Breaking News LIVE | शेतकरी नेते राकेश टीकेत यवतमाळच्या महापंचायत मध्ये येणार नाहीत

Breaking News LIVE Updates, 19 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Feb 2021 11:40 PM
शेतकरी नेते राकेश टीकेत यवतमाळच्या महापंचायत मध्ये येणार नाही: किसान आघाडीचे संदीप गिड्डे यांची माहिती. राकेश टिकेत यांना कोणीतरी यवतमाळ पोलीस अधीक्षक असे बोलतो म्हणून सांगून कोरोना संसर्ग वाढतोय त्यामुळे आपण आल्यास 14 दिवस कोरोनटाईन राहावे लागेल आणि असं सांगितलं गेलं त्यामुळे राकेश टिकेत हे येणार नाही असे संदीप गिड्डे यांनी सांगितले.
गेल्या तीन दिवसापासून कल्याण-डोंबिवलीत करुणा चा आकडा वाढत असून आज 145 रुग्ण आढळून आले आहेत .काही महिन्यांपूर्वी हॉटस्पॉट ठरलेल्या कल्याण डोंबिवलीने आता कुठे मोकळा श्वास घेतला होता मात्र पुन्हा एकदा कोरोनाच संकट कल्याण-डोंबिवली वर घोंगावत आहे या पार्श्वभूमीवर महापालिका सतर्क झाले असून महापालिका व पोलिस प्रशासनातर्फे गर्दी न करण्याचा झ सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे, मास्क वापरण्याचे आवाहन केले जाते मात्र असे असले तरी राजकीय पदाधिकारी मात्र कोरोना नियमांचे सर्रास पायमल्ली करताना दिसत आहेत .दोन दोन दिवसापूर्वी भाजप कार्यकर्ते संदीप माळी यांच्या वाढदिवसाला हजारांची गर्दी जमली होती , याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने संदीप माळी यांच्यासह चार जणांविरोधात गुन्हे दाखल केले होते .या घटनेला 48 तास उलटत नाहीत तोच पुन्हा एकदा भाजपा नगरसेवक संदीप गायकर यांचे आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला शेकडो महिलांनी हजेरी लावल्याचे समोर आले आहे .हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आज पुन्हा एकदा या राजकीय नेत्यांना सामाजिक भान आहे की नाही असा सवाल उपस्थित झाला आहे .
लातूर जिल्ह्यात आज ४८ कोरोना रुग्णांची भर. यामध्ये मनपा हद्दीतील २० रुग्ण, जिल्ह्यातील इतर भागातील २८. आज बरे झालेले ३७ रुग्ण, आजचे मृत्यू : ००, मयतांचा आकडा ६९९.
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 1015 कोरोना रुग्णांची नोंद. तर 6 जणांचा मृत्यू. आज बऱ्याच दिवसांनी किंबहुना काही महिन्यांनी पुण्यातील कोरोना रुग्णांच्या एका दिवसातील संख्येने एक हजारांचा टप्पा ओलांडलाय.
एकीकडे सरकार आणि प्रशासन कोविड लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणत लसीकरण मोहीम आखत आहे. मात्र, दुसरीकडे ही लस घेतल्यानंतर देखील अनेकांना कोरोना होत असल्याचे समोर येत आहे. दहा दिवसांपूर्वी कोविड लस घेतलेल्या घाटकोपर पोलीस ठाण्याच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुरेश विष्णू ढोमे, शरद गुलाब तडवी, लक्ष्मण शिवले अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहे. हे तिघेही निगराणी पथकात कार्यरत आहेत. त्यांनी दहा दिवसांपूर्वी राजावाडी रुग्णालयात लसीकरण करून घेतले होते. मात्र, 17 आणि 18 रोजी हे तिन्हीजण कोरोना पोजिटिव्ह आढळले आहेत. यातील ढोमे हे डोंबिवली येथील खाजगी रुग्णालयात तर तडवी आणि शिवले यांच्यावर सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता लसीकरण केलेल्या पोलिसात देखील संभ्रम निर्माण झाला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी मंत्रालये आणि विभागांतील सर्व अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric vehicles) वापर अनिवार्य व्हायला हवा, असे म्हटले आहे.
परभणीतील पोलिस कर्मचार्या चा कोरोनाने मृत्यू. आजपर्यंत एकुण 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू.
परभणी पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या 51 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला असुन आजपर्यंत जिल्ह्यात एकुण 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी घेतलाय. परभणीच्या पुर्णा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले 51 वर्षीय पोलीस कर्मचारी सय्यद मोईन अली सय्यद यासीन अली यांना 1 फेब्रुवारी रोजी परभणीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली ज्यात ते कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.त्यांनतर त्यांना लगेचच शहरातील दुसर्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.तिथं त्यांच्यावर औषधोपचार सुरु असतांनाच प्रकृती खालावली.श्वाास घ्यावयास त्रास सुरु झाला.त्याक्षणी त्यांना परभणीतून औरंगाबादकडे हलविण्याच्या हालचाली सुरु झाल्या असतांनाच त्यांचे त्यांचे निधन झाले. या प्रकाराने पोलिस खात्यात मोठी अस्वस्थता पसरली आहे.
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा 'झुंड' चित्रपट 18 जूनला येणार.
गरज पडल्यास वनमंत्री संजय राठोड यांची चौकशी केली जाईल, असं पुणे पोलिसांनी सांगितले होतं. त्यानंतर मृत पूजा चव्हाणच्या नातेवाईकांनी पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलीस जे तपास करतायेत ते सत्य जगासमोर आणावे, पोलिसांवर कुठेतरी दबाव असेल तेव्हाच अरुण राठोडची माहिती समोर येत नाही, असा संशय व्यक्त करीत सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हे स्पष्ट दिसतंय, असे प्रशचिन्ह पूजाच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी उपस्थित केला आहे.

