Breaking News LIVE : बी एच आर घोटाळा प्रकरणी फरार जितेंद्र कांडारे पोलिसांच्या ताब्यात

Breaking News LIVE Updates, 28 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Jun 2021 10:36 PM
बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणी गेल्या सात महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा जितेंद्र कांडारे ताब्यात

राज्यभर गाजत असलेल्या बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणी गेल्या सात महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अवसायक जितेंद्र कांडारे याला इंदोर येथून  ताब्यात घेण्यात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून पुणे पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे.  बीएचआर पतसंस्थेच्या मालमत्ता कमी दरात आपल्या हितचिंतकाना देऊन त्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला गेला असल्याचा संशय आहे.  यामध्ये अवसायक जितेंद्र कांडारे आणि सुनील झवर हे प्रमुख सूत्रधार असल्याचं मानलं जात आहे. गेल्या सात महिन्यांपासून पुणे पोलिस या दोघांचा शोध घेत होते. सुनील झवर अद्यापही फरार आहे,मात्र जितेंद्र कंडारे पोलिसांच्या ताब्यात आल्याने सुनील झवर देखील लवकरच सापडेल असा विश्वास पोलिस सूत्रांनी व्यक्त केला आहे

बीएचआर घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी जितेंद्र कांडारेला इंदोर येथून ताब्यात घेतलं, पुणे पोलिसांची कारवाई

बीएचआर घोटाळा प्रकरणी गेल्या सात महिन्यांपासून फरार असलेल्या जितेंद्र कांडारेला इंदोर येथून ताब्यात घेतलं. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. घोटाळ्याची व्याप्ती पाहता ही पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे. 

बी एच आर घोटाळा प्रकरणी फरार जितेंद्र कांडारे पोलिसांच्या ताब्यात

 बी एच आर घोटाळा प्रकरणी गेल्या सात महिन्या पासून फरार असलेल्या जितेंद्र कांडारे याला इंदोर येथून ताब्यात घेण्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. घोटाळ्याची व्याप्ती पाहता ही पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे. 

नागपुरात गेल्या पाऊण तासापासून दमदार पाऊस

नागपुरात गेल्या पाऊण तासापासून दमदार पाऊस होत आहे. विजेच्या कडकडाटासह शहरातील सर्वच भागात दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे दुपारपर्यंत असलेला  उन्हाचा आणि घाम आणणारा वातावरण संध्याकाळी आलेल्या पावसानंतर अचानकच बदलून गेलाय... विशेष म्हणजे हवामान विभागाने दुपारनंतर पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता....

कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करणार, उदय सामंत यांची एबीपी माझाला माहिती

ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोनामध्ये मृत्यूमुखी पडले आहेत. त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय झाल्याची एक्सक्लुझिव्ह  माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एबीपी माझाला दिली आहे.  अकृषी विद्यापीठांची फी कमी करण्याचा तत्वत: निर्णय झाला असून उद्यापर्यंत यावर निर्णय येणार आहे. प्रत्येक विद्यापीठांचे फी स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत, त्यामुळे कोणत्या विद्यापीठांचे शुल्क किती कमी होणार यासंदर्भात संध्याकाळी कुलगुरु चर्चा करतील.  

बेळगाव : अथणी तालुक्यातील हल्याळ येथे कृष्णा नदीत बुडून चार भावांचा मृत्यू

अथणी तालुक्यातील हल्याळ येथे कृष्णा नदीत बुडून चार भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी दुपारी हे चार जण आपल्या कुटुंबीय समवेत कृष्णा नदीत कपडे धुण्यासाठी गेले होते. ग्रामदेवतेची जत्रा असल्याने घरातील सगळे कपडे धुण्यासाठी गेले होते.कपडे धूत असताना एक जण पाय घसरल्याने नदीत पडला. त्याला वाचवण्यासाठी अन्य तिघांनी धाव घेतली आणि ते चौघेही नदीत वाहून गेले. परशुराम गोपाळ बनसोडे (३६), सदाशिव बनसोडे (२४), शंकर बनसोडे (२०) आणि दरेप्पा बनसोडे (२२) अशी कृष्णा नदीत वाहून गेलेल्यांची नावे आहेत.

अहमदनगर : कोपरगाव तालुक्यातील काल संध्याकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

अहमदनगर : कोपरगाव तालुक्यातील धामोरी, चासनळी, वेळापूर, मंजूर शिवारात काल संध्याकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 78 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार योगेश चांद्रे यांनी दिली. या ढगफुटी सदृष्य पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याच्या चाळी वाहून गेल्या तर 60 ते 70 घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात तहसीलदार योगेश चंदरे यांनी सोमवारी पाहणी करून पंचनाम्याचे आदेश दिले आहे.

पुढील २४ तास महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस

पुढील २४ तास महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस असेल  असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.  मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 3-4 तासात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, बीड आणि उस्मानाबादेतील काही ठिकाणी विजांसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  पुढील 3-4 तास नाशिक, धुळे, नंदूरबारमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. अहमदनगर, सातारा आणि सांगलीत देखील मुसळधारेची शक्यता आहे.  पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

आयएसएसएफ शुटिंग वर्ल्ड कपमध्ये कोल्हापूरच्या राही सरनोबतची सुवर्ण कामगिरी

आयएसएसएफ शुटिंग वर्ल्ड कपमध्ये कोल्हापूरच्या राही सरनोबतची सुवर्ण कामगिरी,


25 मीटर पिस्टल प्रकारात 39 गुणांनी सुवर्णपदकावर निशाणा,


जागतिक पातळीवर पुन्हा एकदा भारतीय खेळाडूची चमकदार कामगिरी,

संगमेश्वरमधील डेल्टा प्लसचे रुग्ण सापडलेल्या पाच गावातील कंटेनमेंट झोन उठवला

रत्नागिरी : डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या संगमेश्वरकरांसाठी दिलासादायक बातमी,  डेल्टा प्लसचे रुग्ण सापडलेल्या पाच गावात कंटेनमेंट झोन उठवण्यात आला आहे. गेल्या चौदा दिवसांपासून धामणी, नावडी, माभळे, कसबा आणि कोंडगाव कंटेनमेंट झोनमध्ये होते. रत्नागिरीच्या प्रांन्ताधिकाऱ्यांनी कंटेनमेंट झोन उठवण्याचे आदेश दिले आहेत. पाच गावातील डेल्टा प्लसचे रुग्ण बरे झाल्याने प्रशासनाचा निर्णय घेतला आहे. ओझरखोल आणि रेवाळेवाडी कोसुंब या दोन गावात कंन्टेंटमेंट झोन कायम आहेत.

कोल्हापुरातील व्यापाऱ्यांना समजवण्यात जिल्हा पोलीस प्रमुख यशस्वी, दोन दिवसांची मुदत देऊन सहकार्य करण्याचं मान्य

आजपासून संपूर्ण राज्यात अनलॉकच्या लेव्हल 3 चे नियम लागू झाले आहेत. परंतु कोणत्याही परिस्थितीत दुकानं सुरु करणार अशी भूमिका कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी घेतली होती. दरम्यान कोल्हापुरातील व्यापाऱ्यांना समजावण्यात जिल्हा पोलीस प्रमुख यशस्वी झाले आहेत. निर्णयासाठी व्यापाऱ्यांनी दोन दिवसांची मुदत देऊन सहकार्य करण्याचं मान्य केलं आहे.  दोन दिवसात निर्णय झाला नाही तर सर्व दुकानं सुरु ठेवणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे. ग्रामीण आणि शहरी भाग असा वेगळा पॉझिटिव्हिटी रेट काढण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

पुण्याच्या आंबिल ओढ्यातील नागरिकांचा महापालिकेसमोर ठिय्या, सुप्रिया सुळे आंदोलकांच्या भेटीला

पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील घरांवरील कारवाईविरोधात नागरिकांनी पुणे महापालिकेसमोर ठिय्या मांडला आहे. तोडलेली घरं पुन्हा बांधून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आंदोलकांच्या भेटीसाठी आंदोलनस्थळी दाखल झाल्या आहेत.

औरंगाबादच्या वाळूज लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी



औरंगाबादच्या वाळूज लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी, लसीकरण केंद्रावर गर्दीमुळे गोंधळ, ही गर्दी कोरोनाला आमंत्रण तर देणार नाही ना?


 


 



देहू-आळंदीत 28 जून ते 4 जुलै दरम्यान संचारबंदी लागू

पुण्यातील देहू-आळंदीत आजपासून वारकऱ्यांना प्रवेश बंदी आहे. कोरोनाची तिसरी लाट तोंडावर येऊन ठेपली आहे. त्याअनुषंगाने 28 जून ते 4 जुलै दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 1 जुलैला संत तुकोबांच्या तर 2 जुलैला संत ज्ञानोबांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पण पालखी सोहळा हा मंदिरातच मुक्कामी असेल तर आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी एसटीतून पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. त्यामुळे देहू-आळंदीत वारकरी दर्शनाला येण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहित धरुनच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

कचरा उचलण्याचं काम खाजगी कंत्राटदाराला, पुणे महापालिकेच्या निर्णयाविरोधात बाबा आढाव यांचे आंदोलन

पुणे महापालिकेच्या कचरा वेचणाऱ्या स्वच्छ च्या कर्मचाऱ्यांच्या करार नूतनीकरण करण्याऐवजी कचरा उचलण्याचे संपूर्ण कंत्राट खाजगी कंपनीला देण्याचा घाट महापालिकेत सत्ताधारी भाजप ने घातलाय. त्याला विरोध म्हणून आज बाबा आढाव कचरावेचक महिलांसोबत पुणे महापालिकेच्या गेटवर आंदोलनासाठी बसले आहेत. खासदार सुप्रिया सुळे  या आंदोलनात सहभागी होत आहेत. 


 

हडपसर परिसरातील राम टेकडी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी

पुणे महानगरपालिकेचा हडपसर येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद असताना देखील इथं महानगरपालिकेकडून कचरा ओपन डम्पिंग केलं जात आहे. त्यामुळे इथल्या स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.. स्थानिकांचा या कचरा डेपोला विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी या कचरा डेपोलो भेट दिली आहे.  

मुंबई महापालिका आता कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग मशीन

मुंबई महापालिका आता कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग मशीन बसवणार आहे. कोविडचे नवीन व्हेरियंट तपासणीसाठी आता नमुने पुण्याच्या एनआयव्हीला पाठवण्याची गरज नाही. अमेरिकेहून साडेसहा कोटींचे अत्याधुनिक जिनोम सिक्वेन्सिंग मशीन आणले जाणार आहेत. दोन आठवड्यात कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचे जिनोम सिक्वेन्सिंग सुरु होणार असून यामुळे दोन-तीन दिवसांत 'डेल्टा प्लस' चाचणी अहवाल मिळणार आहे. कोरोनाचे वारंवार बदलत असलेले घातक स्वरूप जाणून घेण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग करणे गरजेचे असते. पुण्याला चाचणीसाठी नमुने पाठवल्यानंतर रिपोर्टसाठी लागणारे तब्बल दोन महिन्यांचे ‘वेटिंग’ संपणार आहे. डेल्टा प्लस’ संशयित सुमारे 600 अहवालांचे रिपोर्ट पालिकेला मिळाले आहेत. मुंबईत ‘डेल्टा प्लस’चा केवळ एकच रुग्ण आढळला असून तो यापूर्वीच बरा देखील झाला आहे. मात्र पालिका आगामी काळात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषाणूंची चाचण्या करण्यासाठी यंत्रणा उभारत आहे. सद्यस्थितीत पालिका ‘डेल्टा प्लस’सारख्या वेगळ्या विषाणूंच्या ‘जिनोम सिक्वेन्स’साठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे संशयित रुग्णांची सॅम्पल पाठवली जातात. मात्र सद्यस्थितीत डोके वर काढणारा ‘डेल्टा प्लस’ सर्वाधिक वेगाने पसरण्याचा धोका असल्यानेच पालिकेने या विषाणूंच्या चाचण्या कस्तुरबा रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : वांद्रे पूर्वेतील आईएस न्यू इंग्लिश शाळेसमोर विद्यार्थी आणि पालकांचे आंदोलन

