LIVE UPDATES | नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सामान्यांना झटका

Breaking News LIVE Updates, 31 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह या ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 31 Mar 2021 07:16 AM
नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सामान्यांना झटका
नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सामान्यांना झटका. जवळपास सर्व बचत योजनांमध्ये व्याजदरात कपात. पीपीएफ व्याजदर 46 वर्षातला सर्वात निचांकी आहे. 1974 नंतर पहिल्यांदाच हा व्याजदर सात टक्क्यांच्या खाली आला आहे. या एका वर्षात बचत योजनांच्या व्याजदरांत ही दुसऱ्यांदा कपात आहे.
Pan Card ला Aadhar Card लिंक करण्यासाठी मुदतवाढ; आयकर विभागाचा निर्णय

पॅनकार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे मुदतवाढ देण्यात आल्याचं ट्वीट आयकर विभागाने केलं आहे. आता 30 एप्रिल 2021 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यातील मुद्रांक शुल्क सवलत संपुष्टात

राज्यातील बांधकाम व्यवसायाला ऊर्जितावस्था येण्याच्या दृष्टिकोनातून गतवर्षी राज्यशासनाने दिनांक 31 मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कात सवलत दिली होती, सदर सवलत संपुष्टात आली असून यापुढे नियमित स्वरूपात मुद्रांक शुल्काचे दर लागू राहतील. तथापि महिलांच्या नावाने घरांसाठी होणाऱ्या खरेदी विक्री दस्तावर मुद्रांक शुल्कातून 1 टक्का सवलत देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. सदर सवलत 1 एप्रिल 2021 पासून लागू होईल, बाळासाहेब थोरात यांची माहिती 

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यास तयार

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यास तयार. केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांची हायकोर्टात माहिती. चौकशी सीबीआय मार्फत करायची की ईडी मार्फत याचे निर्देश हायकोर्टानं द्यावेत

पालघर जिल्ह्यात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा नवीन आदेश

 


पालघर जिल्ह्यात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा नवीन आदेश देण्यात आले असून सायंकाळी 8 ते सकाळी 7 पर्यंत जमाव बंदी राहील. नियमांचं उल्लंघन करणाऱ्याकडून 1000 रुपये दंड आकारण्यात येईल, तर सार्वजनिक ठिकाण, बगीचे, समुद्र किनारे, उद्यान येथे सुद्धा हाच नियम लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे विना मास्क फिरणाऱ्यालाही 500 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याकडून 1000  रुपये दंड आकारण्यात येईल. लग्न समारंभावर 15 एप्रिल पासून घातलेली बंदी उठविण्यात आली असून 50 लोकांच्या मर्यादेत ही परवानगी स्थानिक पोलीस ठाण्यातून मिळणार आहे. बाजारपेठा, बार, रेस्टॉरंट खाद्यगृह परमिट रूम सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील

खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू

औरंगाबाद खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू.रात्रीच्या कर्फ्युचे उल्लंघन केल्याने गुन्हा  दाखल करण्याची प्रकिया सुरू.सिटी चौक पोलीस ठाण्याचे पी आय पवार यांची माहिती. जलील यांच्या सोबत रात्री एकत्र आलेल्या जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल होणार..

गुन्हा दाखल झालेला नसताना, हायकोर्ट चौकशीचे आदेश देऊ शकतं का?

गुन्हा दाखल झालेला नसताना, हायकोर्ट चौकशीचे आदेश देऊ शकतं का? हे आम्हाला दाखवून द्या,


मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी याचिकाकर्त्यांना पुन्हा तोच सवाल केला,


यासंदर्भातील निकालांचे दाखले देत हे सिद्ध करून दाखवा ,


हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना निर्देश,

गृहमंत्र्यांकडून त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी सातत्यानं फोर्सवर दबाव टाकला जात होता, परमबीर सिंहांची कोर्टात माहिती

परमबीर सिंहांच्या जनहित याचिकेवरील सुनावणी सुरू, त्यांच्यावतीनं ज्येष्ठ वकील नानकानी यांचा युक्तिवाद सुरू,  या प्रकरणात जनहित याचिका दाखल होऊ शकते यावर याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद सुरू, परमबीर यांनी मुंबईतील बार आणि हुक्का पार्लरच्या संख्येबद्दल आणि वसूल होऊ शकणाऱ्या रकमेचा आढावा घेतला होता. मुंबई पोलिसांना गृहमंत्री सातत्यानं वसुलीचे निर्देश देत होते. मुंबई पोलिसांना डावलून पोलीस अधिकाऱ्यांना शासकीय निवासस्थानी बोलावलं जायचं. मोहन डेलकर प्रकरणातही मी प्रशासनाला सांगितलं होतं की हा गुन्हा इथं दाखल होऊ शकत नाही. तो दादरा नगर हवेली इथंच दाखल व्हायला हवा. तेव्हाही गृहमंत्री माझ्यावर नाराज झाले होते. मी आणि पोलीस दलानं नेहमीच कायद्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. मात्र गृहमंत्र्यांकडून त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी सातत्यानं फोर्सवर दबाव टाकला जात होता, परमबीर सिंहांची कोर्टात माहिती

 तुम्ही गुन्हा का दाखल केला नाही? कोर्टाचा परमबीर सिंहांना सवाल

 तुम्ही गुन्हा का दाखल केला नाही? कोर्टाचा परमबीर सिंहांना सवाल, जनहित याचिकेवरील सुनावणी सुरू

नागपुरात डेकोरेशन साहित्याला आग


नागपुरातील हसनबाग परिसरातील श्रीकृष्ण नगर चौक येथे एका मोकळ्या प्लॉटवर साठवण्यात आलेल्या डेकोरेशन साहित्याला आज सकाळी साडेआठ वाजता भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे लग्न समारंभात उपयोगाचे डेकोरेशचे साहित्य जळून खाक झाले. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली. कोरोनामुळे लग्नसमारंभ बंद असल्याचे काही मंगल कार्यालयांनी या मोकळ्या डेकोरेशनचे साहित्य ठेवले होते. मात्र आज सकाळी अचानक आग लागली, आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही.

 सांगली शहरातील  राजवाडा चौकात बिबट्याचे दर्शन 

सांगली शहरात नागरी वस्तीत राजवाडा चौकात बिबट्याचे दर्शन झाले आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला करून ठार केले असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले आहे. नागरिकांनी घराबाहेर फिरताना दक्षता घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केली आहे. शहरात बिबट्या आल्याने एकाच खळबळ उडाली आहे.

नागपुरातील बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नागपुरातील बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि नागपूरचा कुख्यात गॅंगस्टर रणजीत सफेलकरला पोलिसांनी ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वीच नागपूर पोलिसांनी 2016 मध्ये झालेल्या एकनाथ निमगडे हत्या प्रकरणाचा उलगडा करत एका अज्ञात व्यक्तीने कुख्यात गॅंगस्टर रणजीत सफेलकरला तब्बल पाच कोटी रुपयांची सुपारी देऊन एकनाथ निमगडे यांची हत्या घडविली होती असे समोर आणले होते...

जळगाव भाजपच्या फुटीर नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी भाजपची याचिका


जळगाव महापौर आणि उपमहापौर निवडणुकीतील भाजपच्या फुटीर नगरसेवकांवर अपात्रतेची याचिका आज भाजपच्या वतीनं दाखल होणार आहे. या निवडणुकीत भाजप मधिल 27 नगरसेवकांच्या एका गटाने शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केले होते. आता त्यावर भाजप कडून कायदेशीर लढाईला सुरुवात झाली आहे.

देशात सर्वात जास्त कोरोना प्रादुर्भाव असलेल्या 10 जिल्ह्यात अहमदनगरचा समावेश

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार देशात सर्वात जास्त प्रादुर्भाव असलेल्या 10 जिल्ह्यात अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 5 दिवसात सरासरी 1 हजार पेक्षा जास्त रुग्ण हे कोरोनाबधित होत आहेत. आजपर्यंत 93242 रुग्ण हे कोरोनाबधित झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव महापौर आणि उपमहापौर निवडणुकीतील भाजपच्या फुटीर नगरसेवकांवर अपात्रतेची याचिका आज दाखल होणा

जळगाव महापौर आणि उपमहापौर निवडणुकीतील भाजपच्या फुटीर नगरसेवकांवर अपात्रतेची याचिका आज दाखल होणार, भाजपकडून कायदेशीर लढाईला सुरुवात, सकाळी ११ वाजता नाशिक विभागीय आयुक्तांकडे भाजपकडून सादर होणार याचिका, निवडणूकीत भाजप मधील 27 नगरसेवकांच्या एका गटाने शिवसेनेच्या उमेदवारांना केले होते मतदान, भाजप नगरसेवकांच्या मदतीने महापालिकेवर फड़कला होता भगवा, सांगली पाठोपाठ जळगाव महापालिकेवरील भाजपने गमावली होती सत्ता,  शिवसेनेने भाजपला दिला होता मोठा धक्का

पार्श्वभूमी

शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; सुप्रिया सुळेंनी मानले डॉक्टरांचे आभार


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मंगळवारी पोटदुखी बळावल्यामुळं तातडीनं रग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 31तारखेला ते रुग्णालयात दाखल होणं अपेक्षित होतं. पण, दुखणं अधिव जाणवू लागल्यामुळं ते एक दिवस आधीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. ज्यानंतर त्यांच्यावर मंगळवारीच शस्त्रक्रियाही करण्यात आली. 


राज्यात काल 27,918 इतकी नव्या कोरोनाबाधितांची नोंद


कोरोना संसर्ग होऊन बाधित रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. यातच मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या काहीशी वाढलेली दिसली. त्यामुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढच्या अडचणींमध्ये वाढताना दिसत आहेत. रविवार आणि सोमवारच्या तुलनेत महाराष्ट्रात मंगळवारी नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काहीसा कमी दिसून आला. पण, 27,918 इतकी नव्या कोरोनाबाधितांची नोंदही धडकी भरवणारी ठरली.


परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी समिती, सहा महिन्यात अहवाल सादर करणार 


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळत आहे. परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले आहेत. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांची चौकशी करण्याचा महत्त्वाचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता. अशातच आता या आरोपांच्या चौकशीसाठी सदस्यिय ‌समिती गठित करण्यात आली आहे. माजी न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती सहा महिन्यात या प्रकरणाचा अहवाल देणार आहे. 


ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर


मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना 2020 वर्षीचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. शरणकुमार यांच्या‘सनातन’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली येथील के. के. बिर्ला फाऊंडेशनकडून 1991 पासून हा पुरस्कार दिला जातो आहे. 15 लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. शरणकुमार लिंबाळे यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सरस्वती पुरस्कार 2020 ज्या कादंबरीसाठी जाहीर झाला आहे ती 'सनातन' ही कादंबरी मुघल आणि ब्रिटीश कालखंडातल्या इतिहासावर आधारित आहे. देशातील स्वातंत्र्य लढ्यावर प्रकाश टाकताना दलित आणि आदिवासींचे असलेले योगदान प्रकर्षाने पुढे आले नाही. सनातन कादंबरीमध्ये दलित आणि आदिवासींच्या योगदानाचा उल्लख आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.