बुलढाणा : जिल्ह्यात आज सर्वाधिक 271 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. जिल्हावासियांमध्ये चिंतेचं वातावरण. आज विदर्भातुन सर्वात जास्त रुग्ण बुलढाण्यात. जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणात कोरोणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत असून कोरोणा रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत नाहीये ,त्यामुळे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पुन्हा जिल्ह्यात लॉकडाऊन होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आपल्या मुलीच्या विवाहानिमित्त ठेवलेला स्वागत समारंभ केला रद्द केलाय. 26 फेब्रुवारीला औरंगाबाद येथील हॉटेल अम्बेसिडर अजिंठा या ठिकाणी ठेवलेला रिसेप्शनचा सोहळा रद्द केला आहे. कोविडची स्थिती पाहता हा समारंभ रद्द करत असल्याचं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर लिहिलं आहे.
कोरोना काळात शासकीय नियमांचं उल्लंघन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना भोवलं. आज त्यांनी कुटासा या आपल्या मुळगावी शिवजयंतीनिमित्त काढली होती मिरवणूक. जमावबंदीचा आदेश मोडल्या प्रकरणी दहिहांडा पोलिसांनी केले गुन्हे दाखल. आमदार अमोल मिटकरी आणि ११ मुख्य कार्यकर्त्यांसह ४०० जणांवर गुन्हे दाखल.
कोरोना काळात शासकीय नियमांचं उल्लंघन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना भोवलं. आज त्यांनी कुटासा या आपल्या मुळगावी शिवजयंतीनिमित्त काढली होती मिरवणूक. जमावबंदीचा आदेश मोडल्या प्रकरणी दहिहांडा पोलिसांनी केले गुन्हे दाखल. आमदार अमोल मिटकरी आणि ११ मुख्य कार्यकर्त्यांसह ४०० जणांवर गुन्हे दाखल.
अहमदनगर : आमदार रोहित पवारांच पावसात भाषण. शिवजयंतीच्या कार्यक्रमात सुरू असलेल्या रिमझिम पावसात उपस्थितांना संबोधित केले. रोहित पवार यांच्या भाषणामुळे शरद पवार यांनी सभेमध्ये केलेल्या त्या ऐतिहासिक भाषणाची आठवण. शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमदार रोहित पवार आज जामखेडमध्ये आले होते. कार्यक्रमादरम्यान अचानक रिमझिम पावसाळा सुरुवात झाली. मात्र रोहित पवार यांनी आपले भाषण सुरू ठेवले.
इचलकरंजी शहरातील महावितरणचे कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडले. महावितरण विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातून मनसेचे खळखट्याक आंदोलन सुरू.
मुंबईत दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून लग्नाचे हॉल, हॉटेल्स, बाजार पेटा, गर्दीची ठिकाणं याठिकाणी धाड सत्र राबवण्यास सुरुवात केली आहे. आज अशाच प्रकारची कारवाई दादर परिसरातील एका मॉलमध्ये पाहिला मिळाली. दादर परिसरातील जी नॉर्थ विभागातील अधिकाऱ्यांनी स्वच्छता दूतांना सोबत घेत संयुक्तिकरित्या ही कारवाई केली. याबाबत बोलताना जी नॉर्थ विभागाचे कनिष्ठ अविकक्षक संतोष राऊत म्हणाले की, आम्ही जी नॉर्थ विभागात एकूण 4 पथकं तयार केली आहेत. या पथकांच्या माध्यमातून स्वतः जाऊन हॉटेल्स, मॉल्स, बाजारपेठा, गर्दीची ठिकाणं याठिकाणी जाऊन पाहणी करत आहोत आणि कारवाई देखील केली.
