MNS Chief Raj Thackeray Birthday : आज मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा वाढदिवस... रात्री 12 वाजल्यापासूनच राज्यभरातील कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे. राज ठाकरेंनीदेखील निवासस्थानाबाहेर येऊन शुभेच्छा स्विकारल्या. यावेळी राज ठाकरेंना अनेक भेटवस्तू देण्यात आल्या. अशातच रात्री राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी उत्तर मुंबईतील (Mumbai News) कार्यकर्ते शिवतीर्थावर उपस्थित होते. राज ठाकरेंनी त्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या खऱ्या पण शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी एक विनंतीही केली. राज ठाकरेंनी केलेल्या विनंतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


उत्तर मुंबईतील मनसे कार्यकर्ते रात्री राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईतील त्यांचं निवासस्थान शिवतीर्थावर आले. कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या नावानं घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. राज ठाकरेही त्यांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी बाहेर आले. पण त्यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना एक विनंती केली. राज ठाकरेंचा नातू कियान आजारी असल्यामुळे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आरडाओरडा न करण्याची विनंती केली. 



"कियानला ताप आहे. तो आजारी आहे, तो झोपलाय, त्यामुळे जास्त आरडाओरडा करू नका.", असं म्हणत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती केली. त्यानंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांनी आणलेला केक कापला, त्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या. कार्यकर्त्यांनीही राज ठाकरेंची विनंती मान्य करत शांततेत शुभेच्छा देऊन तिथून निघून गेले. 


पाहा व्हिडीओ : Raj Thackeray Birthday : मनसे सरचिटणीस मनोज चव्हाणांकडून राज ठाकरेंना वाढदिवसानिमित्त सुवर्ण होन



दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थवर मनसे कार्यकर्ते आणि राज ठाकरेंच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. राज ठाकरेंनीदेखील निवासस्थानाबाहेर येऊन शुभेच्छा स्विकारल्या. यावेळी राज ठाकरेंना विविध भेटवस्तू देण्यात आल्या. मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळातील सोन्याची 'सुवर्ण होण'ची प्रतिकृतीही दिली. तर मनसे कार्यकर्त्यांनी 55 किलोचा केकदेखील आणला होता. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या, तसेच त्यांनी कार्यकर्त्यांनी आणलेला केकही कापला. 


राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे कार्यकर्ते आणि  विविध क्षेत्रातील चाहते राज्यभरातून त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले होते. या कार्यकर्त्यांच्या आणि चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी राज ठाकरेंनी खास वेळ राखून ठेवली होती. त्यासाठी शिवतीर्थसमोर फुलांची सजावट करून कार्यकर्त्यांसाठी खास मंडप उभारण्यात आला होता.