राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


Kharghar Heatstroke: खारघरमधील उष्माघात हा नैसर्गिक, एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण


खारघरमध्ये झालेल्यामहाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award)  सोहळ्यात उष्माघातामुळे 14 श्रीसेवकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आले आणि त्यावर सुनावणी होण्यापूर्वी राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी यावर भाष्य केलंय. याचिकेच्या माध्यमातून कोण राजकारण करतंय असा सवाल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची आधीची नियोजत वेळ संध्याकाळची होती. मात्र श्रीसेवकांची व्यवस्था पाहता आप्पासाहेबांनी कार्यक्रम रात्री ठेवू नका अशी विनंती केल्याचं मुनगंटीवार म्हणाले.  तसंच उष्माघात नैसर्गिक होता. नियोजनाबाबत चर्चा होऊ शकते. मात्र सर्वपक्षीयांनी केवळ राजकारण करण्यातच धन्यता मानली अशी टीकाही त्यांनी केलीय. वाचा सविस्तर 


Akole Long March : उन्हाचं कारण देत लॉन्ग मार्चला पोलिसांची नोटीस, मात्र किसान सभा आंदोलनावर ठाम 


अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले येथून आज दुपारी तीन वाजता किसान सभेचा लॉंग मार्च (Long March) निघणार आहे. या मार्चला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. अजित नवले यांना पोलिसांनी तशी नोटीसही बजावलेली आहे. अकोले पोलिसांकडून मोर्चेकरांना 149 ची नोटीस बजावण्यात आलेली आहे. किसान सभा मात्र आंदोलनावर ठाम आहे. त्यामुळे आज तीन वाजेपासून लॉन्ग मार्चला सुरुवात होणार आहे. वाचा सविस्तर 


Pune Water Cut : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; शहरातील पाणीकपात तूर्तास टळली; 15 मेनंतर पुढील निर्णय होणार


पुणेकरांसाठी (Pune News) दिलासादायक बातमी आहे. पुणेकरांवर घोंघावणारं पाणी कपातीचं संकट तूर्तास टळलं आहे. पुणे आणि ग्रामीण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवणार का?, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आज झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणीकपात होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 15 मेपर्यंत पुणेकरांची पाणीकपात टळली आहे. 15 मेनंतर पुन्हा एकदा संपूर्ण आढावा घेण्यात येणार असून त्यानंतर पाणीकपातीसंदर्भातील पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. वाचा सविस्तर 


Mhada Lottery: म्हाडाच्या सर्वच गटाच्या अनामत रकमेत होणार वाढ, म्हाडा उपाध्यक्षांसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार प्रस्ताव


म्हाडाच्या सर्वच गटाच्या अनामत रकमेत  वाढ  होणार आहे.  म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2023 च्या सोडतीसाठी अत्यल्प आणि अल्प गटातील अनामत रक्कमेत कोणतीही वाढ करणार नसल्याचे जाहीर केले होते. आता मात्र मंडळाने घुमजाव करत अत्यल्प आणि अल्पसह सर्वच उत्पन्न गटाच्या अनामत रकमेत भरमसाठ वाढ प्रस्तावित केली आहे. वाचा सविस्तर 


Nagpur Rain : विदर्भात अवकाळीमुळं पिकांना मोठा फटका, तर गारपीटीमुळं पोल्ट्रीमधील हजारो कोंबड्यांचा मृत्यू, वाचा कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती? 


Nagpur Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. नागपूरसह विदर्भातील अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, भंडारा आणि चंद्रपुर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांसह नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तर नागपुरात येरणगावमधील एका पोल्ट्री फार्ममध्ये गारपीटीमुळं सात हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. तर चंद्रपुरात वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर