CM Eknath Shinde : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत ठाण्यात काल रात्री (10 ऑगस्ट) मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरेंच्या गाड्यांच्या ताफ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यामुळं ठाण्यात रात्रभर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं दिसून आलं आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खरी सुरुवात ही राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये झाली. मराठवाड्यात राज ठाकरेंचा ताफा अडवला गेला. त्याच ॲक्शनला आज रिअॅक्शन दिल्याचे आज पाहायला मिळालं, परंतू, असं आंदोलन कोणालाच अपेक्षीत नसते असंही मुख्यमंत्री म्हणाले.  


सरकार स्थापन झाल्यावर विरोधक म्हणाले हे सरकार घटनाबाह्य आहे, हे सरकार पडणार आहे. परंतू, असं झालं नाही. सरकार अधिक मजबूत होत गेलं. आम्ही बाळासाहेब यांचे विचार कधीही सोडले नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना अशा प्रकारचा सामना करावा लागतो असा टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला. सत्तेसाठी कुठलंही कॉम्प्रमाईज आम्ही विचारांशी करणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे असं ते म्हणाले. 


मातोश्री सोडून दिल्लीला लोटांगण, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला


आज झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्ट्राईकरेट पाहिला तर लोकांची पसंती कोणाला आहेत ते पाहावं. ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला सांगतो असे मुख्यमंत्री म्हणाले. हे लोक आम्हाला दिल्लीतलं सांगतात. आधी दिल्लीतली लोकं मातोश्रीमध्ये यायची आणि हे लोक आता मातोश्री सोडून दिल्लीला लोटांगण घालत असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. आम्ही दिल्लीला जातो ते राज्यातील विकासासाठी जातो. आम्ही कुठलंही काम लपून-छपून करत नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून आम्ही दिल्लीला जात नाही अस मुख्यमंत्री म्हणाले.


बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना जंगलात फोटोग्राफी करण्यासाठी पाठवलं असतं


आता अनेक लोक बोलत फिरत आहेत की, मला मुख्यमंत्री करा. पण आम्ही तसं कधीच केलं नाही. मुख्यमंत्रीपदासाठी कधीही विचारांशी गद्दारी केली नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. आजही ते ठाण्यातून दाढी बद्दल बोलले. परंतू, त्यांना दाढीची धास्ती आहे.  त्यांना माहिती आहे याच दाढीने आपली गाडी खड्ड्यात घातलेली आहे. मिमिक्री करणं हेच काम त्यांना आता उरलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी अशा प्रकारचं काम केलं असतं तर बाळासाहेबांनी त्यांना जंगलात फोटोग्राफी करण्यासाठी पाठवलं असतं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 


 


महत्वाच्या बातम्या:


ठाण्यातील राड्यानंतर कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंना व्हिडीओ कॉल; मनसैनिकांचा पोलीस स्थानकात जल्लोष