Breaking News LIVE : इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण : अभिनेत्री हिना पांचाळसह 25 जणांच्या पोलीस कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ

Breaking News LIVE Updates, 29 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोनासह इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Jun 2021 07:26 PM
पिंपरी-चिंचवड शहरात आता पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार

पिंपरी-चिंचवड शहरात आता पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार. एक जुलैपासून शहरात पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी सुरू होणार. 13 प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलांखाली अशी एकूण 450 पे ऍण्ड पार्कची ठिकाणे निवडण्यात आलेली आहेत. नो पार्किंगमध्ये वाहन पार्क केल्यास वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आता पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार

पिंपरी-चिंचवड शहरात आता पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार. एक जुलैपासून शहरात पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी सुरू होणार. 13 प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलांखाली अशी एकूण 450 पे ऍण्ड पार्कची ठिकाणे निवडण्यात आलेली आहेत. नो पार्किंगमध्ये वाहन पार्क केल्यास वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

कल्याण-डोंबिवलीतील कोरोना लसीकरण उद्या बंद राहणार

 


कल्याण-डोंबिवली महापालिकेचे 25 ठिकाणी लसीकरण केंद्र काल सुरु होते. काल एका दिवसात 12,780 नागरिकांचे लसीकरण झाले असून कालपर्यंत कल्याण डोंबिवली क्षेत्रात 3 लाख 48 हजार नागरिकांचं लसीकरण झालं आहे. काल सायंकाळी शासनाकडून लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने आज कल्याण-डोंबिवलीमधील सर्व 25 लसीकरण केंद्र बंद होती. आज पण लसींचा साठा प्राप्त न झाल्याने उद्या 30 जून रोजी बंद राहणार आहे.

चंद्रपूर : रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचा धक्का लागून 14 वर्षीय

चंद्रपूर : रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचा धक्का लागून 14 वर्षीय मुलीचा मृत्यू, चंद्रपूर शहरातील बाबूपेठ रेल्वे स्टेशनवरील घटना, आचल आत्राम असे मृत युवतीचे नाव, प्राथमिक माहितीनुसार मृतक आचल आत्राम ही युवती रेल्वे वॅगनमधून कोळसा काढण्यासाठी रेल्वे वॅगनवर चढली आणि त्यातच ओव्हरहेड वायरचा शॉक लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज 

इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण : अभिनेत्री हिना पांचाळसह 25 जणांच्या पोलीस कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ.

इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण : अभिनेत्री हिना पांचाळसह 25 जणांच्या पोलीस कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ. सोमवारी 1 दिवस पोलीस कोठडी सुनवल्यानंतर आज कोर्टात हजर केलं होतं. यात 1 इराणी कोरिओग्राफर महिला आणि 4 साऊथ सिनेमात काम केलेल्या अभिनेत्रींची समावेश आहे. कोरोना नियम उल्लंघन, मद्य सेवन, तंबाखूजन्य पदार्थ यांचं सेवन करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. रेव्ह पार्टीत ड्रग वापर करणाऱ्यांसोबत यांच्या कनेक्शनचा तपास करायचा ही मागणी करण्यात आली होती. सरकारी वकिलांची मागणी कोर्टानं मान्य केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे पोलिसांचे आदेश.

संसदेचं पावसाळी अधिवेशन 19 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होण्याची शक्यता

संसदेचं पावसाळी अधिवेशन 19 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होण्याची शक्यता. संसदीय कामकाजासंदर्भात कॅबिनेट कमिटीची राष्ट्रपतींकडे शिफारस. कामकाजाचे 20 दिवस समाविष्ट असण्याची शक्यता.

लवकरच मुख्यमंत्री, शरद पवार एकत्र बसून मोठा निर्णय घेण्याची शक्यता : शिवसेना खासदार संजय राऊत

प्रताप सरनाईक आणि अनिल देशमुखांची बाजू समजून घेणं गरजेचं, बाजू समजून घेण्यापूर्वी ईडीकडून कोंडी करणं चुकीचं; लवकरच मुख्यमंत्री, शरद पवार एकत्र बसून मोठा निर्णय घेण्याची शक्यता : शिवसेना खासदार संजय राऊत

महाविकास आघाडीत कुणीही नाराज नाही : शिवसेना खासदार संजय राऊत

महाविकास आघाडीत कुणीही नाराज नाही, एखाद्या विषयात मतभेद असू शकतात, मात्र नाराजी अजिबात नाही; दोन वर्षात तिन्ही पक्षांनी उत्तम काम केलं : शिवसेना खासदार संजय राऊत

सर्व राज्यांनी 31 जुलैपर्यंत 'वन नेशन, वन राशन' योजना लागू करावी; प्रवासी मजुरांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनेची अमलबजावणी करण्याचा आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं यासाठी 31 जुलैपर्यंतची वेळ दिली आहे. दरम्यान केंद्र सरकारला निर्वासित मजुरांची नोंदणी करण्यासाठी एक पोर्टल सुरु करण्यास सांगण्यात आलं आहे. या योजनेमुळे निर्वासित मजुरांना ज्या राज्यांमध्ये काम करत आहेत, त्या राज्यांमध्ये नोंदणी नसतानाही रेशन मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.


आतापर्यंत 17 राज्यांमध्ये लागू आहे 'वन नेशन, वन राशन' योजना :


1. आंध् प्रदेश
2. गोवा
3. गुजरात
4. हरियाणा
5. हिमाचल प्रदेश
6. कर्नाटक
7. केरल
8. मध्य प्रदेश
9. मणिपूर
10. ओडिशा
11. पंजाबी
12. राजस्थान
13. तमिलनाडू
14. तेलंगाणा
15. त्रिपुरा
16. उत्तराखंड
17. उत्तर प्रदेश

चक्क तिलारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात रेडा बांधून शेतकर्‍यांचे अनोखे आंदोलन

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील दोडामार्गमध्ये 21 जूनला ऐन शेतीच्या हंगामात आवाडे येथील रमेश नाईक या शेतकऱ्याचा "मुरा जातीचा रेडा" तिराळी नदीत वाहून जाऊन मयत झाला, तर दुसरा रेडा जखमी झाला. तिराळी नदीला सोडलेल्या तेरवण मेढे बंधाऱ्याच्या पाण्यामुळे ही घटना घडली. मात्र संबंधित तिराळी प्रकल्प विभागाने या घटनेची कोणतीही दखल घेतली नाही किंवा नुकसान भरपाईही दिली नाही. त्यामुळे एन शेतीच्या हंगामात रेडा मृत्यु झाल्याने नाईक यांचे मोठे नुकसान झाले. तिलारी जलसंपदा विभागाच्या गलथान कारभारामुळे आवडे येथील शेतकरी रमेश नाईक यांचा एक रेडा वाहून जाऊन मृत्युमुखी पडला होता. त्याची नुकसान भरपाई तिलारी पाटबंधारे विभागाने लवकर द्यावी यासाठी तिलारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर रेडा बांधून ठिय्या आंदोलन करण्यात आले. तिलारी नदिच्या पाण्यात रेडा वाहून गेलेल्या 'त्या' शेतकऱ्याचे व ग्रामस्थांचे तिलारी पाटबंधारे विभागाच्या तिलारी येथिल कार्यालयात रेडा बांधूून आंदोलन सुरु आहे.

संजय राऊत यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या भेटींची राजकीय वर्तुळात चर्चा

संजय राऊत यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या भेटींची राजकीय वर्तुळात चर्चा. पुन्हा वाढवलेले निर्बंध अन् कॅन्सरग्रस्तांची घरं यावरुन शरद पवारांची नाराजी?



 



 

रुटीन चेकअपसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल

नियमित तपासणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याची ईडीची नोटीस

#BreakingNews LIVE : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याची ईडीखकडून नोटीस देण्यात आली आहे. शनिवारी अनिल देशमुख यांना ईडीकडून नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांनी चौकशीसाठी वेळ वाढवून मागितली होती. त्यामुळे ईडीनं त्यांना आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

 

 



 



 

रत्नागिरीत तीन बालकांची कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटवर मात, जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

रत्नागिरी जिल्ह्यात नऊ डेल्टा प्लस रुग्णांपैकी तीन बालकांना डेल्टा प्लसची लागण झाली होती. पण, या बालकांनी डेल्टा प्लसवर मात केली असून त्यांना घरी देखील सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे. दरम्यान, एप्रिल ते मे या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास तीन हजार बालकांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये केवळ एका मुलीचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि त्यावेळी बालकांना संभाव्य धोका लक्षात घेता आता आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत. 

