Breaking News LIVE : मुंबई पोलीस आयुक्तांच्या अहवालानंतर परमबीर सिंह यांची चौकशी करण्याचे सरकारचे‌ आदेश

Breaking News LIVE Updates, 10 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Apr 2021 06:42 AM
बुलडाणा : खामगाव येथील आठवड़ी बाजार भागात भीषण आग

बुलडाणा : खामगाव येथील आठवड़ी बाजार भागात भीषण आग. साडेसात वाजताच्या सुमारास लागली आग. आगीत पाच ते सहा दुकाने जळून खाक. आगीवार अद्याप नियंत्रण नाही, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल. 

मुंबई पोलीस आयुक्तांच्या अहवालानंतर परमवीर यांच्या‌ चौकशी करण्याचे सरकारचे‌ आदेश


मुंबई पोलीस आयुक्तांच्या अहवालानंतर परमवीर यांच्या‌ चौकशी करण्याचे सरकारचे‌ आदेश,


संजय‌ पांडे यांना दिले प्राथमिक‌‌ चौकशीचे‌ आदेश,


परमवीर सिंग‌ दोषी असल्यास‌ होऊ शकते‌ सरकारकडून कारवाई ,


30 मार्चला मुंबई पोलीसांनी अहवाल दिल्यानंतर 1 एप्रिलला चौकशीबाबत‌ निघाले आदेश ,


मुंबई पोलिस आयुक्तांच्या‌ अहवालात परमबीर सिंग यांच्यावर ठेवण्यात आलाय ठपका

राज ठाकरे यांच्यावर आज लीलावती रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया

राज ठाकरे यांच्यावर आज लीलावती रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया.  काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांना टेनिस खेळताना पाठीला झाली होती दुखापत. त्यामुळे पाठीच्या मसल्स टिशूमध्ये मध्ये रक्त जमा झालं होतं. त्यामुळे होणारा दबाव कमी करण्यासाठी हॅमेटोमा ड्रेनेजची छोटी शस्त्रक्रिया केली.

सर्वांच्या साथीची गरज, मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना आवाहन

Maharashtra Lockdown : एकमुखानं निर्णय घेऊन सर्वांनी जनजागृती केली पाहिजे. सर्वांच्या साथीची गरज, मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना आवाहन

आम्ही सहकार्य आम्ही करू पण त्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या- देवेंद्र फडणवीस

आम्ही राजकारण बंद करतो पण तुमच्या मंत्र्यांना आणि सहकाऱ्यांनाही समज द्या, सहकार्य आम्ही करू पण त्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या- देवेंद्र फडणवीस यांची मागणी

कडक लॉकडाऊनची गरज, नाहीतर 15 एप्रिलनंतर रुग्णांची स्थिती भीषण होईल : सीताराम कुंटे  

Maharashtra Lockdown : कडक लॉकडाऊनची गरज, नाहीतर 15 एप्रिलनंतर रुग्णांची स्थिती भीषण होईल : सीताराम कुंटे  

मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक सुरु

मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक सुरु , मुख्यमंत्री ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, सीताराम कुंटे बैठकीला हजर

रेमडेसिवीर पाठोपाठ नाशकात व्हेंटिलेटरचा तुटवडा

रेमडेसिवीर पाठोपाठ नाशकात व्हेंटिलेटरचा तुटवडा,


नाशिक शहरातील व्हेंटिलेटर बेड फुल, 

आता शहरात एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही,


रोज ऑक्सिजन बेड उपलब्ध करूनही बेडची जाणवतेय कमतरता

पुण्यातील कौन्सिल हॉलला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित कोरोना आढावा बैठक

पुण्यातील कौन्सिल हॉलला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित कोरोना आढावा बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे देखील उपस्थित. पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू झालीय.

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रावरील लस संपली

जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रावरील लस संपली आहे. 178 केंद्रावर लस दिली जात होती. नवीन लस साठी हा मंगळवारी 13 एप्रिल 2021 किंवा बुधवार 14 ला 2021 रोजी पुणे येथून अकोला येथे आल्यावर तो त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याला मिळणार आहे. आज कुठलीही कोरोना प्रतिबंधित लस जिल्ह्यात आली नाही 
नव्याने लस भेटत नाही तो पर्यंत जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण साठी होणार नाही. जिल्ह्यात 45 वर्षावरील नागरिकांसाठी 9 लाख लस साठा द्यावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाकडे केली आहे

मुंबईमध्ये लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांचं महत्त्वाचं पाऊल

रुग्णालयात जास्तीच्या ऑक्सिजन बेडची तरतूद सुरु. ज्याला गरज आहे, त्यांना बेड मिळालेच पाहिजेत या हेतूनं बॉम्बे हॉस्पिटलला दिली भेट 

पिंपरी चिंचवडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार, चौघांना अटक

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असतानाच पिंपरी चिंचवड येथे या औषधाचा काळा बाजार सुरु असल्याची बाब उघड झाली. या ठिकाणी 4800 रुपयांच्या इंजेक्शनची विक्री 11 हजार रुपयांना होत असल्याचं निदर्शनास येताच चौघांना अटक करण्यात आली. 

योग्य नियोजन करून येत्या दोन दिवसात प्रत्येक रुग्णाला रेमडेसिवीर उपलबध करुन देण्याचा सरकारचा प्रयत्न

रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा राज्य भरात सुरू आहे. यावर उपाययोजना लवकरच शासनाकडून केल्या जात आहेत. येत्या दोन दिवसांत रेमडेसिवीरचे योग्य नियोजन करून प्रत्येक रुग्णाला वेळेवर रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली. सोबतच देशात चार कंपन्या रेमडेसिवीरची निर्मिती करतात. त्या कंपन्यांशी देखील शासनाची बोलणं सुरू असून लवकरच योग्य असं नियोजन करून येत्या दोन दिवसांत तुटवडा कमी केला जाईल असंही ते म्हणाले.

पालघर जिल्ह्यात कोरोना लसीच्या अभावी लसीकरण केंद्रं बंद

पालघर जिल्ह्यात लसींचा साठा पूर्णपणे संपल्याने सर्व लसीकरण केंद्र बंद असून लसीकरण केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळतो.जिल्ह्यात एकूण 72 लसीकरण केंद्र आहेत

पालघर जिल्ह्यातही दोन दिवसाच्या टाळेबंदीची काटेकोर अंमलबजावणी

पालघर जिल्ह्यातही दोन दिवसाच्या टाळेबंदीची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत आहे .  पालघर जिल्ह्यातील पालघर , बोईसर , डहाणू सारख्या मोठ्या शहरात सध्या बाजारपेठा कडकडीत बंद असून ठिकाणी तपासणी नाक्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .  त्यामुळे सध्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून ठराविक येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे .  तसंच दोन दिवसाच्या टाळेबंदीत नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील  प्रशासनामार्फत करण्यात येत आहे

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडून मुंबईतील लॉकडाऊनची पाहणी

राज्यासह मुंबईतही लागू असणाऱ्या लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी खुद्द रस्त्यावर येत परिस्थितीचा आढावा घेतला. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीमध्ये कोरोनाच्या विषयावर बैठक सुरू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीमध्ये कोरोनाच्या विषयावर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसमवेत  बैठक सुरू आहे. बारामतीतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे सीईओ, प्रांत, अपर पोलीस अधीक्षक, नगराध्यक्षा हे या बैठकीला उपस्थित आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा हा वाढताना दिसत आहे सोबतच रेमडीसीवरचा देखील तुटवडा आहे. त्याच अनुषंगाने ही बैठक सुरू आहे.

बिल न भरल्याने तीन दिवस रुग्ण उपचाराविना, नाशिकमधील खासगी रुग्णालयातील प्रकार

नाशिक शहरात एकीकडे रुग्णांना बेड मिळत नाही आणि दुसरीकडे बिल भरले नाही म्हणून रुग्णांचा डिस्चार्ज रोखून धरला जात आहे. जळगावहून आलेल्या एका वृद्धावर नाशिकच्या व्होकार्ट खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सुरुवातीला 50 हजार अनामत रकमेसह पाच लाख रुपयांचे बिल भरुनही सव्वा लाख रुपयांच्या बिलासाठी तीन दिवस रुग्णाला उपचाराविनाचा रुग्णालयात डांबून ठेवले. अखेर गिरीश महाजन यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर भाजप नगरसेवक मुकेश शहाणे आणि महापालिकाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी रुग्णालयात जाऊन धाव घेतली असता रुग्णाला रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र या स्वरूपाच्या तक्रारी शहरातील इतर हॉस्पिटलमधून येत असून प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे, दरम्यान या प्रकरणी रुग्णालय व्यवस्थापनाकडून कोणीही बोलायला तयार नाही.

परभणीत एकच दिवस पुरेल एवढाच लस साठा शिल्लक, आज 45 ठिकाणी लसीकरण होणार,12 ठिकाणचे रद्द 

परभणी जिल्ह्यात एक दिवस पुरेल एवढाच लस साठा शिल्लक राहिला असून त्यामुळे आज बारा लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद करण्याची वेळ आली आहे तर 45 ठिकाणी लस उद्या देण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 4 हजार 850 डोसेस आजपर्यंत मिळाले होते, यातील 95 हजार पेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकुण 57 केंद्रावर लसीकरण केले जात आहे. सध्या 45 केंद्रावर उद्या पुरेल एवढा लस साठा शिल्लक असुन आज 12 केंद्रवरील लसीकरण बंद असणार आहे. रविवारी जिल्ह्यासाठीचा नवीन लस साठा उपलब्ध होण्याची शक्यता असल्याची माहिती लसीकरण प्रमुख डॉ. रावजी सोनवणे यांनी दिलीय.

