Prakash Ambedkar लातूर : भारतीय जनता पार्टीचे (BJP) लोकतर खूप भित्रे आहेत. दोन दिवस थांबा त्यांची मोठी पोल मी खोलणार आहे. असा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. व्ही एस पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांनी आज लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्ष प्रवेश केला. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत लातूर येथे झालेल्या कार्यक्रमात विनोद खटके यांनी संघटनेतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी सरकारवर सडकून टीका केली.
शरद पवार हे थोर नेते, पण ते दाऊदचे मित्र सुद्धा आहेत- प्रकाश आंबेडकर
मराठा समाज आज म्हणत आहे मी ओबीसीला मतदान देणार नाही. तर ओबीसी म्हणत आहे मी मराठ्याला मतदान देणार नाही. कट्टरतेचे हि विभाजन आम्ही पण बघितले आहे. वंचीत बहुजन पार्टीने आरक्षण बचाव यात्रा काढली नसती तर हा मराठवाडा पुन्हा पेटला असता. आता परिस्थिती हाताबाहेर चालली आहे आणि सरकार त्याला नियंत्रण करू शकत नाही, कारण हे सगळे नेते पळपुटे आहेत. शरद पवार हे थोर नेते आहेत, जाणकार नेते आहेत. पण ते दाऊदचे मित्र सुद्धा आहेत. तुमच्या डोक्यात दाऊद वेगळा असेल पण माझ्या डोक्यात दाऊद वेगळा आहे.
जात बघून मतदान केलं तर ते या देशाचे सर्वात मोठे विरोधक- प्रकाश आंबेडकर
जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे. शरद पवार सांगायला तयार नाहीत कि माझा त्याला पाठींबा आहे म्हणून. म्हणजे जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा आहे म्हणून हि सांगायचं नाही आणि विरोध आहे म्हणून हि सांगायचं नाही. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना सांगतो कि तुम्ही जात म्हणून मतदान केलंत, तर या देशाला धोका आहे हे लक्षात ठेवा. जात बघून मतदान करणार असाल तर तुम्ही या देशाचे सर्वात मोठे विरोधक आहात हे लक्षात ठेवा. मराठ्यांना माझे सांगणे आहे की, नेतृत्व पाहिजे यशवंतराव चव्हाण सारखं. यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाला लाथ मारून चायना आणि पाकिस्तानशी जाऊन ते तोंड देऊन आले. येथे भित्र भागुबाई नेतृत्व चालत नाही, जे निर्णय घेऊ शकत नाहीत ते भित्रे भागुबाई आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागवी - प्रकाश आंबेडकर
शिवाजी महाराजांची स्वारी गुजरातवर कधी झालीच नाही, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय, यापूर्वी आरएसएस असे म्हणत होते की शिवाजी महाराजांच्या इतिहासच नाही. त्यामुळे एका कर्ताबगार व्यक्तिमत्वाचा इतिहास नाकारण्याचा हा विषय होत असून याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागवी, असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. ते माफी मागणार नाहीत याची मला खात्री असल्याचे देखील यावेळी आंबेडकर म्हणाले . लातूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते
हे ही वाचा