नांदेडमध्ये कार्यक्रम उद्घाटनावरून खासदार,आमदार कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

नांदेड : कंधार येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमात मेहुण्या मेहुण्यांच्या कार्यकर्त्यांत तुफान राडा झालाय. यात उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमास खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना निमंत्रण नसल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी शेकपा आमदार श्यामसुंदर शिंदे यांना जाब विचारत राडा घातलाय.या प्रसंगी प्रोटोकॉल नुसार खासदारांना कार्यक्रमास का बोलविण्यात आले नाही आणि सदर समारंभ खासगी आहे का? असे म्हणत खासदार आणि आमदार समर्थक आपापसात भिडल्यामुळे उपस्थितांची मात्र तारांबळ उडालीय. दाजी आणि मेहुण्यांच्या या भांडणात प्रशासनातील अधिकाऱ्यांची मात्र गोची झालीय. कंधार विधानसभा मतदारसंघात खासदारांचे दाजी आमदार श्यामसुंदर शिंदे हे मेहुणे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पारंपारिक मतदारसंघात निवडून आलेत तेंव्हा पासून आमदार दाजी मेहुणे कार्यकर्त्यात राडे होऊन चर्चा होणे हे आता नित्याचेच झालेय. त्यामुळे मतदार संघाच्या प्रगतीची चर्चा होवो की न होवो यांच्या रड्यांची चर्चा मात्र नित्याचीच झालीय. शासकीय कार्यक्रमात झालेल्या या राड्यावरून परस्परविरोधी तक्रारी नुसार कंधार पोलिसात कलम 143,147,149,152,353,कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुणे महापालिकेच्या विविध प्रश्नांसाठी अजित पवारांनी मंत्रालयात बैठक बोलावली, महापौरांना मात्र निमंत्रण नाही
पुणे महापालिकेच्या विविध प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्याच्या मंत्रिमंडळातील आठ मंत्री, वेगवेगळ्या पाच खात्यांचे सचिव आणि पुणे महापालिकेचे आयुक्त उपस्थित असणार आहेत. तसंच पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदारही या बैठकीला उपस्थित असतील. मात्र या बैठकीला पुण्याच्या महापौरांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी अजित पवार मात्र अधिकाऱ्यांच्या मार्फत कारभार करत असल्याचं यातून पुन्हा एकदा दिसून येत आहे. 
पायी वारीच्या परवानगीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका

पायी वारीच्या परवानगीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. संत नामदेव संस्थान नरसी नामदेवतर्फे याचिका दाखल केली आहे. ॲड श्रेयश गच्चे आणि ॲड राज पाटील कोर्टात बाजू मांडणार आहेत. दरम्यान राज्य सरकारने अडीचशे पालख्यांना परवानगी नाकारली आहे. 


 

कोल्हापुरातील उद्योजक संजय घोडवत यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागणाऱ्याला मुंबईतून अटक

कोल्हापुरातील उद्योजक संजय घोडवत यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. रमेशकुमार ठक्कर असं आरोपीचं नाव असून त्याला मुंबईतून बेड्या ठोकल्या. ठक्कर आणि त्याचा साथीदार वेगवेगळ्या फोन नंबरवरुन पैशांची मागणी करत होते. कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देखील घोडवत यांना दिली होती. दरम्यान रमेशकुमार ठक्करचा साथीदार व्ही पी सिंह मात्र अद्याप फरार असून तो दिल्लीचा आहे.

मिरज तालुक्यातील बेडगमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने 20 जणांचा चावा घेतला, एक वर्षीय लहान मुलासह जनावरंही जखमी

सांगली : मिरज तालुक्यातील बेडग मध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने 20 जणांना चावा घेतला आहे. चावा घेतलेल्यांमध्ये एक वर्षीय लहान मुलाचाही समावेश असून त्याच्या आईवर ही कुत्र्याने हल्लाकरून चावा घेतला. यामध्ये सर्वजण जखमी झाले असून  शासकीय रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  पिसाळलेल्या कुत्र्याने पाळीव देशी पाडीवरही  हल्ला केला.त्यामुळे परिसरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याची मोठी दहशत निर्माण झाली. ग्रामस्थांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर नागरिकाकांनी पिसाळलेल्या कुत्र्याला मारण्यात आले. तीन वर्षाची तीन चिमुकले  घरा समोरील अंगणात खेळत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्यावर हल्ला करत शरीरावर चावा घेतला. ही मुले गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. घरातील व्यक्तींनी त्यांना कुत्र्याच्या तावडीतून सोडवून घेतले. पाळीव कुत्र्यांवरही या मोकाट कुत्र्यांने हल्ला केला. जनावरे आणि शेळ्या या कुत्र्यापासून सुरक्षित राहावे, म्हणून काहींनी रात्री पहारा देत जागून काढली होती. 

पुणे महापालिकेच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज मंत्रालयात बैठक, पुण्याच्या महापौरांना मात्र आमंत्रण नाही

पुणे : पुणे महापालिकेच्या विविध प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्याच्या मंत्रिमंडळातील आठ मंत्री, वेगवेगळ्या पाच खात्यांचे सचिव आणि पुणे महापालिकेचे आयुक्त उपस्थित असणार आहेत. या बैठकीस पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदारही उपस्थित असणार आहेत. मात्र या बैठकीला पुण्याच्या महापौरांना मात्र आमंत्रण देण्यात आलेले नाही. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी अधिकार्यांच्या मार्फत कारभार मात्र अजित पवार करत असल्याचं यातून पुन्हा एकदा दिसून येत आहे. 

पार्श्वभूमी

OBC Reservation बाबत आज जी परिस्थिती, त्याला सर्वस्वी देवेंद्र फडणीस अन् भाजप जबाबदार, एकनाथ खडसेंचा आरोप


"मंडळ आयोगाने ओबीसींना आरक्षण दिले होते. त्यावेळीही भाजपने मंडळ आयोगाला विरोध केला होता. त्यामुळे तेव्हापासून भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. व्हिपी सिंग यांचा पाठिंबा काढला आणि ते सरकार कोसळलं ते एकाच मुद्यावर कोसळलं होतं, आता देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. राज्य सरकारने काय केलं आणि राज्य सरकारचीच जबाबदारी होती. तर मग तुम्ही पाच वर्ष सत्तेत होते मग तुम्ही का नाही केले?", असं म्हणत एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 


"2011 रोजी ओबीसींची जातनिहाय गणना झाली, जन गणना केंद्र सरकार करीत असल्याने डाटा केंद्र सरकारकडे उपलब्ध आहे. हा डाटा मिळविण्या साठी देवेंद्र फडणीस यांनी मोदी यांना पत्र लिहून मागणी केली आहे, तशीच मागणी पंकजा मुंडे यांनीही केली होती. मात्र दिल्लीत भाजपाच सरकार असताना आणि तुम्ही राज्यात सत्तेत असताना, तुम्हाला केंद्र सरकार डाटा देत नाही आणि तुम्ही म्हणता राज्य सरकारने केले पाहिजे, हा सर्व प्रकार खोटारडे पणाचा आहे. या सर्व प्रकाराला तुम्हीच जबाबदार असून तुम्ही ओबीसी समाजाची दिशाभूल करीत आहात.", असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.


मोबाईल नेटवर्कच्या शोधात मुलं झाडावर चढली; वीज पडून एक मृत्युमुखी; तीन जखमी


मोबाईल नेटवर्कच्या शोधात झाडावर चढलेल्या मुलांच्या अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू, तर तीन जखमी झाली आहेत. डहाणू तालुक्यातील ओसरविरा गावात सोमवार, 28 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास झाडावर वीज पडून हा अपघात घडला.


डहाणू तालुक्यात सोमवारी दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकटाला सुरुवात झाली. तालुक्यातील ओसरविरा गावच्या मानकरपाडा येथील काही मुलं मोबाईल रेंज मिळण्यासाठी उंबराच्या झाडावर चढली होती. संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास या झाडावर वीज पडली पडल्याने रविन बच्चू कोरडा (वय 17 वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला. चेतन मोहन कोरडा (वय 11 वर्षे), दीपेश संदीप कोरडा (वय 11 वर्षे) आणि मेहुल अनिल मानकर (वय 12 वर्षे) हे जखमी आहेत. त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मेहुल  याला अधिक उपचारासाठी धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलला पाठविण्यात आले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.