सांगली जिल्ह्याला लसीचे 66 हजार डोस उपलब्ध

सांगली जिल्ह्यासाठी लसीकरणाच्या बाबतीत आनंदाची बातमी आली असून आज पहाटे 66 हजार कोरोनाचे डोस उपलब्ध झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील लसीकरण मोहीम आज पुन्हा काही वेळात होणार सुरू होणार आहे. गेल्या दोन दिवसापासून लस नसल्याने जिल्ह्यातील लसीकरण मोहीम थांबली होती.

ब्रेक द चेन मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारावर हल्ल्याचा प्रयत्न, पाच जणांवर गुन्हा

बुलढाण्यात 'ब्रेक द चेन' मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी गेलेल्या तहसीलदाराला घेराव घालून हल्ल्याचा करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मोताळा इथे ही घटना घडली होती. मोताळा आठवडी बजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी हटवण्यासाठी तहसीलदार समाधान सोनावणे गेले होते. त्यावेळी घेराव घालून त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. यानंतर नगरपंचयतीच्या तक्रारीवरुन पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देगलूर बिलोली मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे दुःखद निधन.

सर्वसामान्य काँग्रेसचे कार्यकर्ते ते देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार अशी ओळख असणारे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे आज मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल मध्ये वयाच्या 63 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
17मार्च रोजी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी नांदेड हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार घेतला माञ त्यांची प्रकृती खुपच खालावली जात असल्याने त्यांना 20मार्च बॉम्बे  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.तेथिल उपचाराने कोरोनामुक्त झाले परंतु प्रखर औषधीमुळे त्यांचे शरीर साथ देत नव्हते,यात फफ्फुसासह त्यांचे दोन्ही किडण्या निकामी झाले.
त्यांना 8 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान इक्मो मशीन लावण्यात आले.तरिहि त्यांची बॉडी साथ दिली नसल्याने त्यांने 9एप्रिल रोजी सायंकाळी  निधन झाले.

IPS संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार

वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांना महाराष्ट्रच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. आतापर्यंत हा कार्यभार अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे होता. साईड पोस्टिंगमुळे संजय पांडे नाराज होते. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठकही झाली होती. तसंच संजय पांडे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं होतं. अखेर महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी (9 एप्रिल) आदेश मंजूर करत राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार संजय पांडे यांच्याकडे सोपवला. अतिशय शिस्तप्रिय, स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी अशी संजय पांडे यांची ओळख आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कोरोनाची लक्षणे सामान्य आहेत, परंतु खबरदारी म्हणून नागपूरच्या किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरएसएसच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली.

राज्यात विकेंड लॉकडाऊन सुरु

राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या अतिशय महत्त्वाचे निर्णय शासनाकडून घेतले जात आहेत. ज्याअंतर्गत शुक्रवारी रात्रीपासून राज्यात विकेंड लॉकडाऊन सुरु झाला आहे. 

पार्श्वभूमी

राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या अतिशय महत्त्वाचे निर्णय शासनाकडून घेतले जात आहेत. ज्याअंतर्गत शुक्रवारी रात्रीपासून राज्यात विकेंड लॉकडाऊन सुरु झाला. 


राज्यात शुक्रवारी रात्रीपासून विकेंड लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?
कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात आज रात्रीपासून विकेंड लॉकडाऊन लागू केला जाणार आहे. शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत दोन दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याअंतर्गत जीवनावश्यक गोष्टींची दुकानं सुरु राहणार असून, सुपरमार्केट मात्र बंद असणार आहेत. तर, कोणालाही कारणाशिवाय प्रवासाची मुभा नसेल. 


नागपुरातील खाजगी रुग्णालयात भीषण आग, तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
नागपुरात वाडी परिसरातील वेलट्रीट रुग्णालयात आज संध्याकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली. वेलट्रीट रुग्णालयात लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर ही आग लागली. आग लागली त्या वेळेला रुग्णालयात अनेक रुग्ण उपचार घेत होते. अनेक जणांना सुरक्षित सुरक्षित बाहेर हलवल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिली होती.


सरकारकडून राज्यभरातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा 
आपत्ती व्यवस्थापन, मदत तथा पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनी नवीन सुधारणांचे आदेश काढले आहे. या आदेशानुसार, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नाईलाजास्तव राज्य शासनाला ‘ब्रेक द चेन’ घोषित करून काही निर्बंध लावावे लागले. यामध्ये कोरोना लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले. तसेच त्याची वैधता पंधरा दिवस ठरविण्यात आली. आता यात सुधारणा करण्यात आली असून दि. 10 एप्रिलपासून आरटीपीसीआर चाचणीला पर्याय म्हणून रॅपिड टेस्ट चाचणी ग्राह्य धरण्यात येईल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.