Breaking News LIVE | कुख्यात गुंड गजा मारणे थेट न्यायालयात हजर, पोलिसांच्या हातावर तुरी देत जामीन मिळवला
Breaking News LIVE Updates, 25 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
25 Feb 2021 08:27 PM
विराट कोहलीच्या टीम इंडियानं अहमदाबादच्या डे-नाईट कसोटी सामन्यात इंग्लंडचा दुसऱ्याच दिवशी दहा विकेट्सनी धुव्वा उडवला. भारतानं या विजयासह चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या मळसुर गावातील एक परंपरा अक्षरश: अंगावर काटा आणणारी आहे. ही परंपरा आहे निखाऱ्यांवरून चालण्याची. या गावात सुपीनाथ महाराजांचं प्राचीन मंदिर आहे. सुपीनाथ महाराजांची यात्रेच्या दिवशी निखाऱ्यांवरून चालण्याची परंपरा पाळली जातेय. 22 फेब्रुवारीच्या रात्री मळसुर गावात 'देवाचं लग्न' या उत्सवानिमित्त भक्तांनी ही 'अग्नीपरिक्षा' दिलीय. कोरोनाच्या धोका असतानाही यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाकडेही गावकऱ्यांनी दुर्लक्ष केलंय. निखाऱ्यांवरून चालतांना देवाला घातलेलं साकडं पुर्ण होतंय अशी येथील गावकऱ्यांची श्रद्धा आहेय.
अमरावतीमध्ये आज एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. ही क्लिप केव्हाची आणि कुठली हे जरी स्पष्ट नसलं तरी अमरावतीत चर्चेचा विषय ठरत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये लॅब डॉक्टर एका युवकाला सांगतोय की, "ज्यांनी पेटीएमचा कोरोना इन्शुरन्स काढला आहे अशा तरुणांचे नंबर पाठव, आपण त्याला पॉझिटिव्हचा रिपोर्ट देऊ आणि चार दिवस भर्ती करु आणि त्यांनतर त्याला क्लेम मिळवून देऊ." काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी अमरावतीत एक रॅकेट सक्रिय असल्याचा गौप्यस्फोट केला होता, या ऑडिओ क्लिपमुळे त्याला दुजोरा मिळाला आहे. तसंच पुण्याच्या एका इन्शुरन्स कंपनीने अमरावती आणि अकोला येथे साडेतीन कोटी रुपये कोरोना इन्शुरन्स क्लेम मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला. पोलीस आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचं समजतं.
अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 ते 10 मार्च रोजी होणार असून 8 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार
गडचिरोली: ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे दुसऱ्यांदा कोरोना पॉजिटिव्ह. सात दिवसापांसून ताप खोकल्याचा त्रास होता. RTPCR टेस्ट निगेटिव्ह मात्र HRCT ब्लड टेस्टमध्ये कोरोना पॉजिटिव्ह, पुढील उपचारासाठी त्यांना नागपुरातील माहूरकर रुग्णालयात दाखल केले आहे. महारोगी सेवा समीच्या अंतर्गत येणाऱ्या लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा, आनंदवन वरोरा व सोमनाथ प्रकल्प पर्यटकांसाठी पुढील काही महिने बंद ठेवण्याचा निर्णय, पर्यटकांना तिन्ही प्रकल्पात न येण्याचं आवाहन.
बोईसर मधील सियाराम कंपनीजवळ ट्रकने बाईकस्वाराला चिरडले. बाईक स्वाराचा जागीच मृत्यू. ट्रक चालकासह ट्रक पोलिसांच्या ताब्यात. मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू
पीएनबी बँक घोटाळ्याप्रकरणी फरार असलेल्या नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला यूकेतील कोर्टाची परवानगी, नीरव मोदी लवकरच भारतात परतणार
कल्याण पूर्वे काटेमानवली येथील आर. एल. बी. या फायनान्स कंपनीच्या शाखेत कार्यरत एका कर्मचाऱ्याला मनसे कार्यकर्त्यानी चांगलाच चोप देत त्याला उठाबशा काढायला लावून माफी मागायला लावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना 23 फेब्रुवारीला संध्याकाळी घडली होती. आता त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने महिलेसोबत उद्धट भाषेत अरेरावी केल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्ते या कंपनीच्या शाखेत गेले. मात्र, या कर्मचाऱ्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी या कर्मचार्याला बेदम चोप देत माफी मागण्यास भाग पाडले.
अमरावती जिल्ह्यात आज पुन्हा कोरोना रुग्णांत मोठी वाढ. आज दिवसभरात अमरावती जिल्ह्यात तब्बल 906 कोरोना रुग्ण आढळले. आज 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या पोहचली 32 हजार 831 वर.
