Maharashtra Booster Dose : शुक्रवारपासून पुढील 75 दिवस देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना कोविडचा बूस्टर डोस (Booster Dose) मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल दिली. या देशव्यापी मोहिमेसंदर्भात आपली पंतप्रधानांशी काल चर्चा झाली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीवेळी दिली. 


मुख्यमंत्र्यांनी यावेळी आरोग्य विभागास निर्देश दिले की, या मोहिमेमध्ये एकही दिवस वाया घालू न देता सर्व संबंधितांना बूस्टर मात्रा मिळालीच पाहिजे यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, आरोग्य संस्था यांना देखील सहभागी करून घ्यावे. याविषयी पुरेशी जन जागृती करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.



18 वर्षांवरील नागरिकांना पुढील 75 दिवसांसाठी बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली होती. 15 जुलैपासून पुढील 75 दिवसांपर्यंत 18 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  भारत सध्या 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. याला देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 15 जुलै 2022 पासून पुढील 75 दिवस 18 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली होती. 


कधी घ्यावा बूस्टर डोस? 
ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत आणि त्यांना दोन्ही डोस घेऊन सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल त्या व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना जवळच्या खाजगी लसीकरण केंद्रावर बूस्टर डोससाठी नोंदणी करु शकतात. 


इतर महत्वाच्या बातम्या


Free Booster Dose : 18 वर्षांवरील नागरिकांना पुढील 75 दिवस बूस्टर डोस मोफत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय