Breaking News LIVE | 12 आमदारांची नावं अद्याप मंजूर न झाल्याने राज्य सरकार पुन्हा राज्यपालांना पत्र लिहिणार

Breaking News LIVE Updates, 24 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Feb 2021 10:07 PM
बीड : जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलाबा जवळ भीषण अपघात झाला आहे या अपघातात भाजपा चे जेष्ठ नेते तथा माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चूलत बहीण आणि भाऊजी जागीच यात ठार झाले आहे.

बीड जिल्ह्यातील चकलाबा तींतरवनीच्या दरम्यान मातोरी येथे आज सायंकाळी सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत बहीण ममता तगडपल्लेवार आणि भाऊजी विलास तगडपल्लेवार हे दोघे पुसद येथून स्वतःच्या वाहनाने पुण्याला मुलाला भेटण्यासाठी निघाले होते .
तींतरवणी येथे ही चारचाकी गाडी भरधाव वेगात असल्याने पुलाखाली जाऊन अपघात झाला,यामध्ये दोघे पती पत्नी जागीच ठार झाले .
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता .
मालेगाव तालुक्यातील घाणेगाव येथे अवैधरित्या अफूची लागवड करणाऱ्या तिघांविरोधात कारवाई केली असून या कारवाईत पोलिसांनी सुमारे 47 लाख 54 हजार रुपये किमतीचा सुमारे 950 किलो वजनाचे अफू बोंड पानांसह जप्त केलीय. नाशिक जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे घाणेगाव शिवारात मोठ्या प्रमाणात अफुची लागवड केल्याची गुफ्त माहिती मिळाल्यानंतर मालेगाव तालुका पोलिस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी आज संध्याकाळच्या सुमारास शेतात जाऊन धाड टाकली असता ३२ गुंठ्यामध्ये फुटी लागवड केल्याच आढळून आले. पोलिसांनी अवैधरित्या अफुची शेती करणारे रामेश्वर अंबादास पगारे, गोकुळ परशराम संसारे, निंबा चंदु शिल्लक या तिंघाविरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानव्ये गुन्हा दाखल केला आहे.

राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. 12 आमदारांची नावं अद्याप मंजूर न झाल्याने महाविकास आघाडी सरकार नाराज आहे. अॅडव्होकेट जनरल कुंभकोणी यांच्या सल्ल्याने सरकार पुन्हा राज्यपालांना पत्र लिहिणार आहे. राज्य सरकारच्या दबावानंतर राज्यपाल 12 मधली काही नावं मंजूर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांच्या मुलावर कलम 188 नुसार गुन्हा दाखल झालाय. जवाहर मनोहर ढोरे असं मुलाचं नाव आहे. मिस ऍण्ड मिसेस फॅशन शोचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महापौर ढोरे यांसह भाजपच्या महिला नगरसेविकांनी रॅम्प वॊक केला. तसेच सभागृहात विनामास्क वावर केला आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला. कोरोनाच्या नियमांची केलेली पायमल्ली प्रसारमाध्यमांनी समोर आणली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने आज गुन्हा दाखल करण्याची तसदी घेतली.
नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेचा नवा अध्यक्ष कोण? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर बैठक सुरु आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित आहेत.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलाबाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहीण आणि भाऊजी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यातील चकलाबा तिंतरवनीच्या दरम्यान मातोरी येथे आज संध्याकाळी ममता तगडपल्लेवार आणि भाऊजी विलास तगडपल्लेवार हे दोघे पुसद येथून स्वतःच्या वाहनाने पुण्याला मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. तिंतरवणी इथे ही चारचाकी गाडी भरधाव वेगात असल्याने पुलाखाली जाऊन अपघात झाला. यामध्ये दोघांनी जागीच प्राण सोडले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील गोकुळच्या निवडणुकीला पुन्हा स्थगिती देण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुकीस आहे त्या पातळीवर स्थगिती दिली आहे. अंतिम टप्प्यात आलेल्या गोकुळच्या निवडणुकीला सहव्यांदा स्थगिती मिळाली आहे. जिल्हा बँक, राजाराम कारखाना यांच्यासह एक हजार संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.
देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली ते औंढा नागनाथ येथे दर महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. मात्र, यंदाची यात्रा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रद्द केली आहे. यंदा महाशिवरात्र ही 11 मार्च रोजी असून हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे दिनांक 9 ते 14 मार्च पर्यंत महाशिवरात्री निमित्त यात्रेचे आयोजन करण्यात येते. यामध्ये 10 मार्चला संस्थांनचे पदसिद्ध अध्यक्ष,पदसिद्ध सल्लागार, पदसिद्ध वकील संघाचे अध्यक्ष हे महापूजा करतात व 11 मार्च रोजी रात्री 8 ते 12 च्या दरम्यान मंदिरातून खंडेश्वर मंदिरातपर्यंत रथातून पालखी मिरवणूक निघते. यानिमित्ताने 60 ते 70 हजार भाविक औंढा नागनाथ येथे दाखल होतात. परंतु, यंदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनीही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई-पुण्यासह राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. म्हणून तुम्ही लोणावळ्यातील मोकळी हवा खायला जाणार असाल तर सावधान. कारण आता लोणावळा पोलिसांनी कडक कारवाई करण्याचं नियोजन आखलं आहे. तुम्हाला पर्यटनासाठी बंदी नक्कीच नाही, पण तुम्ही पर्यटनाचा आनंद घेताना विनामास्क वावरला अथवा गर्दी करुन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला तर तुम्हाला पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे लोणावळ्यात येताना कोरोनाच्या नियमांचं काटेकोर पालन करायचं असा निश्चय करा आणि मगच लोणावळ्याची वाट धरा.
कोरोनाची संख्या पुन्हा वाढत असल्याच्या कारणामुळे जिल्हा प्रशासन चांगलेच सर्तक झाले आहे. या अनुषंगानेच इयत्ता दहावी आणि बारावी वगळून इयत्ता पाचवी ते नववी आणि आकरावीचे वर्ग 10 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज आदेश काढले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्‍यावश्‍यक सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय कारणास्‍तव रुग्‍ण व त्‍यासोबत असलेले नातेवाईक यांना सूट देण्यात आली आहे. सदर वेळेत विनाकारण फिरताना आढळल्‍यास अशा व्‍यक्‍तींच्‍या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्‍यात येईल. जिल्ह्यातील सर्व सार्जवनिक ठिकाणी, आस्‍थापना, समारंभ, कार्यक्रमाचे ठिकाणी मास्‍क वापरणे बंधनकारक असेल. मास्‍क, रुमाल न वापरल्‍यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसात करोना रुगणाची संख्या वाढताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी लातूरच्या खासगी हॉस्टेल मधील 45 विद्यार्थी करोना ग्रस्त झाले होते. यामुळे लातुरात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. त्यातच शहरात लोकांची गर्दी वाढली आहे. आज लातूर जिल्ह्यात आज 98 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यात मनपा हद्दीतील 73 रुग्ण आहेत. यात एकाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंतचा मयतांचा आकडा 703 वर गेला आहे. येत्या काळात कोरोनावर मात करायची असेल तर नागरिकांना दक्ष राहावे लागेल. यासाठी मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर राखणे आवश्यक आहे. तसेच रविवारी आणि शनिवारी सुट्टी असते त्या दिवशी अत्यावश्यक काम असल्याशिवाय बाहेर पडू नये अशी काळजी घ्यावी. या उपक्रमात साथ द्या असे आवाहन जिल्हाधिकारी पी बी पुर्थ्वीराज यांनी केले आहे.
कोविड परिस्थितीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर उपाययोजना कराव्यात, मास्क लावणे, हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे याविषयी नागरिकांत जनजागृती करणे, मी जबाबदार मोहिमेची अंमलबजावणी, तसेच सर्वांना लसीकरण याबाबत याबाबत सादरीकरण करण्यात आले.
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना लस घेतलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारीचा यात समावेश आहे. पालिका प्रशासनाने प्रसिद्धी पत्रक काढून याची माहिती दिलीय.
राज्यात आज 8807 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2772 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2008623 रुग्ण बरे होऊन रग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 59358 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70% झाले आहे.
अमरावती जिल्ह्यात आज पुन्हा कोरोना रुग्णांत मोठी वाढ. आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल 802 कोरोना रुग्ण आढळले. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या पोहचली 32 हजार 225 वर.
नांदगाव तालुक्यातील ढेकू येथे महावितरनाच्या गलथान कारभारमुळे ग्रामपंचायत कर्मचारी सोपान दादा चव्हाण (वय 32) यांचा मृत्यू झाला आहे. ढेकू येथे लाईनचे काम सुरू असताना सब स्टेशन जातेगाव येथून अचानक लाईन सोडल्याने या कर्मचाऱ्याचा जागेवर मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पुढील तपास करत आहे. दरम्यान मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी संबंधित विभागावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
गडचिरोलीत विशेष अभियान पथकावरील नक्षली हल्ल्याचा मोठा कट उधळला, गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम कोकोटी जंगलातील घटना, या परिसरात विशेष अभियान पथक टेकडी भागात नक्षल शोध अभियान राबवित असतानाची घटना, संशयास्पद हालचाली दिसल्याने पोलिस पथकाने टेकडीला घेरले होते. मात्र, चाहूल लागताच जीवनावश्यक वस्तूंसह मोठा कॅम्प साठा सोडून नक्षली पळाले. घटनास्थळावर 10 किलोग्राम वजनाचे दोन भूसुरुंग पथकाने निकामी. दल क्रमांक 4चा कमांडर प्रभाकर उर्फ लोकेटी चंदरराव याच्यासह कसनसूर दलम सदस्यां विरोधात गुन्हा दाखल, मोठ्या प्रमाणात नक्षली दैनंदिन साहित्य- रेशन- भाजीपाला व अन्य साहित्य जप्त
रिक्षा आणि टॅक्सीचे दर वाढणार आहेत. मात्र यावर ग्राहक पंचायतीने मोठा आक्षेप घेतला आहे. ग्राहक पंचायतीकडून परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून निदान 6 महिने पुढे ही दरवाढ ढकलावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच 2 पर्याय देखील सुचवण्यात आले आहेत. सध्या कोरोना काळात ग्राहकांकडे नोकरी नाही, पैसे नाहीत, अशात ही दरवाढ करणे म्हणजे कोणाच्याही फायद्याचे नाही, ग्राहक तर त्रस्त होतीलच पण रिक्षाचालक आणि मालक यांचे देखील नुकसान होईल, असे ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांचे मत आहे.
सह्याद्री अतिथी गृहावरील मंत्रिमंडळ बैठक संपली, मुख्यमंत्री बैठकीतून निघाले, सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत संजय राठोडही उपस्थित होते. या बैठकीत संजय राठोड प्रकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही असं कळतं.
डोंबिवली पूर्वेकडील भोपर गावात कपडे धुण्यासाठी खदाणीत गेलेल्या 11 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वीरेंद्र यादव यांची करिश्मा ही मुलगी आज आपल्या आईसोबत दुपारी बाराच्या सुमारास भोपर खदाणीवर नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी गेली होती. कपडे धुताना पाय घसरल्याने ती खोल पाण्यात पडल्याने बुडाली. यावेळी आईसह बाजूला कपडे धुवत असलेल्या महिलांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती बुडाल्याने झालेला गलका ऐकून धावलेल्या परिसरातील नागरिकांनी तिला खदाणीतून बाहेर काढले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मानपाडा पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळी उभारल्या जात असून या चाळीत राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. साहजिकच या भागात राहणाऱ्या नागरिकांना बाजूला असलेल्या खदाणीतील पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी करावा लागतो. खदाणीत कपडे धुण्यासाठी उतरणाऱ्या महिला, मुलींना अनेकदा जीव गमवावा लागला आहे.
डोंबिवली पूर्वेकडील भोपर गावात कपडे धुण्यासाठी खदाणीत गेलेल्या 11 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वीरेंद्र यादव यांची करिश्मा ही मुलगी आज आपल्या आईसोबत दुपारी बाराच्या सुमारास भोपर खदाणीवर नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी गेली होती. कपडे धुताना पाय घसरल्याने ती खोल पाण्यात पडल्याने बुडाली. यावेळी आईसह बाजूला कपडे धुवत असलेल्या महिलांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती बुडाल्याने झालेला गलका ऐकून धावलेल्या परिसरातील नागरिकांनी तिला खदाणीतून बाहेर काढले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मानपाडा पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळी उभारल्या जात असून या चाळीत राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. साहजिकच या भागात राहणाऱ्या नागरिकांना बाजूला असलेल्या खदाणीतील पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी करावा लागतो. खदाणीत कपडे धुण्यासाठी उतरणाऱ्या महिला, मुलींना अनेकदा जीव गमवावा लागला आहे.

साकीनाका येथील अरिहंत इंडस्ट्रीजची संरक्षक भिंत तोडून त्यामधील एमएमपीएम या कंपनीचे शटर उघडून कंपनीमधील लाखोंचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरुन नेणाऱ्या आरोपींना साकीनाका पोलिसांनी अवघ्या दोन तासात बेड्या ठोकल्या आहेत. इमरान मेहरान शेख आणि अक्षय धर्मा जगताप अशी त्यांची नावे असून त्यांचा साथीदार दिनेश दुमडिया मात्र फरार आहे. यातील इमरान हा इलेक्ट्रिशियन आहे आणि तो या इंडस्ट्रीजच्या बाजूलाच असलेल्या झोपडपट्टीमध्ये राहतो. तो या इंडस्ट्रीजमध्ये ये-जा करत असल्याने या कंपनीमध्ये इलेक्ट्रॉनिक साहित्य कुरिअर केले जात असल्याची माहिती त्याला होती. त्याने 21 तारखेला रात्री अक्षय आणि दिनेशच्या मदतीने या इंडस्ट्रीजच्या संरक्षक भिंतीला भगदाड पाडून या कंपनीचे शटर उघडले. त्यानंतर 146 मोबाईल, 5 टीव्ही, 4 होम थिएटर, एलईडी ट्यूब, फॅन असे 15 लाख 68 हजार, 534 रुपयांचे साहित्य चोरी करुन नेले होते. सकाळी जेव्हा या कंपनीचे मालक जय ढेबे यांच्या ही चोरी झालेली लक्षात आली तेव्हा त्यांनी तात्काळ साकीनाका पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि बातमीदारांच्या मदतीने अवघ्या दोन तासात इमरान आणि अक्षयला बेड्या ठोकल्या आणि सर्व चोरीला गेलेला मालही परत मिळवला आहे.
सोलापुरात उद्या 25 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शहर आणि जिल्ह्यातील टेस्टींग वाढविणार. शाळा-महाविद्यालय 7 मार्चपर्यंत बंद राहणार. 10 वी आणि 12 चे वर्ग मात्र सुरु राहणार. क्रिडांगणावर 7 मार्चपर्यंत कोणत्याही क्रिडा स्पर्धा भरवण्यास बंदी. लग्नसमारंभासाठी 50 लोकांची मर्यादा. कर्नाटक आणि इतर राज्यातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांची माहिती.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून बी. एड.चा पेपर रद्द. पुढील आदेशापर्यंत पेपर रद्द केल्याची माहिती. परीक्षेच्या एक तासापूर्वी मिळाली परीक्षा रद्दची सूचना. कोविडच्या अनुषंगाने पेपर रद्द करत असल्याचं स्पष्टीकरण. लांब अंतरावरून आलेल्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास. हिवाळी 2019 च्या पहिल्या सेमिस्टरचा आज दुपारी पेपर होता. एक पेपर झाला असून ऐन वेळेवर दुसरा पेपर रद्द झाल्यानं विद्यार्थी त्रस्त. पेपर रद्द झाल्यानं विद्यार्थ्यांत नाराजी.
मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांसाठी मोठी बातमी, येत्या काही महिन्यातच सुरू होणार मुंबई ते नवी मुंबई जलवाहतूक. मुंबईतील प्रिन्सेस डॉक ते बेलापूर अशी होणार जल वाहतूक. मुंबई ते बेलापूर सुरू झाल्यास 1 तासात मुंबई ते नवी मुंबई अंतर कापले जाईल, तसेच वाशी येथे देखील जेट्टी उभारून तिथे एक थांबा दिला जाईल. मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी एबीपी माझाला ही exclusive माहिती दिली आहे.
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील देगावच्या एका आदिवासी हॉस्टेल मधील 239 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालीय. बहुतांश कोरोना बाधित बाहेर जिल्ह्यातील आहे. या हॉस्टेलला एकूण 327 विद्यार्थ्यांची संख्या आहे. या ठिकाणी प्रशासनाने भेट देऊन अधिकची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान हे हॉस्टेल भावना पब्लिक स्कुल नावाने असून यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांचं आहे.