अधिवेशनात कोरोना दिसतो, संजय राठोड यांच्या वेळी कोरोना दिसला नाही का? कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी रंगली. दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशारा भाजप नेत्यांनी सरकारला दिला.
मराठा आरक्षणाची सुनावणी अकरा न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. हायकोर्टातले प्रतिवादी संदीप पोळ आणि विवेक कुराडे यांच्यावतीने अॅडव्हेकेट प्रशांत केंद्रे यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने सुद्धा अशाच पद्धतीची भूमिका या आधी व्यक्त केलेली आहे. आता या क्षणापर्यंत राज्य सरकारची अशी याचिका दाखल झालेली नाही पण सरकारही अशा पद्धतीची याचिका दाखल करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे या मागणीबाबत सुप्रीम कोर्टात त्या प्रतिसाद काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
सोशल मीडियावरील माहितीची तीन स्तरीय तपासणी होणार, महिलेवरील आक्षेपार्ह पोस्ट 24 तासांच्या आत हटवावी लागणार असं केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले.
सिद्धिविनायक मंदिर अंगारकी
,
यंदाची पहिली अंगारकी चतुर्थी 2 मार्चला
,
मात्र गणपती मंदिरामध्ये जाणाऱ्या भाविकांवर निर्बंध
,
सिद्धिविनायक मंदिरात अंगारकीच्या दिवशी ऑफलाईन दर्शन बंद
,
ऑनलाईन QR कोड असलेल्या भविकानाच मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार
,
सकाळी 8 ते रात्री ९ वाजेपर्यंत मंदिरात भाविकांना दर्शन घेता येणार
रविकांत तुपकरांचा बुलडाणा महावितरणला शेवटचा अल्टीमेटम
बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलडाणा महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना शेवटचा अल्टीमेटम दिला. या काळात कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन कापाल तर याद राखा...संघर्ष अटळ आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांना फटके बसतील..असे रविकांत तुपकरांनी ठणकावून सांगितले..महावितरणने सध्या विज कनेक्शन कापायचा सपाट लावला आहे. लॉकडाऊन काळातील विजबील माफ करायचे सोडून सध्या जबरदस्ती वसुली सुरू आहे.
कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे सगळीकडे कारवाई होत आहे मात्र संजय राठोड यांच्या शक्ती प्रदर्शनानंतर मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले नाही असं सांगत सरकार संजय राठोड प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप बावनकुळे यांनी केला. पुणे पोलीस योग्य प्रकारे चौकशी करत नाही त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा अशी मागणी ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली
सातारा जिल्ह्यातील 16 शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे या 16 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या 16 शाळातील 35 विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचं समोर आलंय. आता या शाळांतील इतर विद्यार्थांचीही कोरोना तपासणी करण्यात येत आहे. या 35 विद्यार्थ्यांमध्ये पाचवी ते आठवी या दरम्यानचे 25 विद्यार्थी तर नववी ते बारावीपर्यंतचे एकूण 10 विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत.
#Breaking दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील 43 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण,
गतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा
,
काल काही विद्यार्थ्यांना त्रास जाणवत असल्याने केली होती तपासणी
,
काल आणि आज दोन दिवस झालेल्या तपासणीत 43 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न
,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांची फोनवरून माहिती
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानं महागाई वाढणार आहे. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर होईल : शक्तीकांत दास रिझर्व बँकेचे गव्हर्नर
किमान वेतन द्या या मागणीसाठी राज्यातील संगणक परिचालक आक्रमक झाले आहेत. त्यासाठी संगणक परिचालकांचे आझाद मैदानावर सलग चौथ्या दिवशी रात्रंदिवस बेमुदत धरणे आंदोलन सुरू सुरु आहे. संगणक परिचालक यांना कायम करण्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी पाळावं अशी मागणी त्यांनी केली आहे.
पोहरादेवी मंदिर आणि सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष कबीरदास महंत यांच्यासह तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कुटुंबातील 3 जणांना कोरोनाची लागण झाली असून दोनच दिवसा अगोदर पोहरादेवीला गर्दी जमली होती. त्या दरम्यान कोरोनाची बाधा झाल्या ची शक्यता आहे.