मुंबई :  वांद्रे पूर्वेतील आईएस न्यू इंग्लिश शाळेसमोर विद्यार्थी आणि पालकांचे आंदोलन, शाळेची ऑनलाईन फी भरली नाही म्हणून ऑनलाईन शिक्षण बंद केल्याचा आरोप, सरकारने शाळांना फी सक्ती करु नये सांगितलं असतानाही शाळेची मनमानी, पालकांचा आरोप

मुंबईकरांची चिंता वाढली, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 16 टक्के पाणीसाठी शिल्लक

मुंबईकरांची चिंता वाढली, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 16 टक्के पाणीसाठी शिल्लक, गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा साठा अधिक, मात्र पावसाने ओढ दिल्याने चिंता कायम

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांप्रमाणे शुल्क कमी करण्याचा राज्य सरकारचा विचार

महाविद्यालय आणि विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं शुल्क कमी होणार? शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांप्रमाणे शुल्क कमी करण्याचा राज्य सरकारचा विचार करत आहे. याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आज सर्व कुलगुरुंशी चर्चा करणार आहेत.

टीईटी परीक्षेसंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या 89 याचिका निकाली, 25 हजारांपेक्षा अधिक शिक्षकांची नोकरी धोक्यात

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हता म्हणजेच टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या संदर्भातील 89 याचिका निकाली काढल्यामुळे राज्यातील 25 हजारांपेक्षा अधिक शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे. यातील 200 पेक्षा अधिक शिक्षक हे दिलासा मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात आज याचिका दाखल करणार आहेत

कोल्हापुरात व्यापारी आणि प्रशासन आज आमने सामने येण्याची शक्यता

केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानं उघडायला परवानगी असताना सर्व व्यापार सुरू करण्याचा व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला आहे. आज सकाळी 9  वाजल्यापासून  राजारामपुरी आणि महाद्वार परिसरातील दुकान उघडण्यात येणार आहेत. गेल्या अडीच महिन्यापासून व्यापाऱ्याचे कंबरडे मोडलं आहे, त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून व्यापार सुरू करण्यावर व्यापारी ठाम आहेत. प्रशासनाने कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर सामुदायिक विरोध करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. 

वर्ध्यात अल्पवयीन मुलीची प्रियकराकडून हत्या 

वर्ध्याच्या आर्वी येथे एका अल्पवयीन मुलीची तिच्या प्रियकराकडून हत्या झाल्याची घटना घटली आहे. या मुलीचा मृतदेह एका विहिरीत आढळला होता. या प्रकरणाचा उलघडा चार दिवसांनंतर झाला आहे. संबंधित अल्पवयीन मुलगी एका मुलासोबत बोलत असल्याच्या कारणातून दोघांत वाद झाला आणि त्यानंतर प्रियकराने मुलीला विहीरीत ढकलून तिची हत्या केली. पोलिसांनी तपास कायम ठेवत प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपीला अटक केली

दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याच्या कारणातून वर्ध्यातील तरुणाकडून अल्पवयीन प्रेयसीची हत्या

तरुणाने अल्पवयीन प्रेयसीची विहिरीत ढकलून हत्या केल्याची घटना वर्ध्यात घडली आहे. चार ते पाच दिवसांनी या खुनाचा उलगडा होऊन मारेकरी प्रियकराला पोलिसांनी अटक केली. अजय आत्राम असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याचं आर्वी शहरातील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेम होतं. घटनेच्या दिवशी हा तरुण आणि त्याची अल्पवयीन प्रेयसी यांटी भेट झाली होती. दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याच्या कारणावरुन यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी तरुणाने मुलीला विहिरीत ढकलून तिची हत्या केली. चार ते पाच दिवसांनी या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी प्रेमप्रकरणाचा धागा पकडून गुन्हेगाराला शोधून त्याला अटक केली.

धुळे शहरात कापड मार्केटला आग, लाखो रुपयांचं नुकसान

धुळे शहरातील पाच कंदील परिसरात असलेल्या कापड मार्केटला पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. आजूबाजूच्या परिसरातील दुकाने खाली करण्यास सुरुवात झाली असून अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत हळूहळू वाढ

राज्यात काल 9,974 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,562 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 57,90,113 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 95.91 टक्क्यावर गेला आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Corona Update : राज्यात आज 9,974 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, धुळ्यात रुग्णसंख्या शुन्यावर
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात आज 9,974 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,562 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 57,90,113 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 95.91 टक्क्यावर गेला आहे. तर राज्यात आज 143 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2 टक्के आहे. राज्यात सध्या 1 लाख 22 हजार 252 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात कोल्हापुरात सर्वांधिक रुग्णांची नोंद झाली आहे, कोल्हापुरात 1525 रुग्ण तर धुळ्यात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. 


माझ्यावर छत्रपतींचे संस्कार, मी मॅनेज होईल का? संभाजीराजेंचा परखड सवाल
माझ्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत, मी मॅनेज होईल का? असा परखड सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी टीकाकारांना उद्देशून उपस्थित केलाय. ते कोल्हापुरात मराठा संघटनांच्या समन्वयकांशी संवाद साधताना बोलत होते. नाशिकमधील मूक आंदोलनानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला 21 दिवसांची मुदत दिलीय. संभाजीराजे यांच्या भूमिकेवर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याला संभाजीराजांनी प्रतिप्रश्न करत उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.


England vs India Women: टीम इंडियाचा इंग्लंडकडून 8 विकेट्ने पराभव, मालिकेत इंग्लंडची 1-0 ने आघाडी
INDIA W vs ENGLAND W : भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात ब्रिस्टलमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान इंग्लंडने भारताचा आठ गडी राखून पराभव केला. यासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारतीय संघाने प्रथम खेळताना 50 षटकांत केवळ 201 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने लक्ष्याचा पाठलाग करताना दोन विकेट गमावत 15 ओव्हर्स राखून विजय मिळवला.


गणेशोत्सव दरम्यान मूर्तीच्या उंचीबाबत मर्यादा नको, मूर्तिकार, गणेशोत्सव मंडळाची मागणी
यंदाच्या गणेशोत्सव दरम्यान गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मर्यादा राज्य सरकारने घालून देऊ नये, अशी मागणी मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून केली जातीये. मागील वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करताना 4 फुटापर्यंत गणेशमूर्तीची उंची असावी, अशा प्रकारच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, यावर्षी अशी मूर्तींच्या उंचीबाबत मर्यादा घालू नये, अशी विनंती केली जातीये. अवघे दोन महिने गणेशोत्सवाला उरलेले असताना मूर्तिकार मात्र चिंतेत आहेत. कारण कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना अद्याप राज्य सरकारकडून न मिळाल्याने उंच गणेशमूर्तीची काम मूर्तिकारांनी सुरू केलेली नाही. त्यामुळे याबाबत स्पष्टता सरकारने द्यावी, जेणेकरून ज्या प्रकाराचा संभ्रम मूर्ती साकार करण्याबाबत मूर्तिकारांमध्ये आहे तो दूर होईल. मूर्तिकारांप्रमाणे हाच संभ्रम मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळामध्ये सुद्धा आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.