BJP on SHARAD PAWAR : आजपर्यंत त्यांचे आयुष्य दुसऱ्यांचे घर फोडण्यात गेले आहे. त्यामुळे आजपर्यंत त्यांना यांना रायगडावर यायला वेळ नव्हता, अशी घणाघाती टीका भाजपने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर केली आहे. आता निवडणुका जवळ आल्याने आणि बहुतांश सहकारी अजितदादांसोबत गेल्याने शरद पवारांना रायगडाची आठवण आली आहे. सहानुभूती निर्माण करुन मते मिळवण्याकरता या वयात शरद पवार (Sharad Pawar) यांना असे उद्योग करावे लागत आहेत. ४० वर्षांत शरद पवार यांना कधीही रायगडाची आठवण झाली नाही. कधीही दुर्ग संवर्धनासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले नाहीत, असा आरोप महाराष्ट्र भाजपने (BJP Maharashtra) केले आहेत. भाजपने ट्वीटरवर पोस्ट करत शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे. 






देवेंद्र फडणवीस यांचीही शरद पवारांवर टीका 


शरद पवार 40 वर्षानंतर रायगडावर गेले. मला या गोष्टीचा आनंद आहे. शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी 40 वर्षानंतर अजितदादांमुळे शरद पवारांना रायगडावर जावं लागलं, याचे क्रेडिट अजित पवार यांना द्यावेच लागेल. तुतारी कुठे वाजते कशी वाजते ते आपल्याला भविष्यात देखील दिसेलच, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) लगावला आहे. 


चिन्ह अनावराच्या निमित्ताने शरद पवार तब्बल 40 वर्षानंतर रायगडावर 


निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह बहाल केल्यानंतर शरद पवार गटाकडून चिन्हाच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन रायगडावर करण्यात आले होते. यावेळी शरद पवार डोलीतून राडगडावर पोहोचले. यावेळी त्यांना किती वर्षानंतर रायगडावर आलात? असा सवाल करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना 40 वर्षानंतर रायगडावर आलो असल्याचे शरद पवार म्हणाले. दरम्यान, याच मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपने शरद पवारांवर निशाणा साधलाय. 






शरद पवार गटाच्या चिन्हाचा अनावरण सोहळा संपन्न 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण रायगडावर करण्यात आलं आहे.  तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम पार पडला.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तुतारी चिन्हाचं स्वागत केलं आहे.  या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड,  अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकींचं रणशिंग फुंकलंय. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Buldhana News: वाघाची शिकार अन् 'त्या' वक्तव्यामुळे शिंदे गटाचे आमदार अडचणीत? वन विभागाच्या अहवालाकडे साऱ्यांचे लक्ष