काँग्रेसच्या माजी नगरसेवकानं मतदारांना मारहाण केल्याची घटना अंबरनाथमध्ये बुवा पाडा परिसरात घडली आहे .या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी माजी नगरसेवक सुरेंद्र यादवसह त्याच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे
पुणे पोलिसांची भूमिका संदिग्ध, पोलीस दबावाखाली आहेत, चित्रा वाघ आक्रमक
महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राच्या इतिहासातलं सर्वाधिक साखरेचे उत्पादन या वर्षी होताना दिसत आहे. आत्तापर्यंत राज्यात सात कोटी 97 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आणखी दोन लाख टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यावर्षी महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा साखर उत्पादनाचा विक्रम होणार आहे. राज्यात पुढच्याही वर्षी सर्वाधिक ऊस गाळप होईल असा अंदाज आहे. त्यामुळे यावर्षी आणि पुढच्या वर्षी साखरेचे काय होईल याचे आतापासूनच अंदाज बांधले जात आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा तारळे याठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचं दिसून आलंय. बाळूमामा देवाच्या पालखी सोहळ्यात डीजे तालावर तरुणांचा डान्स सुरु केला. या सोहळ्याला हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.
पालघर : तीन गाड्यांचा विचित्र अपघात, एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी, पालघर बोईसर रोडवर उमरोळी येथे ब्रिजा कार, इको कार आणि बाईकमध्ये विचित्र अपघात, इको कार चालक सुनील गावडचा उपचारादरम्यान मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी
औरंगाबाद शहरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची एंटीजन टेस्ट केली जात आहे. शहरातील मध्यवर्ती आणि सिडको या दोन बस स्थानकावर प्रवाशांची अँटीजन टेस्ट केली जातेय.
केंद्र सरकार देशातल्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांचं खासगीकरण करणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचक वक्तव्यानंतर बँकांच्या खासगीकरणाची चर्चा, व्यवसाय करणे सरकारचं प्रमुख काम नाही- नरेंद्र मोदी
पोहरादेवी मंदिर आणि सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष कबीरदास महंत आणि अजून तीन जणांना कोरोनाची लागण
सोलापुरात आजपासून रात्र संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये यासाठी काही निर्बंध सोलापूर जिल्ह्यात लावण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 7 मार्च पर्यंत रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत ही रात्र संचारबंदी लागू असणार आहे. या सोबतच 7 मार्चपर्यंत 10 आणि 12 व्यतिरिक्त इतर सर्व वर्गांच्या शाळा आणि महाविद्यालये देखील बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, भाजप नेत्या चित्रा वाघ वानवडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल
मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
,
ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प
,
वाहनांच्या आठ ते दहा किलोमीटर पर्यंत रांगा
,
मुंब्रा परिसरात कंटेनर पलटी झाल्याने प्रचंड वाहतूक कोंडी
पार्श्वभूमी
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच, मुंबईत 119 दिवसांनी 1000 हून जास्त रुग्ण
एकीकडे देशभरात कोरोना लसीकरणाचं अभियान सुरु आहे, दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. आज (24 फेब्रुवारी) पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली. मागील 24 तासाच महाराष्ट्रात 8 हजार 807 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोबतच आज कोरोनामुळे 80 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 2772 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात एकूण 20 लाख 08 हजार 623 रुग्ण बरे घरी परतले आहेत. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 59 हजार 358 आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70 टक्के झालं आहे.
पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला; रोहित शर्माचं दमदार अर्धशतक
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तिसर्या कसोटी सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. पहिल्या डावात केवळ 112 धावांवर इंग्लंडला गुंडाळून गोलंदाजीनंतर टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन गडी गमावून 99 धावा केल्या. पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर रोहित शर्मा 57 आणि अजिंक्य रहाणे एका धावांवर नाबाद परतला.
मुंबई ते नवी मुंबई जल वाहतूक यावर्षी सुरू होणार
कोरोना काळात लोकल बंद असल्याने नवी मुंबईतून मुंबईला येणाऱ्या अनेकांना रस्त्यावरच्या खड्ड्यातून मार्ग काढत अतिशय खडतर प्रवास करावा लागला होता. अजूनही सर्वांसाठी पूर्णवेळ लोकलचे दरवाजे सुरू झालेले नाहीत. मात्र लवकरच या सर्व प्रवाशांसाठी एक वाहतुकीचा नवीन पर्याय खुला होणार आहे. येत्या काही महिन्यातच मुंबई ते नवी मुंबई जल वाहतूक सुरू होणार आहे. या वर्षीच मुंबईतील प्रिन्सेस डॉक ते बेलापूर अशी जल वाहतूक कार्यान्वित केली जाणार आहे. येत्या 2 ते 4 मार्च दरम्यान मेरीटाईम इंडिया समिट होणार आहे. त्यात जगभरातील अनेक देश आणि कंपन्या सहभागी होतील. यावर्षी या समिटचे दुसरे वर्ष असून कोरोना मुळे व्हर्चुअल पद्धतीने ही समिट होणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे.