Breaking News LIVE : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक : शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष शैला गोडसे यांचे बंडाचे निशाण, दाखल केली उमेदवारी
Breaking News LIVE Updates, 26 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पुण्यातील कॅम्प मधे फॅशन स्ट्रीट परिसरात आग लागली आहे. आग खूप मोठी आहे. अग्निशामक दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. काही पाण्याचे टॅंकर देखील पोहोचत आहे
बुलडाणा तालुक्यातील ग्राम हतेडी या गावामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत असुन एक-एक महीना नळाद्वारे पाणी पुरवठा होत असल्याने महिलांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. आज संतप्त शेकडो महिलांनी हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयवर रिकामे हंडे घेऊन मोर्च्या काढला व ग्रामपंचायतिच्या नियोजनशून्य कारभारा विरोधात संताप व्यक्त केला या संतप्त महिलानी ग्रामपंचायत कार्यालयला कुलुप ठोकले.मागील काही महिन्यापासुन हतेडी गावात पाणीटंचाई आहे. या गावामध्ये पाणी पुरवठासाठी जलस्वराज्य योजना व इतर काही उपाययोजना करण्यात आले होत्या परंतु अशा योजनेवर लाखो-करोडो रुपये खर्च करुण ही गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालेले आहे.
लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासन आता कडक अंमलबजावणी करतेय. आज लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी नवीन नियमावली जारी केली आहे. उद्यापासून चार एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू असतील. लातूर जिल्ह्यामध्ये तीन हजारपेक्षा जास्त सक्रीय रुग्ण आहेत. मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्याही तीनशेच्या पुढे रोज येत आहे. यामुळे भविष्यातील धोका ओळखून आता उपाययोजना करायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, चित्रपटगृह, स्विमिंग पूल, पान सेंटर, मंगल कार्यालय, सभागृह बंद ठेवण्यात येणार आहेत. हॉटेल, बियर बार या ठिकाणी फक्त पार्सल सुविधा उपलब्ध असणार आहे. ऑटो रिक्षामध्ये चालक आणि दोन प्रवासी यांनाच परवानगी असणार आहे. बसमध्ये नो मास नो एन्ट्री याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सीटिंग अरेंजमेंटही व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बंडाचे निशाण फडकावीत आज बैलगाडीतून वाजत गाजत येत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शैला गोडसे हे गेल्या निवडणुकीपासून उमेदवारी मागत होत्या मात्र गेल्यावेळीही त्यांना उमेदवारी नाकारल्याने यंदा त्यांनी बंडाचा झेंडा फडकावीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शैला गोडसे या सोलापूर जिल्हा परिषद सदस्य असून वाड्यावस्त्यांपर्यंत त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. जनतेसाठी वारंवार आंदोलने करणाऱ्या शैला गोडसे या महिला वर्गात विशेष लोकप्रिय असून जनतेच्या रेट्यामुळेच आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून आपण काम करीत असून गेल्यावेळी उमेदवारी डावलल्यावरही आपण पक्षादेश मनाला होता. यंदा देखील शिवसेना पक्ष प्रमुख तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष या दोघांचीही भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जनता आणि कार्यकर्ते यांचा आग्रह असल्याने आपण अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला.
आज लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी नवीन नियमावली जारी केली आहे. उद्या पासून चार एप्रिल पर्यंत हे निर्बंध लागू असतील. लातूर जिल्ह्यामध्ये तीन हजारपेक्षा जास्त एक्टिव रुग्ण आहेत मागील काही दिवसात करोना रुग्णांची संख्याही तीनशेच्या पुढे तो रोज येते यामुळे भविष्यातील धोका ओळखून आता उपाययोजना करायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, चित्रपटगृह, स्विमिंग पूल,पान सेंटर ,मंगल कार्यालय, सभागृह बंद ठेवण्यात येणार आहेत. हॉटेल, बियर बार या ठिकाणी फक्त पार्सल सुविधा उपलब्ध असणार आहे. ऑटो रिक्षा मध्ये चालक आणि दोन प्रवासी यांनाच परवानगी असणार आहे. बस मध्ये नो मास नो एन्ट्री याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सीटिंग अरेंजमेंट ही व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
कोरोनामुळे 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
भिवंडीत नियंत्रणात आलेला करोना पुन्हा वाढू लागल्याने महापालिकेने कठोर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. शहरातील पद्मानगर परिसरातील अखिल पद्मशाली समाज हॉल मध्ये कोरोना नियमांची पायमल्ली होत असल्याने महापालिकेने धडक कारवाई करत हा हॉल सील केला आहे .
पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी भाजप सोबत जाण्यासाठी अपक्ष आमदारांना कोट्यवधी रुपयांची ऑफर केल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय..ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते...अपक्ष आमदारांच्या मागे शुक्ला यांनी अनेक पोलीस अधिकाऱ्यांना लावलं होतं...त्यामुळं आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करणं गरजेचं आहे...त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागायला पाहिजे अशी मागणी मुश्रीफ यांनी केलीय...फडणवीस यांनी जो सत्तेत येण्यासाठी जो थयथयाट सुरु केला आहे तो थांबवावा...त्यांचे स्वप्न कधीच पुर्ण होणार नाही...मनसुख हिरण हत्या प्रकरण तपास भरकटला जावा यासाठी हे सर्व केलं असल्याचा आरोप देखील मुश्रीफ यांनी केला...हिरन हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे असता तर दोन दिवसांत तपास पूर्ण केला असता असं देखील मुश्रीफ म्हणालेत....
रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदारांवर दबाव टाकल्याचं समोर आलंय...भाजप वारंवार सत्तेत येण्याचा दावा का करत होते हे आता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलं आहे...शासकीय यंत्रणा हाताला धरुन सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न होता, अशी टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलीय...ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते... भाजपनं महाविकास आघाडीत बिघाडी आणण्याचा प्रयत्न केला...अहवाल बाहेर जातोच कसा? आणि फडणवीस तो अहवात दाखवतात कसे? हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं खूप घातक असल्याचं सतेज पाटील म्हणालेत...राज्यातील अधिकारी अशा पद्धतीनं वागण्याचं कारण म्हणजे केंद्रातील सत्ता...केंद्रातील दबावालाच राज्यातील अधिकारी बळी पडत असल्याचं देखील सतेज पाटील यांनी यावेळी बोलून दाखवलं...
रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदारांवर दबाव टाकल्याचं समोर आलंय...भाजप वारंवार सत्तेत येण्याचा दावा का करत होते हे आता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलं आहे...शासकीय यंत्रणा हाताला धरुन सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न होता, अशी टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलीय...ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते... भाजपनं महाविकास आघाडीत बिघाडी आणण्याचा प्रयत्न केला...अहवाल बाहेर जातोच कसा? आणि फडणवीस तो अहवात दाखवतात कसे? हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं खूप घातक असल्याचं सतेज पाटील म्हणालेत...राज्यातील अधिकारी अशा पद्धतीनं वागण्याचं कारण म्हणजे केंद्रातील सत्ता...केंद्रातील दबावालाच राज्यातील अधिकारी बळी पडत असल्याचं देखील सतेज पाटील यांनी यावेळी बोलून दाखवलं...
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर, सतीश जारकीहोळी बेळगावमधून काँग्रेसचे उमेदवार
सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात घटनात्मक पीठासमोर सुरू असलेले युक्तीवाद पूर्ण,
सलग दहा दिवस देशाच्या सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरून सुरु होते युक्तिवाद,
102 व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यांना आरक्षणाचे अधिकार आहेत की नाहीत..50 टक्के आरक्षणाच्या मर्यादे बाबत इंद्रासह आणि निकालाचे पुनर्विलोकन आवश्यक आहे की नाही.. याबाबत सुरू होते युक्तिवाद,
घटनात्मक पीठाने निकालाची तारीख राखून ठेवली आहे,
महाराष्ट्राच्या दृष्टीने सर्वात संवेदनशील प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण आता लक्ष निकालाकडे..
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या दोषी अधिकाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची कुटुंबाची आणि वनपाल-वनरक्षक संघटनेची माहिती.मृतदेह पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाणार असल्याची माहिती आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या हरीसाल येथील महिला अधिकारीने गोळी झाडून आत्महत्या केली. काल सायंकाळी 7 वाजता सरकारी बंगल्यात आपल्या बंदुकीच्या गोळ्या झाडून आत्महत्या केली होती.
सनराईज रुग्णालयच्या म्हणण्यानुसार, जे दोन रुग्ण दगावले ते आगीमुळे दगावले नाही. त्यांचा मृत्यू आगीमुळे झालेला नाही, आधीच कोव्हिड उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या फॉर्मलिटीज काम बाकी होते त्यामुळे शव रुग्णालयात होते. आग लागली तेंव्हा आलर्म वाजल्यानंतर ताबडतोब सर्व लाइट्स कनेक्शन बंद केले आणि रुग्णांना बाहेर काढले. 76 च्या आसपास रुग्ण आतमध्ये होते, त्यात दोन जणांचा आधीच मृत्यू झला होता. आता त्यांना जवळच्या मुलुंड जम्बो कोव्हीड सेंटर आणि फॉरटीस रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
आजपासून विठ्ठल मंदिर केवळ 12 तास भाविकांसाठी खुले राहणार आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत मंदिरात भाविकांना दर्शन मिळेल . कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने आजपासून अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासनाने लागू केल्या आहेत . यात शनिवार , रविवार सर्व दुकाने बंद राहणार आहेत
महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्ण संख्या वाढत आहे.यामुळे कर्नाटकातील एकसंबा आणि महाराष्ट्रातील दानवाड या गावांना जोडणाऱ्या पुलावर काटेरी झाडांच्या मोठ्या फांद्या टाकून रस्ता वाहतुकीसाठी स्थानिकांनी बंद केला आहे. रस्ता बंद करण्या संबंधी कोणताही आदेश नसताना रस्ता बंद करण्यात आला आहे.यामुळे कामानिमित्त आणि नोकरीसाठी ये जा करणाऱ्या जनतेची गैरसोय झाली आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
सोलापुरात एकाच दिवसात पाचशेहून अधिक रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याचं दिसून आलंय. सोलापूर शहरात 217 तर ग्रामीण भागात 299 असे एकूण 516 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत तर शहरात दोन आणि ग्रामीण भागात दोन अशा चौघांचा मृत्यू झाला आहे.
भांडुप पश्चिम, ड्रीम मॉल येथे मोठी आग लागल्याने भांडुप सोनापूर ते गांधी नगर जंक्शन (कंजूरमार्ग) पर्यंत लाल बहाद्दूर शास्त्री मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.सर्व गाड्या पूर्व द्रुतगती मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलंय. गुरुवारी दिवसभरात रायगड जिल्ह्यात कोरोनाचे 521 नवे रुग्ण आढळले आहेत. पनवेल महापालिका हद्दीत 358 नवीन रुग्ण, खालापूर येथे 20, कर्जत येथे 12, पेण येथे 17, अलिबाग येथे 18 रुग्ण आढळले.
भांडुप येथील ड्रीम मॉल मध्ये रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली आहे. या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय असून या रुग्णालयातील दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पार्श्वभूमी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -