राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
शिवसेनेकडून कालच्या जाहिरातीत दुरुस्ती, आजच्या जाहिरातीत फडणवीस अन् बाळासाहेबांचे फोटो, लोकप्रियतेची टक्केवारीही बेरीज करून सादर
शिवसेनेनं सोमवारी सर्व वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीमुळे राजकारण तापलं होतं. त्यातच आज शिवसेनेनं पुन्हा पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचा फोटो आहे. तसंच, वरच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे , आनंद दिघे , नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे फोटो दिसत आहेत. (वाचा सविस्तर)
अकोला कथित धाडीवरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषिमंत्री सत्तारांची सर्वांसमोर 'खरडपट्टी'
गेल्या तीन चार दिवसांपासून अकोल्यात कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या छापेमारेची राज्यात जोरदार चर्चा आहे. दरम्यान याच कथित धाडीवरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्वांसमोर 'खरडपट्टी' काढली आहे. (वाचा सविस्तर)
देवेंद्र फडणवीस नाराज? सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत एकत्र येण्याचं टाळलं?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि शिवसेनेवर नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सलग दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र टाळलं. मुंबईत आज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा आज 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. (वाचा सविस्तर)
तुपकरांच्या आंदोलनाचा धसका, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात
स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या आंदोलनाची पीक विमा कंपनीनं दखल घेतली आहे. आंदोलनाच्या धसक्याने AIC पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे. (वाचा सविस्तर)
मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाची हजेरी; चक्रीवादळामुळे काही भागात उकाड्यापासून दिलासा
मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) तसेच राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर (Palghar) परिसरात पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी संध्याकाळपासून मुंबईसह उपनगरात रिमझिम पाऊस (Rain Update) पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातही मंगळवारपासून पावसाची संततधार सुरु आहे. पावसामुळे मुंबई आणि ठाण्यातील तापमान घटलं आहे. (वाचा सविस्तर)