Breaking News LIVE : केंद्र सरकारला सामान्य लोकांविषयी आस्था नाही : शरद पवार

Breaking News LIVE Updates, 16 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 16 Oct 2021 03:55 PM
बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात

बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात. शेगाव, संग्रामपूर, मोताळा, लोणार व मेहकर तालुक्यात परतीच्या पावसाचं जोरदार आगमन. शेतकऱ्यांची काढणीला आलेली पीक वाचविण्यासाठी तारांबळ.

जीएसटीची रक्कम मात्र केंद्राने थकवून ठेवली. ही बाब योग्य नाही - शरद पवार

तीन हजार कोटींचे देणे आहे हे खरे आहे. चौदाशे कोटी देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली आहे. कोळशाची किंमत द्यायला दहा ते बारा दिवस उशीर झाला तर राज्य सरकार बाबत ओरडत आहेत. पण दुसरीकडे जीएसटीची रक्कम मात्र केंद्राने थकवून ठेवली. ही बाब योग्य नाही आणि दुर्दैवाने हे घडतंय.

केंद्र सरकारला सामान्य लोकांविषयी आस्था नाही : शरद पवार

केंद्र सरकारला सामान्य लोकांविषयी आस्था नाही. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे : शरद पवार 

सप्तरंगी मकाऊ पोपट मृत्यू प्रकरणी सोलापुरात दोघांविरोधात गुन्हा दाखल

सप्तरंगी मकाऊ पोपट मृत्यू प्रकरणी सोलापुरात दोघांविरोधात गुन्हा दाखल


महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाचे ऍनिमल किपर भारत शिंदे तसेच महात्मा गांधी प्राणी संग्रहालय प्रमुख यांच्या विरोधात गुन्हा नोंद


मकाऊ पक्षाची व्यवस्थित निगा न राखल्याने मृत्यू झाला असून यास आरोपीत व्यक्ती दोषी असल्याची फिर्याद


सोलापुरातील विजापुर नाका पोलीस ठाण्यात भांदवि कलम 429, 34, प्राण्यांचा छळ अधिनियम 1960 च्या 11(1)(c) आणि 11(1)(j) नुसार गुन्हा दाखल


हैदराबाद येथून जवळपास 7 वर्षांपूर्वी 3 लाख रुपयांना दोन मकाऊ पक्षी सोलापुरात आणण्यात आले होते


मात्र 10 दिवसांच्या अंतरात दोन्ही पक्षांचा मृत्यू, योग्य निगा न राखल्याने मृत्यू झाल्याचा प्राणी मित्रांचा आरोप

एकी बाळगा, मीडियाच्या माध्यमातून मत व्यक्त करु नका; सोनिया गांधींचे काँग्रेस नेत्यांना आवाहन

काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी व्हावी असं सर्वांनाच वाटतं पण त्यासाठी पक्षाचे हित सर्वोपरी मानत आपण  एकी बाळगणे आवश्यक असल्याचं मत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं. अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत स्पष्टता हवी, तो कार्यक्रम लवकरच जाहीर होईल. माझ्याकडे मुद्दा मांडायचा असेल तर मीडियाच्या माध्यमातून कोणी मांडू नये असंही सोनिया गांधी म्हणाल्या. 

मुंबईतील अल्पसंख्याक कॉलेजमधील प्रवेशाचे ऑडिट करा, प्रहार संघटनेची मागणी 
मुंबईतील अल्पसंख्याक कॉलेजमधील प्रवेशाचे ऑडिट करा, प्रहार संघटनेची मागणी 

 

अल्पसंख्याक कॉलेज मध्ये सलग तीन वर्षे अल्पसंख्याक विद्यार्थी संख्या कमी असल्यास शासन निर्णयानुसार अशा अल्पसंख्याक कॉलेजची अल्पसंख्याक कॉलेज म्हणून मिळालेली मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे केली आहे 

 

मुंबईत सद्यस्थितीत 50 टक्के पेक्षा जास्त अल्पसंख्याक कॉलेज असून यामध्ये प्रवेश देताना अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा कोटा सगळ्याच कॉलेज मध्ये पूर्ण भरत नाही 

 

त्यामुळे उरलेल्या अल्पसंख्यक सोडून इतर  कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना चढाओढ पाहायला मिळते...

 

त्यामुळे खरंच मान्यता मिळालेल्या अल्पसंख्याक कॉलेज मध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची संख्या आणि मिळलेले प्रवेश याचे तातडीने ऑडिट करण्यात यावे असा प्रहार संघटनेचे म्हणणे आहे

 
चंदीगढ महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून विनोद तावडे यांची नियुक्ती

चंदीगढ महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून विनोद तावडे यांची नियुक्ती,


शेतकरी आंदोलन, पंजाबच्या आगामी विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्त्वाची असेल,


हरियाणा चे प्रभारी म्हणून काम करणार्‍या विनोद तावडे यांना राष्ट्रीय पातळीवर अजून एक अतिरिक्त जबाबदारी,


यावर्षी डिसेंबरच्या अखेरीस होणार आहे चंदीगढ महापालिकेची निवडणूक

अपंगांच्यासाठी असणाऱ्या दोन हजार सायकल्स हिंगोलीत पडून

केंद्र सरकारच्या अलिमको आणि खासदार निधीतून लाखो रुपये खर्च करून अपंगाना फिरण्यासाठी आणि भविष्यात त्यांना घरातच राहायची वेळ येऊ नये आणि त्यांनाही सामान्य नागरिकांसारखे फिरता यावे या उद्देशाने ह्या सायकल स्थानिक पंचायत समित्याकडे देण्यात आल्या आहेत. या सायकल येऊन दीड महिना पूर्ण होऊन गेला आहे तरीही सायकल वितरित करण्यात आल्या नाहीत. दरम्यान जिल्ह्याला चार हजार सायकल उपलब्ध झाल्या आहेत. अद्यापही वाटप होत नसल्याने तीव्र नाराजगी व्यक्त केली जात आहे. शाच पध्द्तीने वसमत पंचायत समिती मध्ये सुद्धा दोनशे सायकल पडून आहेत. 

पार्श्वभूमी

राज्य सरकारचं ढिसाळ नियोजन आणि नफेखोरीमुळे वीज संकट; रावसाहेब दानवेंचा आरोप
केंद्राची राज्य सरकारकडे कोळशाची 3000 हजार कोटींची थकबाकी राहिली आहे. मात्र बाकी असली म्हणून केंद्राने राज्याची कोणतीही अडवणूक केली नाही. राज्य सरकारचं ढिसाळ नियोजन आणि बाहेरून वीज खरेदी करून नफेखोरी करण्याचा उद्देश यामुळे राज्यात कोळशाची टंचाई जाणवत असल्याचा खळबळजनक आरोप केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाय. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.


केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, राज्य सरकारने वेळीच कोळसा खरेदी केला असता तर संभाव्य वीज संकट टळले असते. राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजन तसेच राज्य सरकारला नफेखोरी करण्यासाठी बाहेरून वीज खरेदी करायची असल्याने राज्यात कोळसा टंचाई निर्माण झाली आहे. देशात कोळशाचा मुबलक साठा उपलब्ध आहे. पण काही राज्यं राजकीय द्वेषापोटी केंद्रावर आरोप करताना दिसून येतात.


टीम इंडिया 17 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, आशिया कपचे यजमानपद PCB कडे
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील राजकीय आणि लष्करी संबंधाचा परिणाम क्रिकेटवरही होतो. या दोन देशांदरम्यान सीमेवर तणाव सुरु असल्याने गेल्या 17 वर्षांमध्ये टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानचा एकही क्रिकेट दौरा केला नाही. पण आता टीम इंडिया पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये होणाऱ्या आशिया कपच्या यजमानपदाचा मान पाकिस्तान क्रिकेट बोर्डला  (PCB) मिळाला आहे.'क्रिबझ' या क्रिकेटशी संबंधित वेबसाईटने माहिती दिली आहे की, 2023 साली होणाऱ्या आशिया कपच्या आयोजनाची संधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डला मिळाली आहे. आता ही स्पर्धा पाकिस्तानमध्येच होणार की यूएईमध्ये खेळवण्यात येणार याचा खुलासा पाकिस्तान क्रिकेट बोर्डने अद्याप केला नाही.


टीम इंडियाचा कोच होण्यास राहुल द्रविड तयार, 2023 पर्यंत होऊ शकतो करार
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय संघाच्या पुढच्या प्रशिक्षक पदासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचं नाव चर्चेत आहे. द्रविड टीम इंडियाचा कोच होण्यासाठी तयार असल्याची माहिती आहे.  भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपद आता राहुल द्रविडकडे (Rahul Dravid) येणार असल्याची शक्यता आहे.. राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच होण्यास तयार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याला 2023 पर्यंतचं कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. मात्र अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.  


Maharashtra Corona Update : मुंबई, पुण्यात अजूनही सक्रीय रुग्णसंख्या जास्त! राज्यातील स्थिती जाणून घ्या
राज्यात कोरोना संसर्ग आता आटोक्यात येताना पहायला मिळत आहे. दैनदिन कोरोना रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस घट होत आहे. असे असले तरी पुणे आणि मुंबईत मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात सक्रीय रुग्णसंख्या आहे. तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यात अद्याप कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. दरम्यान, राज्यात आज 2,149 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 198 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 15 हजार 316 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के आहे. राज्यात आज 29 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. परिणामी राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8 हजार 079 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर त्याखालोखाल मुंबईत 6 हजार 255 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहे. राज्यात सर्वाधिक दैनदिन रुग्णसंख्येची नोंद होणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 3 हजार 567 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.