Maharashtra News LIVE : सीबीएसई, आयसीएसईच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Breaking News LIVE Updates, 22st June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
मुंबईत महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात रुग्णाचा उंदराने डोळा कुरतडला. सदर रुग्ण आयसीयूमध्ये दाखल होता. त्यावेळी डोळ्याच्या खालच्या भागात रुग्णाला उंदीर चावला. ही गंभीर घटना असून चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणकेर यांनी दिलीय.
सीबीएसई, आयसीएसईच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
मराठा आरक्षण बाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली. माझ्या मागणीनुसार या याचिकेमध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरीत अॅनेक्शर्स देखील भाषांतरीत करण्यात येतील, असे नमूद केले आहे, खासदार संभाजीराजे छत्रपती यांची माहिती
नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस स्टेशन अंतर्गत वाकी येथे कन्हान नदीत बुडून चौघांचा मृत्यू झाला आहे. नागपूर शहरातून 8 तरुण मित्र फिरण्यासाठी वाकी येथे गेले होते. 8 मित्रांपैकी चौघेजण नदीत पोहोण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून एकाचा मृतदेह मिळाला असून इतर तिघांचा शोध सुरू आहे.
आमची कागदपत्रं भक्कम आहेत. त्यामुळे खासदारकीला धोका नाही हा विश्वास होताच. विरोधक बालिशपणाने हे आरोप करत होते. आज त्यांना उत्तर मिळालं. हे सगळं षड्यंत्र मातोश्रीवरून घडलं आहे, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केलाय. माझा जन्म महाराष्ट्रातला असूनही मी महाराष्ट्रीयन आहे हे पण सिद्ध करावं लागलं हे वेदनादायी. अनिल परब यांनी कटकारस्थान रचलं, राणा कुटुंबियांचा आरोप. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विदेशात कुठे कुठे संपत्ती आहेत याचे सगळे पुरावे माझ्याकडे : रवी राणा. ईडी, सीबीआयला हे सगळे पुरावे देणार.
सुप्रीम कोर्टाने आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या प्रकरणात अंतिम सुनावणी पर्यंत स्थगिती (स्टे).. दिली आहे. हे कळताच अमरावती शहरातील राजकमल चौकात युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, ढोल ताशे वाजवत जल्लोष केला. मुंबई हायकोर्टाने खासदार नवनवीन राणा यांचा जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं.
मुंबई : पावसाळी अधिवेशन दोन दिवस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 आणि 6 जुलै रोजी पावसाळी अधिवेशन होणार आहे. कोरोना संकटामुळे केवळ 2 दिवसांचं अधिवेशन होणार असल्याची माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खोट्या जातप्रमाणपत्रा प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.
नाना पटोलेंच्या विरोधात काँग्रेसचे आमदार, मंत्री नाराज असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या विरोधातली तक्रार हायकमांडकडे करणार असून नाना पटोलेच्या बेताल वक्तव्यावरून महाविकास आघाडीत वितुष्ट निर्माण होत असल्याची भावना मंत्र्यांमध्ये निर्माण झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्तेही नाना पटोलेंवर नाराज आहेत. नाना पटोलेंची रोज रोजची वक्तव्य काँग्रेसला अडचण निर्माण करणारी असल्याची काँग्रेसच्या मंत्री आणि आमदारांची भावना आहे. लवकरच काँग्रेसमधला एक गट काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून नाराजी व्यक्त करणार आहे.
देशातील कोरोनाचा मृत्यूदर 1.30 टक्के आहे, तर रिकव्हरी रेट जवळपास 96 टक्के आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत घट होऊन 3 टक्क्यांहून कमी झाली आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या यादीत भारत जगभरात तिसऱ्या स्थानी आहे. एकूण बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतप सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.
देशात सलग 40व्या दिवशी कोरोनाबाधितांहून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. 21 जूनपर्यंत देशभरात 28 कोटी 87 लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 86 लाख 16 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 39 कोटी 40 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 16 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे.
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोनाबाधित : दोन कोटी 99 लाख 77 हजार 861
कोरोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा : दोन कोटी 89 लाख 26 हजार 38
एकूण सक्रिय रूग्ण : 6 लाख 62 हजार 521
एकूण मृत्यू : 3 लाख 89 हजार 302
कोल्हापूर येथे मराठा समाजाचे आज चक्काजाम आंदोलन करण्यात येत असून आजच्या आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे सहभागी होणार आहेत. राजर्षी शाहूंच्या जनक घराण्याचा वंशज म्हणून ते सहभागी होणार आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी एक महिना आंदोलन स्थगित केले असताना या मुद्द्यावरुन समरजीत घाटगे आक्रमक झाले आहेत.
नाशिक शहराच्या जवळपास गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा बिबट्याची दहशत जाणवत आहे. मुंबई आग्रा महामार्गावर दिवसाबिबट्याने दर्शन दिल्यानंतर रात्री भगूर गावातील एका घराच्या आवारातून पाळीव कुत्रे बिबट्याने उचलून नेले. दारणा नदिच्या काठावर मागील दोन तीन वर्षात अनेक नागरिकांवर बिबट्याने हल्ले केल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. वनविभागाने पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव देण्यात येणार असल्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली आहे. परंतु, आता नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला वेगळेच वळण लागले आहे. राज ठाकरे यांची भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका असून आम्ही त्यांच्याशी सहमत नसल्याचे मत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीने मांडले आहे. दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याची मागणी कृती समितीने केली आहे.
मुंबईमध्ये असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत शिफ्ट होणार नाही. यामुळेच सरकारने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा विचार केला. सरकार जर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणार असले, तर याला प्रकल्पग्रस्त आगरी कोळी जनतेचा तीव्र विरोध असेल, अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे. यासाठी येत्या 24 जून रोजी सिडकोवर मोर्चा काढण्यात येणार असून 1 लाखांवर जनता सहभागी होणार असल्याचे कृती समितीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरवणार असतील तर याला प्रकल्पग्रस्त जनता तोडीसतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.
पार्श्वभूमी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव देण्यात येणार असल्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली आहे. परंतु, आता नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला वेगळेच वळण लागले आहे. राज ठाकरे यांची भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका असून आम्ही त्यांच्याशी सहमत नसल्याचे मत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीने मांडले आहे. दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याची मागणी कृती समितीने केली आहे.
मुंबईमध्ये असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत शिफ्ट होणार नाही. यामुळेच सरकारने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा विचार केला. सरकार जर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणार असले, तर याला प्रकल्पग्रस्त आगरी कोळी जनतेचा तीव्र विरोध असेल, अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे. यासाठी येत्या 24 जून रोजी सिडकोवर मोर्चा काढण्यात येणार असून 1 लाखांवर जनता सहभागी होणार असल्याचे कृती समितीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरवणार असतील तर याला प्रकल्पग्रस्त जनता तोडीसतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.
दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली भूमिका मांडली आहे. "नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नावच संयुक्तिक आहे," असं राज ठाकरे म्हणाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तरी त्यांनीही शिवरायांचंच नाव सूचवलं असतं, असंही त्यांनी म्हटलं. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरण मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे 21 रुग्ण, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले 21 रुग्ण महाराष्ट्रात (Delta plus variant of coronavirus has been detected in 21 people in Maharashtra) आढळून आले आहेत. त्यातील 9 रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील 7, मुंबई 2 आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे 7500 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
या संदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील 100 सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सी एस आय आर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. 15 मे पासून 7500 नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे 21 केसेस आढळून आले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -