
अकोल्यात जिल्हा प्रशासनाने कोरोना नियम शिथील केलेत. आता उद्यापासून सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या काळात सर्वप्रकारची प्रतिष्ठाणे सुरू राहणार. हॉटेल आणि रेस्टॉरंट सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत पार्सल सुविधेसाठी उघडे राहणार. आज मध्यरात्रीपासून आधीचे निर्बंध हटणार. सर्व व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक. व्यापारी संघटनांच्या निर्बंधांना विरोधानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश.
कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव गावात उपसरपंच निवडीवरून एका ग्रामपंचायत सदस्याचा खून. पांडुरंग काळे (वय 55) असे मृत सदस्यांचे नाव असून ते शिवसेना पक्षाचे सदस्य होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी खून केल्याची माहिती.
धुळे जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ओबीसी समाजाचे 59 टक्के ऐवजी 73 टक्के आरक्षण काढण्यात आले होते. याविरोधात राष्ट्रवादीचे किरण पाटील यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देत होते या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल देत धुळे तालुक्यासह शिरपूर आणि शिंदखेडा येथील 13 जागांसाठी निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.
यामुळे धुळे जिल्हा परिषदेच्या 13 जागांसाठी पुन्हा निवडणूक घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदे वर सध्या भाजपची सत्ता असून आरक्षणाच्या मुद्द्यावर आता 13 जागांसाठी पुढील दोन आठवड्यामध्ये पुन्हा निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे.
मलबार हिल येथे असलेल्या "लोढा अल्टामाउंट" अपार्टमेंटला लागून असलेल्या झाडांच्या कट्ट्याला आज महानगरपालिकेकडून तोडण्यात आले. लोढा अल्टामाऊंट ही इमारत मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाच्या समोरच आहे. अॅडव्होकेट धरम मिश्रा यांच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. फुटपाथवर बांधण्यात आलेल्या या कट्ट्यामुळे लोकांना त्रास होत होता. मुंबई मधील सर्वात महागडे फ्लॅट या बिल्डिंग मध्ये आहे. या बिल्डिंगमध्ये प्रत्येक फ्लॅटची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.
मराठा आरक्षण प्रकरणी केंद्र सरकारचे सर्वोच्च विधी अधिकारी अँँटर्नि जनरल के.के. वेणुगोपाल यांनी राज्य शासनाच्या विधी अधिकाऱ्यांना भेट नाकारली
,
महाराष्ट्राचे महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी व माजी महाधिवक्ते विजयसिंह थोरात यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अॅटर्नी जनरल यांना भेटीसाठी वेळ देण्याची विनंती केली होती
,

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणात अनेक कायदेशीर पेच असून, त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या अॅटर्नी जनरल यांची वेळ मागितली होती
,
परंतु, के.के. वेणुगोपाल यांनी या भेटीसाठी नकार दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मी सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसवरून बाजू मांडणार आहे
,
त्यामुळे तटस्थता कायम ठेवण्यासाठी पक्षकाराला भेटणे योग्य ठरणार नाही
,

या आधी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मराठा आरक्षण बैठकीडे पाठ फिरवली होती
,
आता केंद्रातील विधी अधिकारी राज्यातील विधी अधिकाऱ्यांना भेट नाकारली
जालना -स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या युवा जिल्हाध्यक्ष निवृत्ती शेवाळे अटक, शेतात अफूची लागवड केल्या प्रकरणी अटक, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील चणेगाव येथे शेवाळे याच्या गट क्रमांक 91 मध्ये रात्री पोलिसांनी छापा टाकला, या छाप्यात 96 किलो 200 ग्राम असा 24 लाखांची अफूची झाडे जप्त केलीत

कर्नाळा बँकेत 520 कोटींचा घोटाळा झालेला आहे. 17 फेब्रुवारी 2020 रोजी गुन्हा दाखल झाला पण अद्यापही कुठलीही कारवाई झाली नाही असा आरोप करत आज भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वात विधिमंडळाच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत ठेवीदारांचे पैसे मिळणार नाहीत आणि सरकारकडून आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत विधिमंडळाच्या पायरीवर बसून ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार दोन्ही आमदारांनी व्यक्त केला
पोलिसांची खाकी वर्दी पुन्हा एकदा डागाळली आहे. गेल्या 15 दिवसापुर्वीच पारधी समाजाच्या एका महिलेचे अपहरण करून तिच्यावर पोलिसाने बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच उस्मानाबाद शहरातील हनुमान चौक येथील एका विवाहित महिलेला बंदुकीचा धाक दाखवत बलात्कार केल्याने त्या महिलेने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. बलात्काराच्या सलग दोन प्रकरणात उस्मानाबाद पोलिसांचे कृत्य समोर आल्याने खाकीला पुन्हा एकदा डाग लागला आहे. दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त करणे व बलात्कार केल्या प्रकरणी हरिभाऊ कोळेकर या पोलिसाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती, ताजमहाल परिसरात गोंधळ, पर्यटकांना बाहेर काढण्यात आलं
नांदेड:जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तपासणी करून त्याची माहिती जिल्हा रुग्णालयाला न देणाऱ्या पॅथालॉजी लॅबवर होणार कारवाई, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांची माहिती.
महसूलमंत्री थोरात यांच्या कन्येच्या नावाने बनावट फेसबुक खाते...
फेसबुकच्या माध्यमातून अनेकांकडून पैशाची मागणी...
जयश्री थोरात यांच्या नावे अज्ञात व्यक्तीकडून पैश्याची मागणी...
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिला तक्रार अर्ज...
औरंगाबाद : डॉक्टरची पॉझिटिव्ह महिला रुग्णाकडे शरीरसुखाची मागणी, महापालिकेच्या पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रातील घटना, रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात शिरून डॉक्टरला बेदम मारहाण
रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर जवळ अपघात, चालकाचा मृत्यू, अपघातात एकजण ठार दोघे गंभीर जखमी, पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रकचा अपघात, उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची मागून धडक, पुढच्या ट्रकचा चालक ठार तर मागील ट्रकमधील दोघे जखमी, जखमी रुग्णालयात दाखल, मध्यरात्रीची घटना.

पार्श्वभूमी

सरकारपेक्षा वेगळं मत असणं म्हणजे देशद्रोह नाही, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
सरकारच्या मतापेक्षा भिन्न विचार जाहीर करणं देशद्रोह नाही, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी कलम 370 बाबत केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने संबंधित टिप्पणी केली. जम्मू काश्मीरसाठीचं विशेष कलम 370 हटवल्यानंतर केलेलं वक्तव्य म्हणजे देशद्रोह आहे आणि त्यांच्याविरोधात कारवाई व्हायला हवी, असं याचिकेत म्हटलं होतं.


 


Sasikala Quits Politics: तामिळनाडूमधून मोठी बोतमी, निवडणुकीपूर्वी शशिकला यांची राजकारण सोडल्याची घोषणा
तामिळनाडू राज्यातून मोठी बोतमी आली आहे. तामिळनाडू निवडणुकीपूर्वी व्ही.के. शशिकला यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे. तामिळनाडूमध्ये सहा एप्रिलला विधानसभेच्या सर्व जागांवर मतदान होणार आहे. एमके स्टालिन यांचा पक्ष द्रमुक (DMK) सत्तेत येऊ नये याची काळजी घ्यावी असे त्यांनी आवाहन केलं आहे.


 


कोल्हापुरात कोर्टात सादर करताना पोलिसाच्या डोक्यात फरशी घालून पळ, आरोपींना पुन्हा बेड्या
पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात फरशी घालून फरार झालेल्या दोन आरोपींना पुन्हा बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीमध्ये हा प्रकार घडला. कोर्टात सादर करण्यासाठी नेलं असताना आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात फरशी घालून पळ काढला होता.


 


पवई येथील प्रकल्पात हिरानंदानींकडनं नियमभंग? देखरेख समितीला अहवाल सादर करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश
पवईमध्ये नियमांचे पालन न करता विकासक हिरानंदानी यांनी श्रीमंतांसाठी घरं बांधली असा आरोप करणाऱ्या याचिकेची बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. तेथील बांधकामांबाबत तपासणी करण्यासाठी देखरेख समितीची नेमणूक करत या समितीला दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. याप्रकरणी दाखल केलेल्या याचिका गेली अनेक वर्ष हायकोर्टात प्रलंबित आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.