Agriculture News : स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या आंदोलनाची पीक विमा कंपनीनं दखल घेतली आहे. आंदोलनाच्या धसक्याने AIC पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे. सोयाबीन (Soybean) आणि कापूस (Cotton)उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. 


रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम


येत्या 15 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात निर्णय घ्या अन्यथा, 16 जूनला मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीवरुन उड्या मारु असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला आहे. यामध्ये जर शेतकर्‍यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असा इशाराही तुपकरांनी दिला आहे. त्यानंतर  AIC पीक विमा कंपनीने बुलढाणा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, तरीदेखील रविकांत तुपकर हे आंदोलनावर ठाम आहेत.


Ravikant Tupkar : विविध मागण्यांवरुन रविकांत तुपकर आक्रमक


जर सरकारने 15 जूनपर्यंत सोयाबीन आणि कापसाच्या भावासंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही. अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत तातडीने मिळाली नाही तसेच  AIC कंपनीने उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविम्याची रक्कम जमा केली नाही. तर आम्ही शेतकऱ्यांसह 16 जूनला मुंबईतील AIC कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीमधील 20 व्या मजल्यावर असणाऱ्या कार्यालयावरुन खाली उड्या मारू असा इशारा तुपकरांनी दिला आहे. जर शेतकर्‍यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असंही तुपकरांनी म्हटलंय.


सोयाबीनला प्रति क्विंटल 8,500 रुपये तर कापसाला प्रति क्विंटल12,500 रुपये दर द्यावा


सोयाबीन, कापूस आणि ऊसप्रश्नी रविकांत तुपकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. खासगी बाजारात सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल 8,500 रुपये तसेच कापसाचा भाव प्रति क्विंटल12,500 रुपये स्थिर राहावा यासाठी सरकारने धोरण आखावं, यासह इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. शेतकरी प्रश्नावरुन रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन देखील केले होते. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांसह त्यांनी मुंबईत अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा देखील तुपकरांनी दिला होता. 


महत्त्वाच्या बातम्या:


Ravikant Tupkar : सोयाबीन-कापूस प्रश्नी निर्णय घ्या अन्यथा, 16जूनला मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीवरुन उड्या मारु, स्वाभिमानीचा इशारा