इचलकरंजी शहरातील महावितरणचे कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडले. व्यवसायिक, घरगुती लाईट बिल महावितरणने कट केल्याचा निषेध. मनसे कार्यकर्त्यांनी केली महावितरण कार्यालयाची तोडफोड. महावितरण विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातून मनसेचे खळखट्याक आंदोलन सुरू
यवतमाळ, अकोला, अमरावती इथे 50 टक्के पॅझिटीव्हीटी आढळून आली आहे. ग्रामीण, शहरे सर्वत्र प्रसार झाला आहे. त्यामुळे तातडीने सर्वसामान्यांसाठी लसीकरण सूरू करावे, अशी मागणी राज्य कोविड निवारण टिमचे तांत्रिक सल्लागार सुभाष साळुंके यांनी केलीय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये देऊळवाडा ते मालवण जेठी पर्यंत मोटारसायकल रॅली काढत निलेश राणे यांनी यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मालवण एसटी बसस्टँड पूर्वी पोलिसांनी निलेश राणे यांची रॅली रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर चर्चेतून ही रॅली शांततेत पुन्हा सुरू झाली. मात्र शिवजयंतीला तडजोड नाही. शिवजयंती हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणारच, निलेश राणे.
राज्यातील 101 फुट उंचीच्या शिवस्तंभाचे आ.धस यांच्या हस्ते ध्वजारोहन.300 किलो रांगोळीतून साकारलेली महाराजांची प्रतिकृती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आष्टी शहरात यावर्षी आगळीवेगळी शिवजयंती साजरी झाली. या निमित्ताने शहरातील छञपती शिवाजी महाराज चौक मिञ मंडळाच्या तसेच शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने 101 फुट उंच असणाऱ्या बहूधा महाराष्ट्रातील पहिल्या भगव्या शिवस्तंभाची उभारणी करण्यात आली.तब्बल 101 फुट उंचीचा हा ध्वज असून यासाठी 5 लाख 25 हजार इतका खर्च आलेला आहे.या स्तंभावर 14×20 फुट लांबीचा ध्वज बसविण्यात आला आहे.याचे ध्वजारोहन आ.सुरेश धस यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थीत होते.तर कु.आरती नवनाथ ससाणे या विद्यार्थीनीने 12×24 स्वे.फुट जागेमध्ये 300 किलो रांगोळीतून शिवाजी महाराजांची अश्वारुढ प्रतिकृती साकारलेली रांगोळी उपस्थीतांचे लक्ष वेधून घेत होती.
गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने गोंदियातील खासगी रुग्णालयात निधन झालं. बिसेन यांनी गोंदिया जिल्ह्यातील हजारो बेरोजगार तरुणांना विदेशात पाठवून नोकरी मिळवून दिली असून आजही शेकडो लोक विदेशात काम करत आहेत. त्यांचं 'सिल्ली माली' या जन्मगावाला पासपोस्ट व्हिलेज म्हणून गोंदिया जिल्ह्यात ओळखलं जातं. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल तसंच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत.

कोरोना प्रतिबंधासाठी अमरावती जिल्ह्यातील सर्व आस्थापना आणि दुकाने सोमवार ते शुक्रवार या काळात रात्री आठ वाजता बंद करण्याचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा व व्यवहार दर आठवड्यातील शनिवारी रात्री आठपासून सोमवारी सकाळी 8 पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश यापूर्वीच जारी आहे. आता सोमवार ते शुक्रवार दरम्यान रोज सर्व दुकाने रात्री आठला बंद होतील. त्यानुसार अमरावती शहर व ग्रामीण भागातील सर्व प्रकारचे बाजार, दुकाने, मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, चहा-नाश्ता उपाहारगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, पानटपरी, इतर वस्तूंची दुकाने, सिनेमागृहे, उद्याने, पर्यटनस्थळे रात्री आठला बंद होतील. या आदेशातून सर्व औषधे विक्री दुकाने, रुग्णालये, प्रसृतीगृहे, कदवाखाने, वैद्यक प्रयोगशाळा, रुग्णवाहिका आदी सेवांना वगळण्यात आले आहे.
बेळगाव पोलिसांनी अफिम या मादक पदार्थाचा वीस लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी तीन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. एकूण एक किलो पंधरा ग्रॅम इतके अफिम पोलिसांनी जप्त केले आहे. पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची वीस लाख रुपयांहून अधिक किंमत होते. सीईएन पोलीस स्थानकाचे अधिकारी बी. आर. गड्डेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ही कारवाई केली. राष्ट्रीय महामार्गावरील होनगा गावाजवळील राजस्थान धाब्याच्या पान दुकानात आणि बेळगावातील राणी चान्नमा नगर येथील एका घरावर धाड टाकून पोलिसांनी अफिम जप्त केले आहे. राजस्थान धाब्याचा पान दुकानदार बरकतखान विल्लाखन (वय 30 वर्षे) रा. जोगानत्ती, कल्मेश सुरजनराम बेनिवाल (वय 25 वर्षे) रा.हुबळी आणि सरवण उर्फ सावरा राम आसाराम बिष्णोई (वय 21 वर्षे) रा.चन्नमा नगर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आयुक्त डॉ.के.त्यागराजन, पोलीस उपायुक्त डॉ.विक्रम आमटे यांनी या प्रकरणाची पत्रकार परिषदेत माहिती दिली.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस.
गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान जिल्हा अध्यक्ष पंचम बिसेन यांचा हृदय विकाराच्या झटक्याने गोंदियातील खाजगी रुग्णालयात मृत्यू. बिसेन हे गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष होते. बिसेन यानी गोंदिया जिल्ह्यातील हजारो बेरोजगार तरुणांना विदेशात पाठवून नोकरी मिळवून दिली. आजही शेकडो लोक विदेशात काम करत आहेत. त्यांच्या जन्म गाव सिल्ली माली या गावाला पासपोस्ट व्हिलेज म्हणून गोंदिया जिल्ह्यात ओळखले जाते.
नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना कोरोनाची लागण,

