मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील ( North Mumbai Lok Sabha Constituency) भाजपचे (BJP) खासदार गोपाळ शेट्टी (BJP MP Gopal Shetty) यांनी आपल्याच शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर दिलाय. यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पत्नीच्या मैत्रिणीच्या मुलीने कबड्डीत सुवर्णपदक पटकावल्यानंतर तिला देण्यात आलेल्या एक कोटी रूपयांवरून खासदार शेट्टी यांनी प्रश्न उपस्थित करत आपल्याच सरकारला घरचा आहेर दिलाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे (Lata Shinde) यांच्या मैत्रिणीच्या मुलीने कबड्डीत सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर तिला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यावरुन शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधलाय. "एखाद्या कबड्डीपटूची ओळख मुख्यमंत्र्यांच्या पत्नीशी नाही तर त्याला काहीही देऊ नये, ही कोणती व्यवस्था आहे? असा सवाल खासदार गोपाळ शेट्टी यांनी उपस्थित करून शिंदे फडणवीस सरकारला घरचा आहेर दिलाय.
BJP MP Gopal Shetty : काय म्हटले आहे गोपाळ शेट्टी यांनी?
"महाराष्ट्राच्या विधानसभेत होतो त्यावेळीपासून प्रयत्नशील असायचो. ज्या तिघांना शिवछत्रपती पुरस्कार मिळालेत त्यांनी घर मागितलं तर सरकार देत नाही. परंतु, कबड्डीपटूंमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या मैत्रिणीच्या मुलीला सुवर्णपदक मिळालं तर तिला एक कोटी रूपये देण्यात आले. ही कोणती पद्धत आहे? कोणा मुलाची ओळख मंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांशी असेल तरच त्यांना पारितोषिक मिळणार का? तुम्ही एक गाईडलाईन बनवा, ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळालेत, त्यांना पूर्वीच्या काळी फ्लॅट दिले गेलेत. तेव्हा जर तीनशे फुटांचं घर होतं तर आता व्यवस्था मोठी झाली आहे. सरकार विस्तारलंय, त्यामुळं आता 500 फुटांची जागा द्या, काय फरक पडतो? असे खासदार गोपाळ शेट्टी यांनी म्हटले आहे.
गोपाळ शेट्टी यांचा खुलासा-
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे गोपाळ शेट्टी यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं. मी चूकून काँग्रेसवर हल्ला केला नाही. तर मला ज्या पक्षानं वाढवलं, त्यांच्याबद्दल कशाला बोलेन, असं गोपाळ शेट्टी म्हणाले.
पाहा काय म्हणाले गोपाळ शेट्टी
महत्वाच्या बातम्या
SRK Helps Anjali Singh Family : शाहरुखचा दिलदारपणा! दिल्ली अपघातातील मृत अंजलीच्या कुटुंबाला मदतीचा हात