Breaking News LIVE : महाबळेश्वर सातारा रोड येथे मालवाहू एसटी बस दरीत कोसळली

Breaking News LIVE Updates, 8 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Mar 2021 07:34 AM
महाबळेश्वर सातारा रोड येथे मालवाहू एसटी बस दरीत कोसळली

काळाकडा येथून मालवाहतूक एसटी बस गेली दरीत. गाडी मध्ये फक्त चालक आणि वाहक होते उपस्थित. सुमारे  आठशे फूट खोलल दरीत कोसळली बस. ग्रामस्थ आणि ट्रेकर्स यांच्या मदतीतून दोघांनाही सुखरुप काढण्यात यश. दोघेही गंभीररित्या जखमी. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची प्रक्रिया सुरू. एसटी बस दरीत गेल्याच्या माहिती ने सर्वच यंत्रणांची उडाली झोप.

लातूर एमआयडीसी हॉस्टेल मध्ये पुन्हा करोनाचा शिरकाव 44 विद्यार्थ्यना लागण, जिल्ह्यात 77रुगणाची नोंद

लातूर जिल्ह्यात झपाट्याने करोना संसर्ग होताना दिसत आहे 22 फेब्रुवारी रोजी शहरातील एमआयडीसी भागातील एका शाळेच्या निवासी वसतिगृहातील 45 विद्यार्थ्यना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. आज त्याच हॉस्टेल मधील 44 विद्यार्थी करोनाग्रस्त झाल्याचे समोर आले आहे ..या सर्व विद्यार्थ्यना मनपाच्या कोविड केयर सेंटर मध्ये हलविण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर औषध उपचार सुरू आहेत

महाशिवरात्री निमित्त मंदिरामध्ये होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता सोलापुरातील प्रमुख मंदिर बंद

महाशिवरात्री निमित्त मंदिरामध्ये होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता शहरातील प्रमुख मंदिर सर्वसामान्य नागरिकांसाठी राहणार बंद. शहरातील सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, रेवनसिद्धेश्वर मंदिर, होटगी महाराज मठ सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद. या मंदिरात केवळ पुजारी आणि व्यवस्थापकांनाच राहणार प्रवेश. तर शहरातील इतर सर्व मंदिरात देखील गाभाऱ्यात प्रवेश न करता बाहेरून दर्शन घेण्यासाठी परवानगी. मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांचे आदेश

औरंगाबादमध्ये आजही नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

औरंगाबाद जिल्ह्यातआज एकूण 532 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली  तर 7 कोरोना बधितांचा मृत्यू झाला . आज 231 जणांना (मनपा 188, ग्रामीण 43) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 49613 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 54439 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1311 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3515 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लातूर जिल्ह्यात ७७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले

लातूर जिल्ह्यात 1190 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 25 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 30 अहवाल प्रलंबित आहेत. 1335 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 47 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26104 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 749 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 714 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 24641 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 84 आहे.

राज्यात आज 13 हजार 659 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यात आज 13 हजार 659 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर दिवसभरात 54 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, मुंबईत 24 तासात 1 हजार 539 नव्या रुग्णांची वाढ 

पुण्यात कोरोनाचा धोका वाढला

पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 2515 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद.. तर 11 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू... पुणे मध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसतेय. 

जालना शहरातील नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व हॉटेल खानावळ बार रेस्टॉरंट पूर्णपणे बंद करण्याचे आदेश

जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालयात लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमासाठी 20 पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती नसावी. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तू व औषधालय वगळता सर्व दुकाने संध्याकाळी सात वाजल्यानंतर बंद ठेवण्याचे आदेश . जिल्ह्यातील सर्व व्यायाम शाळा आणि जिम पूर्णत बंद राहतील याशिवाय सर्व सांस्कृतिक राजकीय आणि धार्मिक रॅली मिरवू नका आंदोलन मोर्चे यावर बंदी असणार आहे

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर परदेशातून सायबर हल्ला

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर परदेशातून सायबर हल्ला झाला आहे. अज्ञाताने 27 सर्व्हर आणि डाटाइनस्क्रिप्ट करुन पाच कोटींचे नुकसान केलं आहे. हा डेटा परत हवा असेल तर पैशांची मागणी करण्यात आली आहे. ती रक्कम बिटकॉईन स्वरुपात देण्याची अटही घालण्यात आली आहे. महापालिकेने डेटाचे मॅनेजमेंट करण्यासाठी तीन खाजगी कंपन्यांना काम दिलेलं आहे, त्याचं काम अंतिम टप्प्यात असतानाच परदेशातून हा हल्ला झाला. प्राथमिक अंदाज पाच कोटींचा असला तर यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच अनुषंगाने निगडी पोलीस तपास करत आहेत. 

धुळ्यातील भाजपचे माजी आमदार धरमचंद चोरडिया यांचं निधन

धुळे जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी आमदार आणि भाजपाचे माजी प्रदेश संघटनमंत्री धरमचंद चोरडिया यांचं आज निधन झालं. वयाच्या 71 वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातच आज संध्याकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. माजी आमदार धरमचंद चोरडिया हे 1977 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. 1978-81 या काळात ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस होते. 1982 साली ते युवा मोर्चाचे राष्ट्रीय चिटणीस झाले. त्याकाळात त्यांनी राष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामाची दखल घेत त्यांना भाजपात प्रदेश चिटणीसपद मिळाले. त्यानंतर ते प्रदेश संघटनमंत्री होते.

लोकांना वेडं बनवण्याचं काम बंद करा, औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव पाठवण्याच्या निर्णयावर इम्तियाज जलील यांची टीका

मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवणार असल्याची माहिती विधानसभेत दिली. त्यावर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी सडकून टीका केली आहे. लोकांना वेडं बनवण्याचं काम आता तरी बंद करा, असं ते म्हणाले. 2014 ते 2019 पर्यंत भाजपसोबत सत्तेत असताना यांनी का नाव नाही बदलले ते सांगावे असं जलिल म्हणाले. खासकरुन आघाडी सरकारचा अजेंडा सेक्युलर आहे, मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला हे मान्य आहे का असा सवाल त्यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री या मुद्द्यावर बोलत असताना या पक्षांना किमान लाज वाटायला हवी होती, असंही जलील म्हणाले. लोकांना फसवू नका, विकासाची कामं करा, असा सल्ला जलील यांनी राज्य सरकारला दिला.

धुळ्याला धोक्याची घंटा; होणार मिनी लॉकडाऊन, केंद्रीय आरोग्‍य समितीचा सल्ला

 कोरोना विषाणू संसर्गप्रश्‍नी धुळे शहरासह जिल्हा स्फोटक वळणावर असुन स्थिती नियंत्रणासाठी कंटेनमेंट झोनसह व्याप्ती वाढणे, मिनी लॉकडाऊन करणे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसह नमुने तपासणीची संख्या वाढावावी, असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या चार सदस्यीय पथकाने येथील यंत्रणेला दिला आहे सर्वसमावेशक बैठकीत पथकाने महापालिकेच्या अधिकाऱयांची कानउघाडणीही केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

सचिन वाझे हे उत्तम तपास अधिकारी : संजय राऊत

सचिन वाझे हे उत्तम तपास अधिकारी आहेत असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून पाठराखण करण्यात आली आहे. केवळ राजीनामा आणि बदल्या यामध्ये विरोधी पक्षाने रमू नये, त्याच्या पलीकडे खूप काम असतं विरोधी पक्षाचं. स्कॉर्पिओ गाडीचं प्रकरण काही फार मोठं नाही. जेवढी किंमत अंबानी यांच्या जीवाची तेवढीच सर्वसामान्य माणसाचीही आहे, असं संजय राऊत म्हणाले. तसंच आंदोलक शेतकऱ्यांच्या जीवाची किंमत आणि मुकेश अंबानींची वेगळी आहे का? असा सवालही त्यांनी विचारला. दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा येण्यासाठी शुभेच्छा आहेत असंही संजय राऊत म्हणाले. सुधीर मुनगंटीवार तीन महिन्यात जे म्हणत आहेत ते बहुदा 2024 नंतरचे तीन महिने असतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक आणि सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानीला अटक

पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक आणि सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानीला अटक करण्यात आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची जवळीक आहे. मूलचंदानीवर तब्बल 238 कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका आहे. संबंधित बँकेत 24 कोटींची अपहार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेली आहे. मात्र आत्तापर्यंत दाखल 238 कोटींची चौकशी आता होणार आहे. याआधी बँकेच्या दोघांना अटक करण्यात आलेली होती. तर मूलचंदानीना गेल्या आठवड्यात ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र तब्येत बरी नसल्याचं कारण देत रुग्णालयात दाखल होते. तब्येत बरी होताच पोलिसांनी अटक केलेली आहे.

शुक्रवारपासून बेपत्ता असलेली 'मास्टर ऑफ किंगस्' बोट मंगळवारी दुपारी सापडली. 

उरण येथील शुक्रवारपासून बेपत्ता असलेली 'मास्टर ऑफ किंगस्'  मच्छिमार बोट आणि 16 खलाशी पाच दिवसांनी सापडले. मुंबई ते सातपाटी दरम्यान इंजिन बंद पडल्याने बोटीचा संपर्क तुटला होता. एमआरपीसी आणि मत्स्य विभागामार्फत घेतलेल्या शोधानंतर ही बोट सापडली आहे. मच्छीमार बोटीवरील सगळे खलाशी सुखरूप आहेत. 

कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यास क्लासचालकांचा विरोध

कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यास क्लासचालकांचा विरोध , जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आजपासून जिल्ह्यातील जवळपास 2 हजार क्लासेस पुढील आदेश येईपर्यंत राहणार बंद,आजपर्यंत कोचिंग क्लासेसमुळे कोणालाच लागण झालेली नाही , तसेच या निर्णयामुळे क्लासचालकांसह कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने क्लास सुरु ठेवण्याची मागणी ,  मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन

गृहमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग माडण्यात यावा, देवेंद्र फडणवीसांची मागणी

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग मांडण्यात यावा अशी सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

सचिन वाझे असो वा कुणीही, शासन कुणाला पाठीशी घालणार नाही: गृहमंत्री अनिल देशमुख

सचिन वाझे असो वा कुणीही, शासन कुणाला पाठीशी घालणार नाही. विरोधकांनी त्यांच्याकडील पुरावे एटीएसला द्यावेत, तसेच सचिन वाझे यांची बदली करण्यात येत असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी विधानपरिषदेत सांगितलं आहे

नाशिक जिल्हा रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडून कर्मचाऱ्याला मारहाण

नाशिक जिल्हा रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी आलेल्या अशोककुमार भाटिया या वयोवृद्ध व्यक्तीने लसीकरण केंद्रात गोंधळ घालत कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडलाय. त्यामुळे एक कर्मचाऱ्याच्या हाताला दुखापत झाली आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन करूनही आजचे टार्गेट पूर्ण झाले आहे उद्या या असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येताच तसेच मोबाईलवर शूटिंग करू देण्यास नकार देताच याचा राग आल्याने संबंधित व्यक्तीने कर्मचाऱ्यास मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. अशोककुमार भाटिया यांच्याविरोधात सरकरवाडा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विशेष पोलिस महानिरीक्षक गुन्हे यांच्या कार्यालयातील चार युपीएस चोरीला

पाषाण रस्त्यावरील राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) येथील विशेष पोलिस महानिरीक्षक गुन्हे यांच्या कार्यालयातील चार युपीएस चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही चोरी सीआयडीमध्ये काम करणाऱ्या कामगारानेच चोरल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्या कामगाराला अटक करण्यात आली आहे...

अहमदनगरमध्ये वाळू तस्करांनवर कारवाई, प्रशासनाकडून 25 बोटी उद्ध्वस्त

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात अवैध वाळु उपसा करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील माठ, वडगाव शिंदोडी आणि म्हस या गावांमध्ये अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली. या माहितीच्या आधारे तहसीलदार प्रदीपकुमार पवार आणि बेलवंडी पोलिस स्टेशन यांनी संयुक्तपणे जाऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केलीये. वाळू उपसा करणाऱ्या 25 यांत्रिक बोटी जिलेटिनच्या साहाय्याने स्फोट घडवून नष्ट केल्या आहेत. यात वाळू तस्करांचे 1 कोटी पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. मात्र वाळू उपसा करणाऱ्या आरोपीनी पाण्यात उद्या मारून पलायन केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून नाशिकमध्ये कठोर निर्बंध लागू

नाशिक : आजपासून नाशिकमध्ये कठोर निर्बंध लागू,  मात्र अंशतः लॉकडाऊनचे आदेश फक्त नावालाच, नाशिक मुख्य बाजार समितीमध्ये तूफान गर्दी, वाहतूक कोंडीही बघायला मिळते आहे,  सोशल डिस्टन्सिंगचाही फज्ज़ा, अनेक भाजीविक्रेते, ग्राहकांच्या चेहऱ्यावर मास्कही नाही , बाजार समितीचीही फक्त बघ्याची भूमिका, कुठल्याही उपाययोजना नाहीत, गेल्या वर्षी बाजार समितीच ठरल्या होत्या हॉटस्पॉट, प्रशासन कारवाई करणार का ? याकडे लक्ष

बुलडाणा :  सोनाळा पोलिसांच्या वाहनाला मध्यरात्री शेगाव - संग्रामपूर मार्गावर अपघात

बुलडाणा :  सोनाळा पोलिसांच्या वाहनाला मध्यरात्री शेगाव - संग्रामपूर मार्गावर अपघात.


दुचाकी अपघातातील जखमी व्यक्तीला शासकीय रुग्णालयात घेऊन जाताना अपघात.


एका पोलिस कर्मचाऱ्यांसह दोन जन जखमी झाल्याची माहिती.


जखमीवर शेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु.

वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह  16 संचालकाविरोधात गुन्हा दाखल

वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह  16 संचालकाविरोधात गुन्हा दाखल, जीएसटीचे 12 कोटी बुडवल्याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, वसंतदादा साखर कारखान्यातील विक्री केलेल्या मालावर व्यापाऱ्याकडून जीएसटी घेऊन 12 कोटी 44 लाखाची रक्कम राज्य जीएसटी कार्यालयात भरण्यात आलेली नसल्याने गुन्हा

Breaking News LIVE : औरंगाबादमध्ये मास्क न वापरल्यास आता पोलीसही करणार कारवाई

औरंगाबाद : मास्क न वापरल्यास आता पोलीसही करणार कारवाई. शहरात येणाऱ्या सीमांवरच मास्क तपासणार. पोलिसांनी वसूल केलेली दंडात्मक रक्कमेतील पन्नास टक्के रक्कम पोलिसी कल्याण निधीसाठी तर 50 टक्के रक्कम महापालिकेकडे द्यावी लागणार  

पार्श्वभूमी

GST: राज्यांना जीएसटी भरपाईचा 19 वा हप्ता केंद्र सरकारकडून जारी; कोणत्या राज्याला किती मदत?


नवी दिल्ली : कोरोना काळात देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यादरम्यान केंद्र आणि राज्यांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटलं होतं. मार्च ते सप्टेंबर दरम्यान केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा जीएसटीचा आलेख खूप खाली आला होता. त्याचा फटका राज्यांच्या उत्पन्नावर झाला होता. चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जीएसटी संकलनातील घसरणीची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकारने दोन पर्याय राज्यांसमोर ठेवले. सर्व राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांनी केंद्र सरकारचा पहिला पर्याय निवडला. याअंतर्गत केंद्र सरकार राज्यांच्या वतीने कर्ज घेऊन जीएसटी भरपाई करते. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या जीएसटी महसूलाची तूट भरुन काढण्यासाठी 2,104 कोटी रुपयांचा 19 वा साप्ताहिक हप्ता राज्यांना जारी केला. या एकूण रकमेपैकी 2,103.95 कोटी रुपये 7  राज्यांना आणि 0.05 कोटी रुपये पुद्दुचेरी या केंद्र शासित प्रदेशाला देण्यात आले.


India Legends vs England Legends : सामना हरलो पण मनं जिंकली, इरफान, गोनीची धडाकेबाजी खेळी


India Legends vs England Legends 9th Match : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये स्पर्धेत एकाहून एक थरारक सामन्यांना अनुभव प्रेक्षकांना मिळत आहे. काल इंग्लंड लिजेंड विरुद्ध इंडिया लिजेंड सामन्यात देखील असाच थरार पाहायला मिळाला.  इंग्लंड लिजेंड्स संघाने केविन पीटरसनच्या वादळी खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 7 बाद 188 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंडिया लिजेंड्सचा निम्मा संघ धावफलकावर 56 धावा असताना तंबूत परतला होता. मात्र इरफान पठाण आणि मनप्रित गोनीनं टी-20 चा थराराची अनुभूती करुन दिली. इरफान पठाण आणि मनप्रित गोनीनं  अखेरच्या 26 चेंडूत 63 धावा कुटल्या. विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग परतल्यानंतर युसूफ आणि इरफान बंधुंनी मैदानात तग धरुन डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 43 धावांची भागीदारी करुन मॅचमध्ये असल्याचे संकेत दिले. पण युसूफ बाद झाल्यानंतर पुन्हा सामना इंग्लंडच्या बाजूने वळला. नमन ओझा 12 धावा करुन परतल्यानंतर तळाचा फलंदाज मनप्रितनं प्रेक्षकांची मनं जिंकली.


API सचिन वाझेंची महाराष्ट्र एटीएसकडून पुन्हा होऊ शकते चौकशी 
मुंबई :  मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव विरोधकांनी विधानसभेत उपस्थित केलं. तसंच त्यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा संशयही विरोधकांनी व्यक्त केला. परंतु सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालत आहे. वाझेंना तात्काळ अटक व्हायला हवी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. काही दिवसांपूर्वी मनसुख यांचा मृतदेह कळवा खाडीत मिळून आला. त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या स्टेटमेंटनुसार एटीएसनं अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचे पुरावे नष्ट केल्याप्रकरणाचाही गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार  सचिन वाझे यांना सोमवारी दुपारी एटीएस  कार्यालयात बोलावलं होतं. तिथं त्यांना  20 जिलेटिनसह मिळालेल्या स्कॉर्पियो प्रकरणाविषयी प्रश्न केले गेले. या प्रकरणात वाझे तपास अधिकारी होते.  मनसुख हिरेन यांच्या पत्नीने आपल्या स्टेटमेंटमध्ये एपीआय सचिन वाझे यांचं नाव घेतलं आहे. त्यामुळं महाराष्ट्र एटीएसचे अधिकारी त्यांनी चौकशी करु शकतात.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.