दोन दिवसांपूर्वीच घेतली होती कोरोनाची लस, कुटुंबातील 3 जणांचे अहवाल निगेटिव्ह

विभागीय आयुक्त मात्र पॉझिटिव्ह
कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मृती दिनी आयोजित कन्हैया कुमार यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली,

उद्या कोल्हापुरातील दसरा चौकात होणार होती कन्हैया कुमार यांची सभा,

पोलीस प्रशासनाकडून दडपशाही सुरू असल्याचा कार्यकर्त्यांकडून आरोप,

जिल्हाधिकारी परवानगी देतात तर पोलीस का देत नाहीत असा सवाल केला जातोय,
नांदेड जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांना मोठा फटका बसलाय. तर मध्यरात्री पासून जिल्हयात सर्वत्र विजांच्या गडगडाटा सह वादळी वारे आणि पाऊस सुरू झालाय .मध्यरात्री पासून सुरू असलेल्या पावसाचा जोर मात्र सकाळ झाली तरी ,कमी झाला नाहीय .त्यामुळे पावसाची चांगलीच रिपरिप सुरुय.या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहु, केळी, भुईमूग,हरभरा,ज्वारीचे मोठे नुकसान, होण्याची शक्यता आहे.गेल्या दोन दिवसापासून चालू असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांत मात्र चिंतेचे वातावरण आहे.
नांदेड जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांना मोठा फटका बसलाय. तर मध्यरात्री पासून जिल्हयात सर्वत्र विजांच्या गडगडाटा सह वादळी वारे आणि पाऊस सुरू झालाय .मध्यरात्री पासून सुरू असलेल्या पावसाचा जोर मात्र सकाळ झाली तरी ,कमी झाला नाहीय .त्यामुळे पावसाची चांगलीच रिपरिप सुरुय.या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहु, केळी, भुईमूग,हरभरा,ज्वारीचे मोठे नुकसान, होण्याची शक्यता आहे.गेल्या दोन दिवसापासून चालू असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांत मात्र चिंतेचे वातावरण आहे.
राज्यमंत्री बच्चू कडूंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, ट्वीट करुन दिली माहिती, त्यांनी म्हटलंय की, माझी कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बीएमसी अधिकाऱ्यांसोबत शिवाजी पार्क नूतनीकरणच्या आढावा घेतला. बीएमसीकडून शिवाजी पार्क नूतनीकरणचे काम सुरू आहे. पार्कात मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य असल्याने प्रदूषण कमी व्हावे यासाठी शिवाजी पार्क नूतनीकरणचा प्रकल्प राबवाला जातो...मात्र याआधी मनसेने रेन वॉटर हारवेस्टिंग व इतर प्रकल्पाची कामे करून शिवाजी पार्कवरील धूळ कमी करण्यासाठीचे काम केले असताना त्या आधी झालेल्या कामाची स्थिती व त्याबद्दलची सुद्धा माहिती यावेळी घेतली गेली. नूतनीकरण करत असताना बीएमसी मनसे ने केलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कामाचे काय झाले ? बीएमसीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रदूषण वाढत असून यामध्ये राजकारण न करता शिवाजी पार्क वर हिरवळ व्हावी व या ठिकणाचा त्रास कमी व्हावा यासाठी हा आढावा असल्याच, मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितलं

भंडारा आग प्रकरण : दोषी डॉक्टरांना सोडून कंत्राटी नर्सवर 39 दिवसानंतर गुन्हा दाखल, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 8 जानेवारीच्या मध्यरात्री नवजात मुलांच्या अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या संदर्भात चौकशी समिती नेमली असून जिल्हा शल्य चिकित्सकांसह 7 लोकांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. या संदर्भात 39 दिवसानंतर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यात दोन कंत्राटी कर्मचारी स्मिता आंबीलढुके आणि शुभांगी साठवणे यांचा समावेश असून दोषी डॉक्टरांना मात्र वाचविण्यात आल्याचा आरोप पालकांकडून होत आहे .