पालघर : तलासरीतील वेवजी येथील जंगलात झालेल्या नेव्ही अधिकारी सुरजकुमार दुबे यांच्या जळीतकांड प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. नेव्ही अधिकारी सुरजकुमार दुबे यांचं खंडणीसाठी अपहरण झालं नसून त्यांनी स्वतः हा बनाव केला असल्याचं प्राथमिक तपासात उघड झाल आहे. सुरजकुमार दुबे यांनी शेअर मार्केटमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली असून या गुंतवणुकीत त्यांच मोठं नुकसान झालं होतं. तसेच सुरजकुमार दुबे यांनी नातेवाईक आणि मित्रांकडून लाख रुपयांचं कर्जही घेतलं होतं. या प्रकरणात चेन्नई आणि तलासरी येथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून या सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुबे मुक्त विहार करत असल्याच समोर आलं आहे. तर तलासरी येथील एका पेट्रोल पंपवरून त्यांनी तीनशे रुपयांचं डिझेल बाटली खरेदी केल्याच उघड झालंय. मृत्युपूर्वी सुरज कुमार दुबे यांनी दिलेली संपूर्ण फिर्याद ही खोटी असून त्यांनी घेतलेले कर्ज आणि शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही बाब घरच्यांपासूनही लपवलं असल्याचं उघड झालं. त्यामुळे कर्जाची परतफेड करावयास लागू नये म्हणून सुरज कुमार दुबे यांनी हा बनाव केला असल्याची माहिती समोर येत आहे. या तपासासाठी जिल्ह्यातील तब्बल शंभर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दहा टीम वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या.
आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार याद्यांचे वितरण करण्यात आल्या नंतर त्यावर हरकती मागविण्यात आल्यात. या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्याची लेखी तक्रार
भाजपा आमदार गणेश नाईक यांनी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांना भेटून केली आहे. मतदान याद्यांमधील मतदाराचे नाव समावेश करण्यासाठी किंवा चुकीचे नाव काढून टाकण्यासाठी एका नावासाठी मनपा अधिकारी 1
हजार रूपये घेत असल्याचा गंभीर आरोप गणेश नाईकांनी केलाय. लाखो रूपये घेवून प्राभागामध्ये मतदारांच्या नावांचा घोळ अधिकारी करीत आहेत. या मतदार याद्यांमध्ये सुधारणा न झाल्यास महानगरपालिका मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात येतील असा थेट इशारा यावेळी आमदार गणेश नाईकांनी दिलाय.
वाढीव वीज बिलविरोधात मनसेचे धुळ्यात खळखट्याक आंदोलन, वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील अधीक्षक अभियंता यांच्या दालनात मनसेचं खुर्ची फेकत आंदोलन, अधीक्षक अभियंत्यांना फुटाणे देत केला निषेध
नांदेड:बिलोली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक 1 लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात,बियर बार कायम स्वरूपी वर्ग करण्यासाठी मागितली दोन लाख रुपयांची लाच.
सातारा पुसेगावच्या सेवागिरी शाळेतील आणखी 14 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
,
सेवागिरी विद्यालयातील एकूण 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
,
आठ दिवसापूर्वी या शाळेतील सहा विद्यार्थ्यांना लागण झाल्याचे झाले होते उघड
,
पालक वर्गात चिंतेचं वातावरण
विदर्भातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मराठवाड्यातील विदर्भालगत असणाऱ्या सीमा सील करण्यात आल्यात. नांदेड जिल्ह्या लगत असणाऱ्या यवतमाळ सीमेवर, माहूर सीमेवर व आंध्रप्रदेश,तेलंगाणा सीमेवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या आदेशावरून हे चेक पोस्ट बसवण्यात आलेत. विदर्भातून येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांची अँटिजेन टेस्ट करण्यासाठी विदर्भ सीमेवर ही तपासणी पथक तैनात करण्यात आली आहेत. नांदेड जिल्ह्याला लागून असणाऱ्या विदर्भात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत असून त्याचा संसर्ग जिल्ह्यातील नागरिकाला होऊ नये यासाठी विदर्भ सीमेवर अँटिजेन टेस्ट करूनच नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येतोय.त्यामुळे विदर्भातुन येणाऱ्या वाहन धारकांची कोरोना तपासणी केल्या शिवाय त्यांना प्रवेश देण्यात येत नाही. नांदेड जिल्ह्यातील यवतमाळ सीमेवर, माहूर येथे हे अँटिजेन तपासणी चेकपोस्ट सुरु करण्यात आलेत.त्याच प्रमाणे आंध्रप्रदेश,तेलंगाणा राज्यातून येणाऱ्या नागरिकांची ही तपासणी झाल्या शिवाय त्यांना प्रवेश देण्यात येत नाहीये.
विदर्भातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी विदर्भात जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व खाजगी व सार्वजनिक वाहतुकीला प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे एसटीच्या ही जवळपास पंधरा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. परभणीतून नागपूर अमरावती यवतमाळ अकोला आदी शहरांमध्ये जाणाऱ्या जवळपास पंधरा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. परभणी ते चंद्रपूर, परभणी ते नागपूर, परळी ते नागपूर, अंबाजोगाई ते नागपूर, बीड ते यवतमाळ,
आंबेजोगाई ते चंद्रपूर , लातूर ते चंद्रपूर,परभणी ते तळेगाव, परभणी ते वरुड, अंबाजोगाई ते अमरावती ,अमरावती ते परभणी, परभणी ते अकोला,पाथरी अकोला,धारूर ते अकोला, अकोला ते परभणी या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

परभणी ते चंद्रपूर, परभणी ते नागपूर, परळी ते नागपूर, अंबाजोगाई ते नागपूर, बीड ते यवतमाळ,
आंबेजोगाई ते चंद्रपूर , लातूर ते चंद्रपूर,परभणी ते तळेगाव, परभणी ते वरुड, अंबाजोगाई ते अमरावती ,अमरावती ते परभणी, परभणी ते अकोला,पाथरी अकोला,धारूर ते अकोला, अकोला ते परभणी या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत 1 कोटीची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. यापुढे स्थानिक विकास निधी अंतर्गत आमदारांना प्रतिवर्षी तीन कोटी रुपये मिळतील. या आधी 2011 - 12 पासून प्रतिवर्षी प्रत्येक आमदाराला दोन कोटींचा विकास निधी मिळतो. विधानपरिषदेचे 78 आणि विधानसभेचे 288 आमदार आहेत.
राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत 1 कोटीची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. यापुढे स्थानिक विकास निधी अंतर्गत आमदारांना प्रतिवर्षी तीन कोटी रुपये मिळतील. या आधी 2011 - 12 पासून प्रतिवर्षी प्रत्येक आमदाराला दोन कोटींचा विकास निधी मिळतो. विधानपरिषदेचे 78 आणि विधानसभेचे 288 आमदार आहेत.
मार्च-एप्रिलमध्ये महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू करण्याचा भाजपचा विचार, मात्र महाविकास आघाडी सरकारच महाराष्ट्राला पुढे नेईल - संजय राऊत
मार्च-एप्रिलमध्ये महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू करण्याचा भाजपचा विचार, मात्र महाविकास आघाडी सरकारच महाराष्ट्राला पुढे नेईल - संजय राऊत
औरंगाबाद सिडको बस स्थानकातून अकोला जाणाऱ्या दोन बस रद्द करण्यात आल्यात. विदर्भातील वाढता कोरोना पादुर्भाव पाहता एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे..
नाशिकच्या नविन आडगाव नाका परिसरातील व्यास रोडलाईन्सच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या ट्रक मधून तब्बल शंभर लिटर डिझेलची चोरी करण्यात आली आहे. काल पहाटेची ही घटनाआहे. कॅन सोबत घेऊन कार मधून चोरांची टोळी आली होती. पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरु आहे.
एका तडीपार गुंडाने शिवजयंतीच्या दिवशी शहरात प्रवेश करत हातात कोयता घेऊन नाचत दहशत निर्माण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुण्याच्या सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे येथील ही घटना आहे. रोशन लोखंडे असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. ...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोशन लोखंडे हा हातात कोयता घेऊन एका तरुणाच्या खांद्यावर नाचताना दिसत आहे. तर याच ग्रुपमध्ये नाचणाऱ्या अन्य एका तरुणाच्या हातात बंदूकही दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ कुणीतरी सोशल मीडियावर टाकल्याने हा प्रकार उघडकीस आला. या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंहगड रस्ता पोलिसांकडून मात्र अद्याप या प्रकरणी कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रासह पाच राज्यातून येणाऱ्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे अनिवार्य
कर्नाटक आणि महाराष्ट्रातील भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या चंदगड येथील श्री रवळनाथ देवालयाची 3 मार्च रोजी होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंदिराच्या ट्रस्टचे सेक्रेटरी मधुकर देसाई यांनी दिली आहे. 3 ते 8 मार्च श्री देव रवळनाथ यात्रा होणार होती पण जिल्हा प्रशासनाच्या आदेशामुळे वार्षिक कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आचरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांना यात्रोत्सव कालावधीत मंदिर आणि परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.मंदिरातील धार्मिक विधी मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.दरवर्षी श्री देव रवळनाथ यात्रेला कर्नाटक आणि महाराष्ट्रातून हजारो भाविक दररोज उपस्थिती दर्शवतात.पण यावर्षी मात्र भक्तांना यात्रोत्सवात सहभागी होता येणार नाही.

मास्क न वापरणाऱ्या 22 हजार 976 व्यक्तींकडून एका दिवसात 46 लाखांची दंड वसुली, बृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबई पोलीस दलाची आणि मध्य व पश्चिम रेल्वे धडक कारवाई, सार्वजनिक ठिकाणी 'मास्क' आवर्जून परिधान करण्याचे सातत्यपूर्ण आवाहन
सांगलीला लागून असलेल्या सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सांगली महापालिका क्षेत्रात आजपासून कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. आजपासून सांगली मनपा क्षेत्रात नो मास्क नो एन्ट्री. मास्क नसलेल्या ग्राहकाला दुकानात येऊ न देण्याच्या सक्त सूचना, तसे ग्राहक दिसल्यास दुकानदारावर होणार दंडाची करावाई होणार आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आदेश दिले आहे. सांगलीतील कालचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 16 आहे.

पार्श्वभूमी

मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये करण्यासाठी नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील, तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येतील याचे तत्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत. राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी आज वर्षा येथे मुख्यमंत्र्यांना भेटले त्यावेळी ते बोलत होते. कार्यालयीन वेळांची 10 ते 5 ही मानसिकता बदलण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीत बोलले होते, त्या अनुषंगाने महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्य संस्कृतीची सुरुवात करावी असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


संजय राठोड प्रकरणाचा फटका मुख्यमंत्री आणि सरकारच्या प्रतिमेला; शरद पवारांची नाराजी



गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्याच्या राजकारणात वादंग सुरु आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवी येथे दाखल झाले. यावेळी संजय राठोड यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. परंतु, आज पोहोरादेवी येथे संजय राठोड यांनी जे शक्तीप्रदर्शन केलं ते संजय राठोड यांना आवडलं नसल्याची माहिती मिळत आहे. संजय राठोड प्रकरणाचा फटका मुख्यमंत्री आणि सरकारच्या प्रतिमेला होत असल्याचं शरद पवार यांचं मत आहे. तसेच तपास पूर्ण होईपर्यंत वनमंत्री संजय राठोड यांनी पदापासून दूर राहावं, अशी शरद पवार यांची भूमिका असल्याची माहिती सुत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे.


बुलेट ट्रेनसाठी 53 हजार ऐवजी केवळ 22 हजार तिवरांची झाडं तोडणार, नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनची हायकोर्टात माहिती



केंद्र सरकारच्या मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमधील कांदळवनं तोडली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी प्रस्तावित 53 हजार 400 ऐवजी आता केवळ 21 हजार 997 झाडे तोडणार असल्याची माहिती मंगळवारी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आली. मुंबई ते अहमदाबाद या 508 किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला राज्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील 13 हेक्टर जागेवरील कांदळवनं तोडली जाणार आहेत. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाकडून ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पालघरमधील हजारो कांदळवनं तोडण्याची परवानगी यापूर्वीच मिळाली आहे. ही माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्यावतीनं मगंळवारी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला देण्यात आली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.