सिंधुदुर्ग : भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री हे अजूनही घरात बसून कामकाज हाकतात. मंत्रालयात येत नाहीत. त्यामुळे त्यांचेच मंत्री त्यांचं ऐकत नाहीत. गर्दी जमवू नका सांगितलं तरी त्यांच्या मंत्र्यानेच पोहरादेवी गडावर गर्दी जमवली. आता त्यांच्यावर मुख्यमंत्री काय कारवाई करणार? असा प्रश्न राणेंनी विचारला आहे. राज्यातील कुठलाही सरपंच हा सध्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार आहे. कारण, राज्यातील कुठल्याही सरपंचाला कायद्यांची माहिती जास्त आहे.
Sanjay Rathod | संजय राठोड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल
पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचं नाव घेतलं जात होतं. ते पंधरा दिवसांपासून फरार होते. नंतर ते बाहेर पडले आणि मंदिरात गेले. मंदिरात जायला ते संत आहेत का? असा खोचक सवाल विचारतानाच आरोपांना उत्तरं द्या पळताय कशाला, अशा शब्दात नारायण राणे यांनी राठोडांना आव्हान दिलं आहे. सरकार विनयभंग, बलात्कार, हत्या प्रकरणातील लोकांना पाठीशी घालत आहे. सुशांतसिंग, दिशा सालियान, पूजा चव्हाण प्रकरणातील आरोपींनाही पाठीशी घालत आहेत. या सरकारला तसं लायसन्स दिलं आहे का?, असा सवालही राणेंनी केला आहे.
Pooja Chavan Death Case | संजय राठोड याला चपलेनं झोडलं पाहिजे : चित्रा वाघ
एखाद्या समाजाने जो विकासकामं करतो त्याच्या मागे जावं. बलात्काऱ्यांच्या मागे समाजानं जाऊ नये, या प्रकरणातील एवढ्या क्लिप बाहेर आल्या पण अद्याप काहीही कारवाई केली नाही. कारवाई केली तर लोक आपल्याला सोडून जातील, अशी भीती या सरकारला असल्याची टीकाही राणेंनी केली. हे सरकार पवारांच्या कृपेमुळं बसलं, मुख्यमंत्र्यांनी किमान त्यांचं तरी ऐकावं, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.