परभणी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. मध्यरात्री सर्वत्र विजांच्या गडगडाटा सह वादळी वारे आणि पाऊस झालाय तर पहाटे पावसाचा जोर कमी होऊन पावसाची चांगलीच रिपरिप सुरुय. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहु, हरभरा,ज्वारीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

भंडारा आग प्रकरण : दोषी डॉक्टरांना सोडून कंत्राटी नर्सवर 39 दिवसानंतर गुन्हा दाखल, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 8 जानेवारीच्या मध्यरात्री नवजात मुलांच्या अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या संदर्भात चौकशी समिती नेमली असून जिल्हा शल्य चिकित्सकांसह 7 लोकांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. या संदर्भात 39 दिवसानंतर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यात दोन कंत्राटी कर्मचारी स्मिता आंबीलढुके आणि शुभांगी साठवणे यांचा समावेश असून दोषी डॉक्टरांना मात्र वाचविण्यात आल्याचा आरोप पालकांकडून होत आहे .

पार्श्वभूमी

Rajesh Tope | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आणि लक्षणं आढळल्यास तत्काळ चाचणी करुन घेण्याचं आवाहनही केलं आहे.


 


भारतीय संस्कृतीनुसार स्त्रीच्या कमरेखाली हात लावणं म्हणजे तिच्या शालीनतेला हात घालणं : मुंबई सत्र न्यायालय


 


मुंबई : भारतीय संस्कृतीमध्ये एका स्त्रीच्या कमरेखाली हात लावणं म्हणजे तिच्या शालिनतेला हात घालणंच. गुगलमध्ये जरी त्याचा खाजगी भाग असा उल्लेख नसला तरी इथं तो गुन्हाच आहे, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो कोर्टानं नोंदवलं आहे. न्यायधीश अभिजीत नांदगावकर यांनी एका प्रकरणात 10 वर्षीय मुलीच्या पार्श्वभागाला स्पर्श केल्याच्या आरोपाखाली एका 22 वर्षीय आरोपीला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपीनं लैंगिक भावना मनात ठेवूनच या मुलीच्या पार्श्वभागाला हात लावल्याचं इथं सिद्ध होत आहे, असंही न्यायालयानं आपल्या निकालात नमूद केलं आहे.


 


शिवजयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या रोषणाई वरून खा. संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याला फटकारलं
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रायगडावर करण्यात आलेल्या रोषणाई वरून खासदार संभाजीराजे यांनी ट्विट करून पुरातत्व खात्याला फटकारले आहे. या संदर्भात खासदार संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत या गोष्टीचा निषेध केला आहे. दरम्यान, या विषयावर सविस्तर भूमिका मांडण्यासाठी उद्या (19 फेब्रुवारी) रोजी शिवनेरी किल्ल्यावर पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे पत्रकार बांधवांशी संवाद साधणार आहेत. "भारतीय पुरातत्त्व विभागाने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो", अशा भावना खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केल्या आहेत.


 


राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण : उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 65 संचालकांना दिलासा
मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 65 संचालकांना दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाच्या अहवालामध्ये अजित पवार यांच्यासह 65 संचालकांना क्लिन चिटस देण्यात आली आहे. यापूर्वी एसआयटीनेही अजित पवार यांच्यासह राज्य सहकारी बँकेवरील 75 जणांना क्लीन चीट दिली होती. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलासा मिळाला आहे. राज्याच्या सहकार विभागाने राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. या समितीने आपला अहवाल सहकार आयुक्तांकडे सादर केला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चौकशी समितीच्या अहवालात अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह तत्कालीन 65 संचालकांना दिलासा देण्यात आलेला आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, आनंदराव आडसूळ आदिंच्या नावाचा समावेश करण्यात आला होता.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.