मुंबई : तुरूंगातून सुटलेले गुंड मोठ्या पदावर बसले आहेत. गुंडागर्दीचा वापर करून दबाव आणला जात आहेत. अशाप्रकारचं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही. भाजपाचं राजकारण गुंडांच्या टोळ्यापेक्षाही घाणेरडं झालं आहे. ईडी, सीबीआयच्या मदतीनं ज्यानी सरकारं बनवली. ते त्यांच्यावरच पलटली आहे. सध्या तुरूंगातून सुटलेले गुंड मोठ्या पदावर बसले असून, याच गुंडाचा वापर करून आमदारांवर दबाव आणला जात आहे. त्यांची नावं लवकच जाहीर करू, पण भाजपाचं राजकारण गुंडाच्या टोळ्यापेक्षाही घाणेरडं झालं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी भाजप सरकारवर केला आहे.

राऊत म्हणाले, हरियाणासारख्या राज्याचा तिढा लवकर सोडतो. पण महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचा तिढा अजून सुटतं नाही हे रहस्यमय आहे. मुख्यमंत्र्यांनी पलटी मारली आणि तेव्हाच चर्चा थांबली. भाजपचे राजकरण हे गुंडांपेक्षाही घाणेरडं आहेत. कर्नाटकातील येडीयुरप्पा फॉर्म्युला महाराष्ट्रात चालणार नाही. सत्ता गेल्यानंतर माकडं आणि कुत्रंही बरोबर राहत नाही. आता यापुढे फक्त मुख्यमंत्रिपदावरच बोलणे होईल.

Sanjay Raut | शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शिवतीर्थावर शपथविधी : संजय राऊत | ABP Majha


भारतीय जनता पक्ष सत्तास्थापनेसाठी उतावीळ झाल्याच्या बातम्या दोन दिवसांपूर्वी माध्यमांवर दिसत होत्या. भाजपने नव्या सरकारच्या शपथविधीसाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम 5 नोव्हेंबरसाठी बुक केले असल्याच्याही चर्चा सुरु आहेत. यावरुन शिवसेना नेते  राऊत यांनी प्रतिक्रिया  दिली. राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल आणि त्याचा शपथविधी दादरमधल्या शिवतीर्थावर होईल. शिवतीर्थ बाळासाहेब ठाकरेंची आवडती जागा आहे. ही महाराष्ट्रासाठी क्रांतीकारक जागा आहे. तिथे महाराष्ट्राच्या जनतेसमोर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शपथग्रहण सोहळा होईल.