Breaking News LIVE : पुण्यात आज दिवसभरात 7,888 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
Breaking News LIVE Updates, 14 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पुण्यात आज दिवसभरात 7888 नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर 94 बाधितांचा मृत्यू
राज्यात आज नवीन 58,952 कोरोनाबाधितांची नोंद, तर 39,624 रुग्णांना डिस्चार्ज
अमरावती शहरात आणि जिल्ह्यात विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू...
बीड जिल्ह्यामध्ये सायंकाळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील संदीप पवार यांच्या शेतात असा गरांचा सडा पडला होता..यात त्यांच्या पेरूच्या बागेच आणि मिरचीच्या पिकाच मोठं नुकसान झालं आहे..
त्याच बरोबर या परिसरातील शेतकऱ्यांचं देखील मोठ नुकसान झालं आहे. काढणीला आलेले डाळिंब, टरबूज, खरबूज, भाजीपाला आणि पेरूच्या बागांना या गारपिटीचा मोठा तडाखा बसला आहे. लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आलेल्या फळबाग शेतकऱ्यांचं या गारपिटीमुळे आता पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे
आमच्यासाठी दोन दिवसात पॅकेज जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरू,
महाराष्ट्रातील नाभिक समाजाने दिला राज्य सरकारला इशारा,
नियम घालून द्या त्यानुसार दुकानं चालू ठेवतो,
हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ येईल,
सीबीएसई बोर्डाची दहावी परीक्षा रद्द करण्यात आली असून बारावीची परीक्षा ४ मे ते १४ जून दरम्यान होणारी बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन विमानाने आणण्याच्या विधानावर चंद्रकांत पाटलांची टीका. उद्धव ठाकरे एका पक्षाचे प्रमुख म्हणून जन्माला आले मात्र पवार साहेबांनी त्यांना आपल्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री केलं. त्यामुळे त्यांना।खूपशा गोष्टी माहिती नाहीत. उद्धव ठाकरे यांनी स्वता पीपीई किट घालून फिल्ड वर उतरल्याशिवाय त्यांना प्रश्न कळणार नाहीत. 2 तारखेनंतर सत्तेला सुरुंग नक्की लागेल
चंद्रपूर : रेमडेसिवर इंजेक्शनसाठी नागरिकांच्या रांगा, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त, इंजेक्शन साठी 4 ते 5 तास नातेवाईकांना रांगेत करावी लागतेय प्रतीक्षा, केंद्रीकृत व्यवस्थेनंतरही रुग्ण आणि नातेवाईकांचे हाल
शहरात जमावबंदीचे आदेश लागू असतानाच मनपा प्रशासनाने प्रशिक्षणासाठी एकाच वेळी शेकडो शिक्षकांना बोलावले आहे. कोरोनाबधितांची संख्या वाढत आहे, रुग्णांना बेड मिळत नसल्याने प्रशासनाने सेन्ट्रल बेड रिझर्वेशन सिस्टिम तयार केलीय, यावर देखरेखीसाठी प्रत्येक रुग्णलयात एका शिक्षकाची नेमणूक केली जाणार आहे. त्यांचे प्रशिक्षण आज आयोजित केले होते. पण या प्रशिक्षणाला शेकडो शिक्षक उपस्थित होते, सोशल डिस्टन्सिंग चा फज्जा उडाला होता, विशेष म्हणजे ज्या महिला शिक्षिका गरोदर आहेत, 50 वर्षावरच्या आहेत, जे सेवा निवृत्त किंवा मयत आहेत त्याच्या नावानेही प्रशिक्षणासाठी हजर राहण्याची नोटीस पाठविण्यात आलीय, एकूणच भोंगळ कारभारावर शिक्षकांनी आक्षेप घेतल्याने उद्या पुन्हा बैठक बोलविण्यात आलीय.
पुणे जिल्ह्यातील उत्तर भागात बिबट्यांचा वावर पुन्हा एकदा वाढलाय. जुन्नर तालुक्यात काल ज्या विहिरीत बिबट्या पडला, त्याच विहिरीत आज आणखी एक बिबट्या आढळला. आजच्या बिबट्याचा मात्र दुर्दैवाने मृत्यू झालाय. कालच्या बिबट्याचा वनविभागाने स्थानिकांच्या मदतीने जीव वाचवला होता. उष्णतेमुळे हे बिबटे पाण्याच्या आणि भक्षाच्या शोधात वावरू लागलेत. ज्या विहिरींना कठडे नाहीत त्या विहिरीत हे बिबटे पडताना दिसतायेत.
"मी गेल्या अनेक दिवसांपासून सीबीआयईच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करत आहे. मी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भयानक स्थितीत कोणतीही चर्चा मुंलांच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या चर्चेशिवाय अपूर्ण आहे. पंतप्रधान मोदीजी आणि शिक्षणमंत्रीजी विद्यार्थ्यांच्या मनातील गोष्ट ऐका.", असं ट्वीट प्रियंका गांधी यांनी केलं आहे.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती स्मारक समितीच्या वतीने सध्या पद्धतीने साजरी केली आहे. येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई आणि सचिव सुधीर फूलझेले यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देण्यात आली. तसेच स्तुपातील अस्थिकलशाला देखील अभिवादन करण्यात आले. आणि बुद्ध वंदना घेण्यात आली. स्मारक समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवत हा कार्यक्रम पार पडला. बाहेरून येणाऱ्या अनुयायांना यावेळेला प्रवेश नाकारण्यात आला आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्प 15 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलाय. "ब्रेक द चेन" अंतर्गत राज्य सरकार ने जारी केलेले दिशानिर्देशांचे पालन करण्यासाठी ताडोबा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या कालावधी दरम्यान ताडोबाची सफारी बुकिंग केलेल्या सर्व पर्यटकांना त्यांचे पैसे त्यांच्या अकाऊंट मध्ये परत केले जाणार आहेत.
गावी परतण्यासाठी परप्रांतीयांची कुर्ला टर्मिनस येथे गर्दी. मुख्यमंत्र्यांनी संचारबंदीची घोषणा केल्यानंतर रेल्वे स्थानकावर तोबा गर्दी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले. त्यांच्यासोबत दोन व्यक्ती असून त्यापैकी एक वकील असल्याचं कळतं. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी सीबीआय आज अनिल देशमुख यांची चौकशी करणार आहेत. 15 दिवसात प्राथमिक चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने सीबीआयला दिले आहेत.
साताऱ्याच्या कराडमध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कार्वे नाका इथे ही घटना घडली. घरातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. तर संबंधित 36 वर्षीय तरुणालाही कोरोनाची लक्षणे दिसू लागली होती. कोरोनाची लक्षणे असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर या तरुणाने घराबाहेर झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आत्महत्या केलेल्या तरुण हा मजूर होता.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा येथे दोन ट्रक मध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. जखमीला कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून कासा पोलीस घटनास्थळी दाखल करण्यात आलंय. सळई भरलेल्या ट्रकने दुसऱ्या उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात एका ट्रकचा चक्काचूर झाला असून दुसऱ्या ट्रकची केबिन पूर्ण निखळून जाऊन सळई बाहेर निघाल्या आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आज रात्री 8 पासून कलम 144 लागू करण्यात आलं आहे. पुढील 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी असणार आहे. अशातच लग्न समारंभासाठीही राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 50 नव्हे, तर आता 25 जणांच्या उपस्थितीत लग्न उरकावं लागणार आहे.
रुग्णाचा मृत्यू झाल्याचं सांगितल्यानंतर रुग्णाच्या नातलगाने डॉक्टरला थापड मारल्याची घटना वर्ध्याच्या हिंगणघाट इथे घडली आहे. हिंगणघाटचे डॉक्टर निर्मेश कोठारी यांच्या रुग्णालयात एका रुग्णाला उपचारासाठी आणलं होतं. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता रुग्णाचा मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं. यावेळी कागदपत्रांवरुन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून त्याचा मृत्यू झाल्याचं सांगताच, रुग्णाच्या एका नातवाईकाने डॉक्टरांना थापड मारल्या. डॉक्टरांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मारहाण करणाऱ्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेचा डॉक्टरांनी निषेध नोंदवला आहे.
पार्श्वभूमी
राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून 144 कलम लागू, पुढचे 15 दिवस संचारबंदी
राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. याच पार्श्वूभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे आहे. राज्यात आज रात्री 8 वाजेपासून 144 कलम लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आहे. आवश्यक कामाशिवाय कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. पुढील 15 दिवसांसाठी ही संचारबंदी लागू असणार आहे. मंगळवेढा- पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे मतदान झाल्यावर निर्बंध लागू होतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
संचारबंदीच्या काळात आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील. जनावरांचे दवाखाने सुरु राहतील. पावसाळी पूर्व कामं सर्व सूरू राहतील. हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहणार, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध लावताना जनतेच्या तोंडाला पाने पुसली : चंद्रकांत पाटील
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात आज रात्री 8 पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलीय या निर्णयावर भाजप नेते चंद्रकांता पाटील यांनी केली आहे. राज्यात पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
राज्यात निर्बंधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले. पण त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. असं ते म्हणाले.
परदेशात आपत्कालीन वापरात असलेल्या लसींना भारतात मंजुरी मिळणार
कोरोनाविरूद्धच्या लढ्यात भारत परदेशात बनवलेल्या आपत्कालीन मंजुरी मिळालेल्या लसींच्या वापरास मान्यता देण्याची शक्यता आहे. लसीकरण गतिमान करण्यासाठी नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑफ वॅक्सिन अॅडमिनिस्टेशन फॉर कोविड 19 (NEGVAC) ने सरकारला हा प्रस्ताव दिला आहे. परदेशात निर्माण झालेल्या विविध लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. अशा लसी भारतात आयात केल्या पाहिजेत, असा प्रस्ताव NEGVAC केला, जो भारत सरकारने मान्य केला आहे.
NEGVAC च्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, USFDA, EMA, UK MHRA, PMDA, JAPAN यांनी आपत्कालीन मंजुरी दिलेल्या लसी आणि WHO च्या यादीत सामील असलेल्या लसींना भारतात आपत्कालीन वापरास मान्यता द्यावी. NEGVAC चा हा प्रस्ताव भारत सरकारने मान्य केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -